AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

FIFA World Cup Final सामन्याच्या तिकीटाने आजवरचे सर्व विक्रम मोडले, आकडा पाहून चक्रावून जाल

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम सामन्यात अर्जेंटीना आणि स्पेन हे संघ आमनेसामने येणार आहेत. हा सामना 20 जुलैला खेळला जाणार आहे. पण या सामन्यासाठी केलेल्या रिसेल तिकीटाने आजवरचे सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

FIFA World Cup Final सामन्याच्या तिकीटाने आजवरचे सर्व विक्रम मोडले, आकडा पाहून चक्रावून जाल
FIFA World Cup Final सामन्याच्या तिकीटाने आजवरचे सर्व विक्रम मोडले, आकडा पाहून चक्रावून जालImage Credit source: fifa world cup twitter
| Updated on: Jul 18, 2026 | 7:47 PM
Share

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेच्या अंतिम फेरीत स्पेन आणि अर्जेंटीना यांनी धडक मारली आहे. 20 जुलैला हे दोन्ही जेतेपदासाठी लढत देणार आहेत. हा सामना पाहण्यासाठी क्रीडाप्रेमींमध्ये उत्सुकता वाढली असून कोण जेतेपद मिळवणार याची चर्चा सुरू आहे. असं असताना हा मैदानातून याची देही याची डोळा पाहण्यासाठी क्रीडाप्रेमी आतुर आहेत. यासाठी कितीही किंमत मोजण्याची तयारी दर्शवत आहेत. 20 जुलैला न्यू जर्सीच्या ईस्ट रूदरफोर्ड येथील मेटलाईफ स्टेडियममध्ये हा सामना खेळला जाणार आहे. हा सामना भारतीय वेळेनुसार मध्यराथ्री 12.30 वाजता सुरू होणार आहे. या अंतिम सामन्यासाठी अमेरिकेत तिकीट रिसेलच्या इतिहासात सर्व विक्रम मोडीत काढले आहेत.

अंतिम सामन्याच्या तिकीट विक्रीने मोडले सारे विक्रम

तिकीट रिसेल मार्केटप्लेस टिकपिकच्या ताज्या आकडेवारीनुसार, हा अंतिम सामन्यात प्रत्यक्ष मैदानात उपस्थित राहून पाहण्यासाठी चाहत्यांनी पाण्यासारखा पैसा ओतला आहे. त्यामुळे अमेरिकेच्या क्रीडा इतिहासातील सर्वात महागडा इव्हेंट ठरला आहे. टिकपिकच्या मते, फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धेचा अंतिम सामना पाहण्यासाठी चाहत्यांनी एका तिकीटासाठी सरासरी 11327 डॉलर म्हणजेच जवळपास 11 लाख रुपये मोजले आहे. अमेरिकेतली क्रीडा इतिहासात आजवर इतकी महागडी तिकीट विक्री कधीच झाली नव्हती. त्यामुळे आजवरचे सर्व विक्रम या तिकीट विक्रीने मोडले आहेत. फुटबॉलच्या या सामन्याने अमेरिकेतील सर्वात लोकप्रिय असलेल्या ‘सुपर बाउल LVIII’ ला मागे टाकलं आहे. या स्पर्धेसाठी तिकीटाची रक्कम जवळपास 9 लाख रुपये होती.

सर्वात स्वस्त तिकीटही महाग

फिफा वर्ल्डकप 2026 स्पर्धा पाहण्यासाठी फुटबॉलप्रेमी वाटेल ती किंमत मोजत आहे. पण काही जणांना हे तिकीट परवडणारं नाही. त्यामुळे स्वस्त तिकीट खरेदीसाठी चाहते धाव घेत आहेत. पण येथेही खिशाला मोठी कात्री लागत आहे. टिकपिकमध्ये नोंद केलेल्या सर्वात स्वस्त तिकीटाची किंमत ही 6.7 लाख रुपये आहे. असं असूनही तिकीट विक्री पटापट होत आहे. त्यामुळे मैदानात लाखो रुपये मोजून चाहते उपस्थित राहणार आहे. या ऐतिहासिक क्षणासाठी मेटलाइफ स्टेडियम सज्ज झालं आहे. तर चाहतेही मैदानात कधी जातो यासाठी उत्सुक आहेत. आता स्पेन की अर्जेंटीना, कोण बाजी मारणार? याची चर्चा सुरू आहे.

Follow Us
पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
Pune Dry Day : पुण्यात गणेशोत्सवात 12 दिवस Dry Day का? हायकोर्टाने काय निकाल दिला?
मला चांगली मराठी येते, भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
Sanjay Dutt | मला चांगली मराठी येते, कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर... संजय दत्तला उपरती
ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा व्हिडिओ बघाच
Lalbaugcha Raja First Look 2026 | ही शान कोणाची? लालबागच्या राजाची, राजाच्या प्रथम दर्शनाचा संपूर्ण व्हिडिओ बघाच
ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPI...
PM Modi | ब्रिक्स बिझनेस फोरममध्ये PM मोदींचं मोठं वक्तव्य; स्टार्टअपपासून UPIपर्यंत भारताच्या प्रगतीचा पाढाच वाचला
विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! व्हिडिओ होतोय व्हायरल
Virat Kohli Meets Eknath Shinde | विराट कोहली आणि एकनाथ शिंदेंची लंडनमध्ये भेट! क्रिकेट अन् राजकारणातील दोन दिग्गज एकाच फ्रेममध्ये; व्हिडिओ होतोय व्हायरल
एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले
Yogesh Kadam | एकनाथ शिंदे यांचा एकेरी उल्लेख सहन करणार नाही! योगेश कदम संतापले; मनोज जरांगेंना केलं आवाहन
जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी....
Manoj Jarange | जरांगेंच्या मुंबई चलोवर हायकोर्टात सुनावणी! आंदोलनाला परवानगी मिळणार की ब्रेक लागणार?
छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत
CM Devendra Fadnavis | छत्रपती शिवरायांना मानणारे लोक हिंदू सणांमध्ये विघ्न आणणार नाहीत; मुख्यमंत्री फडणवीसांचा नेमका कोणाला टोला?
सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा सदावर्तेंवर पुन्हा घणाघात
Ambadas Danve vs Gunaratna Sadavarte | सरकारने, पाळलेला श्वान! अंबादास दानवेंचा गुणरत्न सदावर्तेंवर पुन्हा घणाघात; पुढे म्हणाले...
आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता...
Atul Bhatkhalkar On Aaditya | आदित्य ठाकरेंनी मुस्लिमांसाठी मातोश्रीवर गरबा ठेवावा; भाजप नेता संतापलाच