AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Monsoon update : मोठं संकट, पावसामुळे हाहाकार उडणार, इस्त्रोच्या फोटोंमुळे आयएमडीची झोप उडाली, महाराष्ट्राला मोठा इशारा

देशासह राज्यात पुन्हा एकदा पावसाचा जोर वाढणार आहे, इस्त्रोच्या सॅटेलाईटने जारी केलेल्या नव्या छायाचित्रांमुळे मोठी खळबळ उडाली आहे, देशाच्या तब्बल दोन तृतियांश भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यात आहे.

Monsoon update : मोठं संकट, पावसामुळे हाहाकार उडणार, इस्त्रोच्या फोटोंमुळे आयएमडीची झोप उडाली, महाराष्ट्राला मोठा इशारा
imd Monsoon updateImage Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Jul 19, 2026 | 3:43 PM
Share

इस्रोच्या INSAT-3DR सॅटेलाईटने भारताच्या हवामानातील मोठा बदल समोर आणला आहे. यामुळे भारतीय हवामान विभागाकडून देखील देशभरात हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे. देशाचा जवळपास दोन तृतियांश भाग हा ढगांनी व्यापून गेला आहे. जम्मू काश्मीरपासून ते गंगा नदीच्या मैदानी प्रदेशापर्यंतचा भाग ढगांनी व्यापून टाकला आहे. बिहार, पश्चिम बंगाल आणि पूर्वोत्तर राज्यांमध्ये मान्सूनच्या ढगांनी गर्दी केली आहे. मान्सून भारतामध्ये आता पूर्णपणे सक्रिय झाला आहे. या पार्श्वभूमीवर अनेक राज्यांमध्ये अति मुसळधार पावसाचा इशारा भारतीय हवामान विभागाकडून देण्यात आला आहे. काही राज्यात तर अतिवृष्टीची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाकडून सातत्याने या निर्माण झालेल्या परिस्थितीचा आढावा घेतला जात आहे.

इस्त्रोच्या सॅटेलाईटने जारी केलेल्या नव्या फोटोंमुळे मोठी खळबळ उडाली आहे. भारताचा जवळपास 60 ते 70 टक्के भाग मान्सूनच्या ढगांनी व्यापून टाकला आहे. याचाच अर्थ पुढील दोन ते तीन दिवसांमध्ये देशातील जवळपास दोन तृतियांश भागांमध्ये अति मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. पंजाब, उत्तर प्रदेश, बिहार या राज्यांमध्ये अतिवृष्टीची शक्यता आहे.

हवामान बदलाचा परिणाम

हवामान तज्ज्ञाच्या मते गेल्या काही वर्षांपासून वातावरणात मोठा बदल होत आहे. कधी-कधी अतिमुसळधार पाऊस होतो तर कधी-कधी दुष्काळासारखी परिस्थिती निर्माण होते. त्यामुळे नागरिकांनी हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर हवामान विभागाकडून देण्यात येणाऱ्या सूचनांचं पालन करावं, असं देखील नागरिकांना आवाहन करण्यात आलं आहे.

महाराष्ट्रात काय स्थिती?

महाराष्ट्रात पावसाने पुन्हा एकदा जोरदार पुनरागमन केलं आहे. भारतीय हवामान विभागाकडून तब्बल 23 जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यामध्ये पावसाचा जोर वाढणार आहे. पुणे, नाशिक, परभणी, जालना, बीड, नांदेड, हिंगोली, सोलापूर, लातूर, अमरावती, गडचिरोली, धाराशिव, बुलढाणा, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांसह अनेक जिल्ह्यांना आज पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला असून, विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा इशारा देण्यात आला आहे, या पार्श्वभूमीवर नागरिकांना हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे.

Follow Us
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान
सकाळी काही अडचणी आल्या मात्र...अमित ठाकरे दहीहंडी कार्यक्रमादरम्यान असं का म्हणाले?
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात शिंदेंचं...
गोविंदा आता ऑलिम्पिकमध्ये जायला हवा; ठाणे दहीहंडी उत्सवात एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस- अवधूत गुप्ते
एकमेकांना खांद्यावर घेऊन वर चढवणारा मराठी माणूस... दहीहंडी कार्यक्रमानिमित्त अवधूत गुप्तेंचं भावनिक वक्तव्य;
प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावत...
Mallika SherawAt Magathane Dahihandi | प्रकाश सुर्वेंच्या दही हांडी कार्यक्रमात अभिनेत्री मल्लिका शरावतची हजेरी
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ;
धनुष्यबाण मारण्याची ॲक्शन करतानाचा नवनीत राणा यांचा व्हिडीओ; मुंबईतील ही दहीहंडी चर्चेत
हम दो हमारे दो और इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं...
Gulabrao Patil : 'हम दो हमारे दो और... इंग्लिश में जाने दो' भरमंचावरून गुलाबराव पाटलांचं वक्तव्य तुफान चर्चेत
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला;
दहीहंडी उत्सवात दादूस विनायक माळींचा गोविंदांसाठी विनोदी सल्ला; प्रेक्षकांचं मन जिंकणाऱ्या संवादाची सर्वत्र चर्चा
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची...
भरती परिक्षांबाबत महाराष्ट्र सरकारचा मोठा निर्णय, सात अधिकाऱ्यांची समिती...
दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर...
MNS Avinash Jadhav Dahi Handi 2026 : दहीहंडीचा थरार! साई राम गोविंदा पथकाने रचले 10 थर
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई
Essel Group च्या सुभाष चंद्रा यांना मोठा धक्का; CBI ची मोठी कारवाई, थेट 1,322 कोटी...