AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

दररोज सॅलड खाताय, पण त्याचा तुमच्या शरीराला किती फायदा होतोय? जाणून घ्या डॉक्टर काय म्हणतात

आजच्या धावपळीच्या जीवनात डॉक्टर कायम निरोगी राहण्याचा सल्ला देत असतात. अशात निरोगी राहण्यासाठी सॅलड एक उत्तम पर्याय आहे... जर तुम्ही रोज सॅडल खात असाल तर, त्याचे फायदे तुम्हाला नक्कीच होतील, तर जाणून घ्या सॅलड आरोग्यासाठी किती लाभदायक आहे.

दररोज सॅलड खाताय, पण त्याचा तुमच्या शरीराला किती फायदा होतोय? जाणून घ्या डॉक्टर काय म्हणतात
| Updated on: Jul 19, 2026 | 3:47 PM
Share

वजन कमी करण्यापासून ते पोटाच्या विविध समस्या दूर करण्यापर्यंत, आजची पिढी सर्वात जास्त महत्त्व काकडी, टोमॅटो आणि लेट्यूसच्या पानांना देते. बऱ्याच लोकांना वाटतं की दररोज फक्त एक वाटी कच्चं सॅलड खाल्ल्याने शरीराला सर्व पोषक तत्वं मिळतील. पण डॉक्टर स्वदेश मन्ना यांनी ही कल्पना पूर्णपणे खोडून काढली आहे. त्यांचा स्पष्ट दावा आहे की या सवयीमुळे अधिक फायदा होत नाही. जर तुम्हाला वाटत असेल की दररोज नाश्त्यात किंवा रात्रीच्या जेवणात फक्त एक वाटी सॅलड खाऊन तुम्ही तुमच्या फायबरची दैनंदिन गरज पूर्ण करत आहात, तर तुम्ही खूप मोठी चूक करत आहात.

निरोगी आणि ताजेतवाने शरीरासाठी फायबरयुक्त पदार्थ आवश्यक आहेत. ते आपली पचनसंस्था सक्रिय ठेवते आणि पोट निरोगी ठेवते, बद्धकोष्ठता दूर करते आणि रक्तातील हानिकारक कोलेस्ट्रॉलची पातळी नियंत्रित करण्यासाठी ढाल म्हणून काम करते. या संदर्भात डॉ. स्वदेश मन्ना म्हणाले, “ज्या भाज्यांपासून आपण सहसा सॅलड बनवतो, त्यापैकी बहुतेक भाज्यांमध्ये पाणीच जास्त असते. त्यामध्ये फायबरचे प्रमाण नगण्य असते, ज्याला शास्त्रीय भाषेत ‘लो डेन्सिटी फायबर’ म्हटले जाते.”

मात्र, वैद्यकीय शास्त्रानुसार, निरोगी राहण्यासाठी एका प्रौढ व्यक्तीला दररोज सरासरी 25 ते 30 ग्रॅम फायबरचे सेवन करणे आवश्यक आहे. डॉ. मन्ना यांनी सांगितल्यानुसार, जर तुम्हाला केवळ सॅलड खाऊन फायबरची ही प्रचंड गरज पूर्ण करायची असेल, तर तुम्हाला दररोज किमान काही किलो कच्च्या भाज्या चावून खाव्या लागतील! जे एखाद्या व्यक्तीसाठी पचवणे किंवा खाणे व्यावहारिकदृष्ट्या अशक्य आहे.

तर शरीराला पुरेसे फायबर कसे मिळू शकते? यावर डॉक्टर म्हणतात, फायबरसाठी तुमच्या आहारात असे काही पदार्थ असायला हवेत, जे कमी प्रमाणात खाल्ले तरी शरीराला योग्य पोषण देऊ शकतील. म्हणजेच, तुम्हाला तुमच्या आहारात ‘उच्च घनतेच्या फायबर’ने समृद्ध असलेल्या पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे, ज्यावर सहसा चर्चा होत नाही.

फायबरच्या या कमतरतेवर मात करण्याचे मार्ग स्पष्ट करताना डॉ. स्वदेश मन्ना म्हणाले, “या कमतरतेवर मात करण्यासाठी, तुम्ही तुमच्या रोजच्या आहारात ओट्स, विविध प्रकारची कडधान्ये, संपूर्ण धान्य आणि फळांच्या सालींचा अधिक समावेश केला पाहिजे.” डॉक्टर सल्ला देतात की, हे पदार्थ नियमितपणे खाल्ल्याने शरीराची 25 ते 30 ग्रॅम फायबरची दैनंदिन गरज सहज पूर्ण होईल. त्यामुळे, आजपासून केवळ सॅलडवर अवलंबून राहण्याऐवजी आहारात हा आवश्यक बदल करणे खूप महत्त्वाचे आहे. पण आहारात कोणतीही बदल करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

Follow Us
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याने सांगूनच टाकलं...
NCP | दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? बड्या नेत्याने सांगूनच टाकलं...
उद्यापासून संसदेत घमासान? केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
उद्यापासून संसदेत घमासान? केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...
ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट, पोलीस बंदोबस्त...
Mumbai | ठाकरे गटाच्या आंदोलनाबाबत मोठी अपडेट, पोलीस बंदोबस्त...
कागदावर केवळ 100 टक्के नालेसफाई; KDMCची मोठी पोलखोल
KDMC | कागदावर केवळ 100 टक्के नालेसफाई; KDMCची मोठी पोलखोल
दिल्लीत राजकीय घडमोडींना वेग! सर्वपक्षीय बैठकीत मोठा गोंधळ, TMC पक्ष..
दिल्लीत राजकीय घडमोडींना वेग! सर्वपक्षीय बैठकीत मोठा गोंधळ, TMC च्या फुटीर खासदारांना...
शाळेतील मुख्यध्यापिका कॅबिनमध्येच झोपलेल्या अन् मद्यधुंद पतीची थेट..
शाळेतील मुख्यध्यापिका कॅबिनमध्येच झोपलेल्या अन् तिचा मद्यधुंद पती... व्हिडीओच आला समोर
राम मंदिरातील दानाचा हिशोब जाहीर करा... राहुल-खर्गेंची मोठी मागणी
Ram Mandir | राम मंदिरातील दानाचा हिशोब जाहीर करा... राहुल-खर्गेंची पंतप्रधान मोदींना मोठी मागणी
पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली! राष्ट्रवादी नेत्याकडून महाजनांना...
पडद्याआड मोठ्या राजकीय हालचाली! राष्ट्रवादी नेत्याकडून गिरिश महाजनांना निमंत्रण
हिमाचलमध्ये महाभयंकर तांडव! 100 कोटींचा लोखंडी पूल पुरात वाहून गेला
Himachal Pradesh Landslide | हिमाचलमध्ये महाभयंकर तांडव! 100 कोटींचा लोखंडी पूल पुरात वाहून गेला, अनेक गावांचा संपर्क तुटला
सगळं उद्ध्वस्त झालं! जम्मू काश्मीरमध्ये हाहाकार, तब्बल 500...
सगळं उद्ध्वस्त झालं! जम्मू काश्मीरमध्ये हाहाकार, तब्बल 500 वाहनं नदीत वाहून गेली
Monsoon update : मोठं संकट, पावसामुळे हाहाकार उडणार, इस्त्रोच्या फोटोंमुळे आयएमडीची झोप उडाली, महाराष्ट्राला मोठा इशारा.

Monsoon update : मोठं संकट, पावसामुळे हाहाकार उडणार, इस्त्रोच्या फोटोंमुळे आयएमडीची झोप उडाली, महाराष्ट्राला मोठा इशारा

भारतासह जगभरात फेसबुक ठप्प, अचानक अकाऊंट गायब; जगभरात मोठी खळबळ.

भारतासह जगभरात फेसबुक ठप्प, अचानक अकाऊंट गायब; जगभरात मोठी खळबळ

IND vs ENG, 3rd ODI: भारत आणि इंग्लंडसाठी ‘करो या मरो’ची लढाई, कौल इंग्रजांनी जिंकला आणि….

IND vs ENG, 3rd ODI: भारत आणि इंग्लंडसाठी ‘करो या मरो’ची लढाई, कौल इंग्रजांनी जिंकला आणि…

FIFA World Cup 2026 Final: मेस्सीसाठी अंतिम सामन्यातील पहिली 55 मिनिटं खूपच महत्त्वाची, कारण….

FIFA World Cup 2026 Final: मेस्सीसाठी अंतिम सामन्यातील पहिली 55 मिनिटं खूपच महत्त्वाची, कारण…

मोठा ट्विस्ट… दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, विलिनीकरण होणार नााहीच… बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ; कारणही दिलं.

मोठा ट्विस्ट… दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार नाही, विलिनीकरण होणार नााहीच… बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ; कारणही दिलं

सातारा निसर्ग सौंदर्याने नटला, प्रसिद्ध धबधब्यांचं विहंगम दृश्य, Photo पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!.

सातारा निसर्ग सौंदर्याने नटला, प्रसिद्ध धबधब्यांचं विहंगम दृश्य, Photo पाहून तुम्हीही पडाल प्रेमात!