AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्यापासून संसदेत घमासान? केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत...

उद्यापासून संसदेत घमासान? केंद्रीय मंत्रीमंडळाच्या विस्ताराबाबत…

| Updated on: Jul 19, 2026 | 2:32 PM
Share

उद्यापासून संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरू होत असून, त्याआधीच दिल्लीतील राजकीय हालचालींना वेग आला आहे. केंद्र सरकार दोन महत्त्वाची विधेयके संसदेत मांडण्याच्या तयारीत असल्याची माहिती सूत्रांकडून समोर आली आहे. त्यामुळे आगामी अधिवेशनात या विषयांवर जोरदार चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या महत्त्वाच्या बैठकीत परिसीमन विधेयक आणि महिला आरक्षण विधेयकाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. या दोन्ही विधेयकांना आगामी अधिवेशनात मांडण्याबाबत प्राथमिक स्तरावर सकारात्मक निर्णय घेण्यात आल्याचे सांगितले जात आहे.

ही विधेयके संसदेत मंजूर करून घेण्यासाठी केंद्र सरकारने राजकीय रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विविध केंद्रीय मंत्र्यांना इतर राजकीय पक्षांच्या नेत्यांशी संवाद साधून आवश्यक पाठिंबा मिळवण्याची जबाबदारी देण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

दरम्यान, उद्यापासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनात या दोन्ही विधेयकांवर व्यापक चर्चा होण्याची शक्यता आहे. सरकार आणि विरोधकांमध्ये या मुद्द्यांवर जोरदार वादविवाद होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे देशाचे लक्ष आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनाकडे लागले असून, पुढील काही दिवस महत्त्वाच्या राजकीय घडामोडींनी गाजण्याची चिन्हे आहेत.

Published on: Jul 19, 2026 02:32 PM

Follow Us