AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

निसर्गाने उधळली सौंदर्याची मुक्त उधळण! साताऱ्याचे धबधबे ओसंडून वाहू लागले

निसर्गाने उधळली सौंदर्याची मुक्त उधळण! साताऱ्याचे धबधबे ओसंडून वाहू लागले

| Updated on: Jul 19, 2026 | 4:01 PM
Share

सातारा जिल्ह्यात मुसळधार पावसानंतर निसर्गाचे अप्रतिम रूप पाहायला मिळत असून, सह्याद्रीच्या कुशीत वसलेले अनेक धबधबे ओसंडून वाहू लागले आहेत. जिल्ह्यातील कास रोड, वजराई, ठोसेघर, लिंगमळा आणि केळवली धबधब्यांच्या मनमोहक दृश्यांचा आनंद घेण्यासाठी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागातील धबधबे पुन्हा एकदा प्रवाहित झाले आहेत. विशेषतः कास रोडवरील धबधब्यात भिजण्याचा आनंद घेण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने येत असून, परिसरात उत्साहाचे वातावरण आहे.

दरम्यान, सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये वसलेला भारतातील सर्वात उंच भांबवली वजराई धबधबा देखील पूर्ण क्षमतेने प्रवाहित झाला आहे. तब्बल 1,840 फूट (560 मीटर) उंचीवरून तीन टप्प्यांत कोसळणारा हा धबधबा पर्यटकांसाठी विशेष आकर्षण ठरत आहे. कास तलाव पूर्ण क्षमतेने भरल्यामुळे सांडव्यावरून वाहणारे पाणी सुमारे पाच किलोमीटरपर्यंत विहंगम दृश्य निर्माण करत आहे.
साताऱ्याजवळील प्रसिद्ध ठोसेघर धबधबा देखील ओसंडून वाहत असून, दरीत कोसळणाऱ्या पाण्याचे रम्य दृश्य पाहण्यासाठी शनिवार-रविवारी पर्यटकांची मोठी गर्दी होत आहे. त्याचप्रमाणे महाबळेश्वरमधील प्रसिद्ध लिंगमळा धबधबा रौद्ररूप धारण करत प्रवाहित झाला असून, धुक्याची चादर, थंड वारे आणि कोसळणारा धबधबा पर्यटकांना मंत्रमुग्ध करत आहे.

याशिवाय साताऱ्यातील परळी खोऱ्यातील केळवली धबधबा देखील पावसानंतर पुन्हा प्रवाहित झाला असून, निसर्गप्रेमी आणि पर्यटक या ठिकाणी मोठ्या संख्येने भेट देत आहेत. दरम्यान, धबधब्यांवर पर्यटकांची वाढती गर्दी लक्षात घेता प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. धबधब्यांकडे जाणारे रस्ते निसरडे आणि धोकादायक झाले असल्याने काळजीपूर्वक प्रवास करावा, तसेच सुरक्षित अंतर राखूनच निसर्गाचा आनंद घ्यावा, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे.

Published on: Jul 19, 2026 04:01 PM

Follow Us
Monsoon update : मोठं संकट, पावसामुळे हाहाकार उडणार, इस्त्रोच्या फोटोंमुळे आयएमडीची झोप उडाली, महाराष्ट्राला मोठा इशारा.

Monsoon update : मोठं संकट, पावसामुळे हाहाकार उडणार, इस्त्रोच्या फोटोंमुळे आयएमडीची झोप उडाली, महाराष्ट्राला मोठा इशारा

भारतासह जगभरात फेसबुक ठप्प, अचानक अकाऊंट गायब; जगभरात मोठी खळबळ.

भारतासह जगभरात फेसबुक ठप्प, अचानक अकाऊंट गायब; जगभरात मोठी खळबळ

हे अजिबात सोपं नाही..; ‘रामायणम्’मधील हनुमानाच्या भूमिकेबद्दल सनी देओल स्पष्टच बोलला...

हे अजिबात सोपं नाही..; ‘रामायणम्’मधील हनुमानाच्या भूमिकेबद्दल सनी देओल स्पष्टच बोलला..

IND vs ENG, 3rd ODI: भारत आणि इंग्लंडसाठी ‘करो या मरो’ची लढाई, कौल इंग्रजांनी जिंकला आणि….

IND vs ENG, 3rd ODI: भारत आणि इंग्लंडसाठी ‘करो या मरो’ची लढाई, कौल इंग्रजांनी जिंकला आणि…

Success Story: 38,000 ची नोकरी सोडली आणि चहाचा धंदा सुरु केला, आता महिन्याला कमावतो लाखो रुपये.

Success Story: 38,000 ची नोकरी सोडली आणि चहाचा धंदा सुरु केला, आता महिन्याला कमावतो लाखो रुपये

FIFA World Cup 2026 Final: मेस्सीसाठी अंतिम सामन्यातील पहिली 55 मिनिटं खूपच महत्त्वाची, कारण….

FIFA World Cup 2026 Final: मेस्सीसाठी अंतिम सामन्यातील पहिली 55 मिनिटं खूपच महत्त्वाची, कारण…