AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एक कुत्रं मुंबईत “निलेशचंद्र” या नावाने मोकाट… ठाकरेंच्या शिलेदाराचा जोरदार हल्लाबोल; ट्विटवरील फोटोने खळबळ

Akhil Chitre and Jain Muni : जैन मुनी निलेशचंद्र यांनी देखील उद्धव ठाकरे यांच्या राम रक्षा आंदोलनावर टीका केली होती. याला आता ठाकरे गटाकडून उत्तर देण्यात आले आहे.

एक कुत्रं मुंबईत निलेशचंद्र या नावाने मोकाट... ठाकरेंच्या शिलेदाराचा जोरदार हल्लाबोल; ट्विटवरील फोटोने खळबळ
akhil chitre on Jain MuniImage Credit source: X
| Updated on: Jul 19, 2026 | 4:03 PM
Share

अयोध्येतील राम मंदिरातील दानपेटीतील चोरी झाल्याचे समोर आले आहे. यावंतर ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. उद्धव ठाकरेंकडून अनेक ठिकाणी आंदोलन केले जात आहे. भाजपचे नेते ठाकरेंच्या या आंदोलनावर टीका करत आहेत. जैन मुनी निलेशचंद्र यांनीदेखील ठाकरेंना डिवचलं होतं. याला आता ठाकरे गटाकडून उत्तर देण्यात आले आहे. अखिल चित्रे यांनी ट्विटरवर एक फोटो पोस्ट करत निलेशचंद्र यांच्यावर सडकून टीका केली आहे.

काय म्हणाले होते जैन मुनी निलेशचंद्र?

जैन मुनी निलेशचंद्र यांनी उद्धव ठाकरे यांच्या रामरक्षा आंदोलनावर बोलताना म्हटले होते की, ‘उद्धव ठाकरे यांना ज्यावेळी हनुमान चालीसा वाचण्याची आवश्यता होती, त्यावेळी त्यांनी नवनीत राणा यांना 14 दिवस तुरुंगात धाडलं. त्यांना आंदोलनात धड वाचता देखील येत नाही. खरंतर त्यांनी कुराण पठण केलं पाहिजे. राम रक्षा त्यांच्या गरजेची नसून त्यांना श्राप लागलाय. आता त्यांना शुद्धीकरणाची गरज आहे. आम्ही राम मंदिरातील चोरी पाहून घेऊ. आमच्या बाबी आम्ही बघून घेऊ. तुम्ही तुमचं पाहा. खरंतर श्रीरामाला धन आणि वैभवाची आवश्यकता लागत नाही.’

अखिल चित्रे यांचे ट्विट

जैन मुनी निलेशचंद्र यांच्या या विधानावर बोलताना ठाकरेंच्या शिवसेनेचे अखिल चित्रे यांनी म्हटले की, ‘ज्या कुत्र्यांनी चढावा चोरी होत असताना भुंकायला पाहिजे होतं, ते आता चोरी पकडल्यानंतर का भुंकत आहेत? याचा अर्थ इतकाच की, चढावा चोरीत फक्त ट्रस्टीच नव्हे, तर त्यांना पाठीशी घालणारी काही कुत्रीही सहभागी होती. त्यातलं एक कुत्रं मुंबईत “निलेशचंद्र” या नावाने मोकाट फिरत आहे. पवित्र धर्माच्या आड लपून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करत आहे. लय पिसाळलंय!

पुढे BMC ला टॅग करत अखिल चित्रे यांनी म्हटले की, याचा फोटो पाठवत आहे. वेळीच याच्या मुसक्या आवळा. पिसाळलेला निलेशचंद्र. आणि हो… राम मंदिरासाठी रस्त्यावर उतरून लढणाऱ्या शिवसैनिकांचीच आम्ही लेकरं आहोत. आम्ही राम मंदिरातील दरोडेखोरीविरुद्ध आवाज उठवत आहोत. त्या आवाजाचा त्रास त्यांनाच होतोय, ज्यांना या दरोडेखोरीला पाठीशी घालायचं आहे.

Follow Us
मतदार यादीतील फेरफारवरून उद्धव ठाकरेंनी शिंदे गटावर साधला निशाणा
उद्धव ठाकरेंचा गंभीर आरोप: महाराष्ट्रातून दोन कोटी मतदार वगळले, भविष्यात बनावट मतदारांचा धोका
डीजे परवानगीशिवाय वाजवला, पुण्यातील मंडळाला कोर्टाकडून दोषी ठरवून दंड
पुण्यात जुलूसदरम्यान अनधिकृत डीजे; अल मदिना यंग बॉईज सर्कलला कोर्टाचा दणका
जोरदार पावसामुळे दिल्लीतील प्रमुख मार्गांवर पाणी साचले, वाहतूक मंदावली
दिल्लीत मुसळधार पाऊस: सुब्रतो पार्क परिसरात भीषण वाहतूक कोंडी, जनजीवन विस्कळीत
सोनिया गांधी आत्मचरित्र बिलॉन्गिंग हार्परकॉलिन्स इंडिया प्रकाशित करणार
सोनिया गांधींच्या बिलॉन्गिंग: अ जर्नी ऑफ लव आत्मचरित्राचा मार्ग मोकळा, हार्परकॉलिन्स करणार प्रकाशन
नागपूरनंतर आता सोलापूर आणि संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
नागपूरनंतर आता सोलापूर आणि छत्रपती संभाजीनगरात डीजे आणि लेझर लाईटवर बंदी
गद्दार कोण आणि... हे जनतेनं दाखवलं, सरनाईकांचा विरोधकांना टोला
Pratap Sarnaik | गद्दार कोण आणि खुद्दार कोण हे जनतेनं दाखवलं, प्रताप सरनाईकांचा विरोधकांना टोला
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा भुजबळांना थेट इशारा
दम धरा, सगळं होईल, डाव सगळे होतील! मनोज जरांगेंचा छगन भुजबळांना थेट इशारा
परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? बापटांचा सवाल
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | परंपरा म्हणून ढोल-ताशांचा त्रास का सहन करायचा? विद्यानंद बापटांचा धंगेकरांना थेट सवाल
जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा..
Satej Patil on Manoj Jarange Protest | जरांगे पाटलांना काही झालं तर महाराष्ट्र सरकार जबाबदार! सतेज पाटलांचा थेट इशारा; मराठा आरक्षणावरून सरकारवर घणाघात
पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर-बापट यांच्यात खडाजंगी
Ravindra Dhangekar Vs Vidyanand Bapat | पुण्यात DJच्या आवाजावरून रवींद्र धंगेकर- विद्यानंद बापट यांच्यात खडाजंगी,  व्हिडीओ बघाच