AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्धव ठाकरे यांनी कुराणाचं पठण करावं; रामरक्षा आंदोलनावरून जैन मुनी निलेशचंद्रांचं टीकास्त्र

jain muni nileshchandra : जैन मुनी निलेशंचंद्र यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. ठाकरेंनी कुराण वाचलं पाहिजे, अशा शब्दात त्यांनी निशाणा आहे.

उद्धव ठाकरे यांनी कुराणाचं पठण करावं; रामरक्षा आंदोलनावरून जैन मुनी निलेशचंद्रांचं टीकास्त्र
| Updated on: Jul 18, 2026 | 1:54 PM
Share

अयोध्येतील राम मंदिरातील देणगीतील गैरव्यवहार प्रकरणावरून ठाकरे गटाने आक्रमक पवित्रा घेतला आहे. ठाकरे गट या गैरव्यवहार प्रकरणावरून मुंबईनंतर आता नागपुरात आंदोलन करणार आहे. नागपुरातील रामरक्षा आंदोलनासाठी ठाकरे गटाने अनेक हिंदुत्ववादी संघटनांना आमंत्रण दिलं आहे. परंतु रामरक्षा आंदोलनावरून ठाकरेंना सत्ताधाऱ्यांच्या टीकेला सामोरे जावे लागत आहे. भाजपच्या नेत्यांच्या टीकेनंतर आता जैन मुनी निलेशचंद्र यांनी ठाकरेंना डिवचलं आहे.

जैन मुनी निलेशचंद्र यांनी माध्यमाशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार घणाघात केला आहे. ‘रामरक्षा वाचण्यापेक्षा त्यांनी कुराण वाचावं. औरंगजेब हा भाऊ असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यांना रामरक्षा हनुमान चालीसा पठण करण्याची गरज नाही, अशा शब्दात निलेशचंद्र यांनी घणाघात केल आहे.

अमरावतीत बोलताना निलेशचंद्र यांनी ठाकरेंवर जोरदार टीका केली. ‘उद्धव ठाकरे यांना ज्यावेळी हनुमान चालीसा वाचण्याची आवश्यता होती, त्यावेळी त्यांनी नवनीत राणा यांना 14 दिवस तुरुंगात धाडलं. त्यांना आंदोलनात धड वाचता देखील येत नाही. खरंतर त्यांनी कुराण पठण केलं पाहिजे. राम रक्षा त्यांच्या गरजेची नसून त्यांना श्राप लागलाय. आता त्यांना शुद्धीकरणाची गरज आहे’, अशी टीका त्यांनी केली.

‘आम्ही राम मंदिरातील चोरी पाहून घेऊ. आमच्या बाबी आम्ही बघून घेऊ. तुम्ही तुमचं पाहा. खरंतर श्रीरामाला धन आणि वैभवाची आवश्यकता लागत नाही. राम मंदिरासाठी आंदोलन का केलं नाही? राज्यात देवाभाऊंचं सरकार आहे. देवाभाऊ हे राम आहेत. ठाकरेंनी कुराण वाचावं. त्यांना कुराणाची गरज आहेत. त्यांच्यासाठी रामरक्षा कवच नाही, असे निलेशचंद्र यांनी पुढे म्हटलं.

तत्पूर्वी, ठाकरे गटाने नागपूरच्या रामनगरमध्ये रामरक्षा पठण आंदोलन आयोजित केलंय. आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरातील विविध ठिकाणी आंदोलनाचे बॅनर लागले आहेत. रामद्रोह, हिंदूद्रोह म्हणाजे देशद्रोह या आशयाचे बॅनर ठाकरे गटाने सर्वत्र लावले आहेत. रामनगरमधील मंदिर परिसरात भगव्या पताका लावल्यात. त्याचबरोबर मंदिर देखील फुलांनी सजवलं आहे. रामरक्षा आंदोलन 4 वाजता होणार आहे. या आंदोलनात ठाकरे काय बोलणार, याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

Follow Us
सलमाननंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर?
Aamir Khan Threat | सलमाननंतर आता आमिर खान बिश्नोई गँगच्या निशाण्यावर? व्हायरल पोस्ट-ऑडिओमागचं सत्य काय?
माझा फोनदेखील... सोनम वांगचुक यांच्या पत्नी एकाएकी संतापल्या
माझा फोनदेखील... सोनम वांगचुक यांच्या पत्नी एकाएकी संतापल्या; रुग्णालय परिसरात असं काय घडलं?
हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस!
Amit Thackeray | हा लोकशाहीच्या इतिहासातील काळा दिवस! सोनम वांगचुक यांच्या आंदोलनावरून अमित ठाकरेंचा केंद्र सरकारवर घणाघात
NDA मध्ये येताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार मोठं गिफ्ट?
NDA मध्ये येताच राष्ट्रवादी शरद पवार गटाला मिळणार मोठं गिफ्ट? पडद्याआड हालचाली वाढल्या
भारताचा अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिलं खासगी रॉकेट लॉन्च
भारताचा अवकाश क्षेत्रात नवा इतिहास! पहिलं खासगी रॉकेट यशस्वीरित्या लॉन्च; पहा व्हिडीओ
अजून किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार?
Uddhav Thackeray | अजून किती बळी घेतल्यावर धर्मेंद्र प्रधान राजीनामा देणार? सरकारने जाहीर करावं; उद्धव ठाकरेंचा संतप्त सवाल!
सिया केतन प्रकरण! केतनच्या बहिणीची भावनिक हाक; न्यायासाठी थेट.....
सिया केतन प्रकरण! केतनच्या बहिणीची भावनिक हाक; न्यायासाठी थेट.....
भोंदू खरात प्रकरण पुन्हा चर्चेत! ED कडून तब्बल 3000 पानांचं... कोर्टात
Ashok Kharat | भोंदू खरात प्रकरण पुन्हा चर्चेत! ED कडून तब्बल 3000... कोर्टात नेमकं काय घडतंय?
केंद्रात तीन मंत्रिपदे हवीत, शिंदे सेनेची मोठी लॉबिंग; काय घडतंय?
Shivsena | केंद्रात तीन मंत्रिपदे हवीत, शिंदे सेनेची मोठी लॉबिंग; काय घडतंय?
रामगिरीवर खलबतं सुरू! मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला बावनकुळे दाखल; च
Chandrashekhar Bawankule Meet Devendra Fadnavis | रामगिरीवर खलबतं सुरू! मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला बावनकुळे दाखल; चर्चा गुलदस्त्यात?
जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक.

जंतरमंतरवर जाताच अमित ठाकरेंनी वाढवले मोदी सरकारचे टेन्शन…दिल्लीतील आंदोलन देशभर पोहचवण्याची दिली हाक

सिया आणि सोनमपेक्षाही खतरनाक… झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत घुसवला साप, अंगावर काटा येणारं हत्याकांड; बायको बनली हैवान.

सिया आणि सोनमपेक्षाही खतरनाक… झोपेच्या गोळ्या, नंतर चादरीत घुसवला साप, अंगावर काटा येणारं हत्याकांड; बायको बनली हैवान

Sonam Wangchuk : खरचं मानलं पाहिजे, सोनम वांगचूक यांची लोकांच्या फायद्याची तीन जबरदस्त इनोवेशन्स, सायन्सने समाज बदलण्याची जिद्द.

Sonam Wangchuk : खरचं मानलं पाहिजे, सोनम वांगचूक यांची लोकांच्या फायद्याची तीन जबरदस्त इनोवेशन्स, सायन्सने समाज बदलण्याची जिद्द

Vikram 1 Launch : ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण, भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटमधून उपग्रहांचं यशस्वी लॉन्चिंग.

Vikram 1 Launch : ऐतिहासिक आणि अभिमानाचा क्षण, भारताच्या पहिल्या खासगी रॉकेटमधून उपग्रहांचं यशस्वी लॉन्चिंग

अभिमान वाटावा असंच… नीटमध्ये महाराष्ट्राची कन्या मुलींमध्ये देशात पहिली, कोण आहे श्रावणी कुदळे?.

अभिमान वाटावा असंच… नीटमध्ये महाराष्ट्राची कन्या मुलींमध्ये देशात पहिली, कोण आहे श्रावणी कुदळे?

‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?.

‘आमचा जीव कसा लागणार?’ अभिजीत दीपकेंची आमरण उपोषणाची घोषणा, आई-वडिलांनी सरकारला सुनावले काय?