AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Esha Koppikar : ईशा कोप्पिकरने का नाकारला आमिर खानचा ‘दिल चाहता है’? अनेक वर्षांनंतर केला खुलासा

अभिनेत्री ईशा कोप्पिकर हिला 'दिल चाहता है' चित्रपटात रोल ऑफर झाला होता. पण एका कारणामुळे 2001 साली आलेल्या या सुपरहिट चित्रपटाचा ती भाग होऊ शकली नाही.

Esha Koppikar : ईशा कोप्पिकरने का नाकारला आमिर खानचा ‘दिल चाहता है’? अनेक वर्षांनंतर केला खुलासा
| Updated on: Oct 21, 2026 | 9:57 PM
Share

बॉलिवड अभिनेत्री ईशा कोप्पीकर.. आजकाल ती इंडस्ट्रीत फार दिसत नसली तरी एकेकाळी तिने मोठा पडदा चांगलाच गाजवला. अनेक चित्रपटात काम केलेल्या ईशाचे असंख्य चाहते आहेत. बऱ्याच काळापासून मोठ्या पडद्यापासून दूर असलेल्या ईशाने, फिल्म इंडस्ट्रीमधला तिचा आत्तापर्यंतचा प्रवास तसेच बदलत्या काळासोबत स्वत:मध्ये बदल करण्याची गरज, त्याचं महत्व यावर भाष्य केलं. तेलुगु आणि तामिळ फिल्म्समध्ये सुरूवातील केलेलं काम, त्यानंतर ईशा ही ‘कंपनी’ आणि ‘एक विवाह ऐसा भी’ अशा अनेक हिंदी चित्रपटांत झळकली. इंडस्ट्रीमध्ये मोठं करिअर करायचं असेल तर एक अभिनेत्री म्हणून सतत ॲक्टिव्ह राहणं गरजेचं असतं, या मुद्यावर तिने जोर दिला . याच दरम्यान तिने एक मोठा खुलासाही केला. 2001 मध्ये आलेले लोकप्रिय सिनेमा ‘दिल चाहता है’मध्ये काम करण्याची ऑफर तिला मिळाली होती, मात्र तिने ती नाकारली. तो चित्रपट रिजेक्ट करण्याचा आजही पश्चाताप वाटतो, असं तिने कबूल केलं.

काळाप्रमाणे कलाकाराने बदलणं गरजेचं आहे

एका मुलाखतीत अभिनेत्री ईशाने तिच्या अभिनय कारकिर्दीतील अनेक आठवणींना उजाळा दिला. कलाकारांनी काळानुसार स्वतःमध्ये बदल करणं, वेगवेगळ्या भूमिका स्वीकारणं आणि अभिनय क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण करणें याविषयी तिने विचार मांडले. ईशा म्हणाली, “ कलाकार म्हणून आपण करू शकणारी सर्वांत चांगली गोष्ट म्हणजे वयानुसार स्वतःला बदलत राहणे आणि नव्या गोष्टी आत्मसात करणे. अनेकदा कलाकारांना असं वाटतं की आपलं वय वाढतच नाही. मात्र, बदल स्वीकारून वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका साकारणं महत्त्वाचे आहे. सतत एकाच प्रकारच्या भूमिका केल्याने कामात तोचतोचपणा येतो. प्रेक्षकांनाही कलाकाराला वारंवार एकाच भूमिकेत पाहण्याचा कंटाळा येऊ शकतो.” असं तिने नमूद केलं.

“सुरुवातीला मी अशा वेगळ्या भूमिका साकारण्यासाठी फारशी तयार नव्हते. यापूर्वी मी अनेक साध्या आणि सरळ स्वभावाच्या मुलींच्या भूमिका केल्या होत्या. त्यामुळे वेगळ्या धाटणीच्या भूमिकांमध्ये मी स्वतःला कधी पाहिलंच नव्हतं. मात्र, माझ्या दिग्दर्शकांनी माझ्यातील ‘खल्लास’ गर्ल प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला.” असं ईशाने सांगितलं.

ॲक्टिंग करिअरबद्दल ईशाचं स्पष्ट मत

एका प्रोजेक्टनंतर लागोपाठ दुसरा प्रोजेक्ट करण्याऐवजी ईशा कोप्पिकरने चित्रपटांची निवड करताना नेहमीच विचारपूर्वक निर्णय घेतला. याबाबत बोलताना तिने सर्जनशीलतेशी तडजोड न करण्याचे महत्त्व सांगितलं. “ जर तुम्ही आर्थिकदृष्ट्या पूर्णपणे अभिनय कारकिर्दीवर अवलंबून असाल, तर कधी ना कधी तुम्हाला सर्जनशीलतेच्या बाबतीत तडजोड करावी लागू शकते. मात्र, तुम्हाला अभिनयाची खरोखर आवड असेल, तर आपल्या सर्जनशीलतेशी तडजोड न करणे अत्यंत महत्त्वाचं आहे ” असं ती म्हणाली.

का नाकारला दिल चाहता है ?

यावेळी तिने एक मोठा खुलासा केला. ईशाच्या कारकिर्दीत काही महत्त्वाच्या भूमिका तिच्या हातून निसटल्या. त्यामागे आधीच स्वीकारलेल्या चित्रपटांशी असलेली कमिटमेंट हे एक कारण होतं. अशाच एका प्रसंगाची आठवण सांगताना तिने ‘दिल चाहता है’ या लोकप्रिय चित्रपटाचा उल्लेख केला. या चित्रपटात सैफ अली खानच्या विरुद्ध सोनाली कुलकर्णी हिने जी भूमिका साकारली, तो रोल आधी ईशाला ऑफर करण्यात आला होता. मात्र, आधीच दुसऱ्या चित्रपटासाठी होकार दिल्यामुळे तिला ही संधी नाकारावी लागली. याबद्दल ईशा म्हणाली, “ ‘दिल चाहता है’ चित्रपटातील सोनाली कुलकर्णी हिची भूमिका मला ऑफर झाली होती. मात्र, मी त्याआधीच ‘प्यार इश्क और मोहब्बत’ या चित्रपटासाठी कमिटेड होते, त्यामुळे मला ही ऑफर नाकारावी लागली. आजही मला त्या निर्णयाचा पश्चात्ताप होतो.” असं तिने खेदाने नमूद केलं.

सोनू सूदसोबत काम करण्याचा अनुभव कसा होता ?

‘एक विवाह ऐसा भी’ हा चित्रपट ईशा कोप्पिकर हिच्या कारकिर्दीतील खास चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटातील ‘चांदनी’ या भूमिकेबद्दल बोलताना तिच्यातील साधेपणा आपल्याला भावला, असं ईशाने सांगितलं. “ चांदनी या व्यक्तिरेखेतील साधेपणा मला माझ्या स्वभावासारखा वाटतो. कारण खऱ्या आयुष्यात मीसुद्धा खूप साधी आहे.” राजश्री प्रॉडक्शनसोबत काम करणं हा उत्तम अनुभव होता असं सांगतानाच तिने सोनू सूद या अभिनेता-सहकलाकाराचं भरभरून कौतुक केलं.

ईशा कोप्पिकरने 1997 साली ‘W/o V. वारा प्रसाद’ या तेलुगू चित्रपटातून फिल्मी करिअरची सुरूवात केसी. तर 1998 साली तिने ‘कादल कविताई’ या चित्रपटातून तमिळ इंडस्ट्रीत पाऊल ठेवलं. 2000 साली तिने ‘फिजा’ चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश केला.

Follow Us
टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली....
Tiger Shroff : टायगर श्रॉफ प्रकरणातील सुनावणीला सुरुवात; पोलिसांनी मागितली 14 दिवसांची कोठडी
दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची ठाकरे- राऊतांवर बोचरी टीका
Navnath Ban on Uddhav Thackeray : दसरा मेळावा की कॉमेडी सर्कस? नवनाथ बन यांची उद्धव ठाकरे-संजय राऊतांवर बोचरी टीका, पुढे म्हणाले...
उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...
Gunratna Sadavarte : उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि मनोज जरांगे यांचे मेळावे म्हणजे...; गुणरत्न सदावर्तेंचा जोरदार हल्लाबोल
सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, पडद्यामागे नेमकं काय घडलं?
Sangli Bank Election : सुमन पाटलांची निवडणुकीतून माघार, सांगलीच्या राजकारणात चर्चांना उधाण; पडद्यामागे नेमकं काय घडलं?
मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात शिंदे आयोजकांवर..
Eknath Shinde : मला कोपऱ्यात टाकलं, कोणी आयोजन केलंय? दसरा मेळाव्यात एकनाथ शिंदे आयोजकांवर संतापले; नेमकं काय घडलं?
जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी...
Jio IPO : जिओच्या आयपीओला अवघ्या 100 मिनिटांत तुफान प्रतिसाद; गुंतवणूकदारांनी काय लक्षात ठेवावं?
एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर
MHT-CET Exam Update : एमएच-सीईटी परीक्षा रद्द झाली की डिसेंबरमध्ये होणार? CET सेलने अफवांवर दिलं मोठं स्पष्टीकरण
मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटियासह 29 X अकाउंट...
PM Modi Documentry : मोदी-अदानींवरील डॉक्युमेंटरी व्हायरल; साबिर भाटिया यांच्यासह 29 X अकाउंटधारकांना थेट...
मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे, सुनेत्रा पवार दिल्लीत; द्रौपदी मुर्मूंची...
Delhi : मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे आणि सुनेत्रा पवार दिल्लीत; राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची घेणार भेट, कारण काय?
प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा....
Pradeep Purnekar Case : प्रदीप पूर्णेकर प्रकरणात मोठी घडामोड; राजेंद्र शिंदे पाचव्यांदा चौकशीसाठी हजर, तपासात काय उघड होणार?