अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा इंग्रजी पोषण ट्रॅकर अ‍ॅपवर बहिष्कार, अ‍ॅप मराठीतून उपलब्ध करण्याची मागणी

| Updated on: Jun 19, 2021 | 5:41 PM

राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मराठी अ‍ॅप येईपर्यंत इंग्रजी पोषण ट्रॅकर अ‍ॅपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, अशा आशयाचे निवेदन अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने देण्यात आले आहे.

अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा इंग्रजी पोषण ट्रॅकर अ‍ॅपवर बहिष्कार, अ‍ॅप मराठीतून उपलब्ध करण्याची मागणी
nutrition tracker app
Follow us on

नाशिक : राज्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांनी मराठी अ‍ॅप येईपर्यंत इंग्रजी पोषण ट्रॅकर अ‍ॅपवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय घेतला आहे, अशा आशयाचे निवेदन एकात्मिक बालविकास सेवा योजनेचे प्रकल्प अधिकारी यांना निफाड तालुक्यातील अंगणवाडी कर्मचारी युनियनच्या वतीने देण्यात आले आहे. (Anganwadi workers boycott English nutrition tracker app, demand to make the app available in Marathi)

एकात्मिक बालविकास सेवा योजनेतंर्गत नाशिक जिल्हयात सुमारे 4000 अंगणवाडी सेविका कार्यरत आहेत. अंगणवाडी केंद्रातील दैनंदिन कामाकरिता अंगणवाडी सेविकांना शासनाकडून मोबाईल देण्यात आले आहेत. शासनाने दिलेल्या मोबाईलमध्ये पोषण ट्रॅकर अ‍ॅप डाऊनलोड होत नाही. त्यामुळे जिल्हा व प्रकल्प कार्यालयाकडून अंगणवाडी सेविकांना व्यक्तीगत मोबाईलवर पोषण ट्रॅकर अॅप डाऊनलोड करण्याची सक्ती केली जाते, तसेच काही वयस्कर अंगणवाडी सेविका अल्प शिक्षित असल्या कारणाने त्यांना इंग्रजी भाषेचे पुरेसे ज्ञान नाही.

सध्या पोषण ट्रॅकर अ‍ॅपवर मुलांचे, महिलांचे नाव इंग्रजी भाषेत असल्या कारणाने इंग्रजी भाषेत माहिती भरण्यास अडचणी निर्माण होत आहेत. बहूतेक अंगणवाडी सेविकांनी मराठी भाषेतून शिक्षण घेतलं आहे. त्यामुळे त्यांना इंग्रजी भाषेचं पुरेसं ज्ञान नाही, त्यामुळे अडचणी निर्माण होत आहेत. म्हणूनच पोषण ट्रॅकर अ‍ॅप मराठीतून उपलब्ध केले जावे, अशी मागणी अंगणवाडी सेविकांनी निवेदन देऊन केली आहे.

इतर बातम्या

मूळ आराखड्यानुसारच नाशकातील जिल्हा क्रीडा संकुलाचे बांधकाम सुरू करा; पालकमंत्र्यांच्या सूचना

नाशिकमध्येही शनिवार-रविवारी पर्यटनस्थळं बंद, सोमवारपासून मॉल सुरू होणार; छगन भुजबळ यांची घोषणा

(Anganwadi workers boycott English nutrition tracker app, demand to make the app available in Marathi)