Nashik : दुष्काळात तेरावा, आगीच्या दुर्घटनेत जनावरांचा चारा जळून खाक, कांद्यालाही झळ

| Updated on: May 23, 2022 | 11:49 AM

यंदाच्या उन्हाळ्यामध्ये शेत शिवारात आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. यापूर्वी ऊसाच्या फडाला आग लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तर आता साठवलेल्या चाऱ्याचे नुकसान होत आहे. या सर्व घटनांचे कारण शॉर्टसर्किटच आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाबरोबर महावितरणच्या मनमानी कारभाराचाही सामना करावा लागला आहे.

Nashik : दुष्काळात तेरावा, आगीच्या दुर्घटनेत जनावरांचा चारा जळून खाक, कांद्यालाही झळ
Follow us on

नाशिक : यंदा (Summer Season) उन्हाच्या झळा अधिक तीव्र झाल्याने चारा टंचाई निर्माण झाली आहे. शिवाय (Green Fodder) हिरवा चारा दुरापस्त झाल्यानंतर नाशिकमधील द्याने गावच्या (Farmer) शेतकऱ्यासमोर दुष्काळात तेरावा अशी काहीशी स्थिती निर्माण झाली आहे, द्याने शिवारात संजय कापडणीस यांनी काढणी झालेल्या चारा पिकांची गंज लावण्यात आली होती. असे असताना चारा गंजीला आग लागल्याची दुर्दैवी घटना घडलीय. यामध्ये चारा पिकाचे तर नुकसान झालेच आहे पण साठवणूक केलेल्या कांद्यालाही याची झळ पोहचली आहे. शेतकरी उत्पादन वाढवून खर्च कमी करण्यासाठी एक ना अनेक उपाययोजना करीत आहे पण कधी नैसर्गिक संकट तर कधी सुल्तानी संकट शेतकऱ्यांची पाठ सोडायला तयार नाही. या घटनेत कापडणीस यांचा 5 ट्रॉली चारा जळून खाक झाला आहे.

नेमके घटनेचे कारण काय?

यंदाच्या उन्हाळ्यामध्ये शेत शिवारात आगीच्या घटना मोठ्या प्रमाणात वाढल्या होत्या. यापूर्वी ऊसाच्या फडाला आग लागल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले होते. तर आता साठवलेल्या चाऱ्याचे नुकसान होत आहे. या सर्व घटनांचे कारण शॉर्टसर्किटच आहे. त्यामुळे निसर्गाच्या लहरीपणाबरोबर महावितरणच्या मनमानी कारभाराचाही सामना करावा लागला आहे. द्याने येथील घटनाही शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.वाऱ्यामुळे विद्युत तारांचे घर्षण झाल्याने हा प्रकार घडल्याचे शेतकरी सांगत आहेत.

साठवलेल्या कांद्याचाही वांदाच

एकतर कांद्याला बाजारापेठेत दर नाही. त्यामुळे शेतकरी आता विक्रीपेक्षा साठवणूकीवर भर देत आहेत. कांदाचाळीमध्ये साठवणूक करुन वाढीव दराच्या प्रतिक्षेत असलेल्या कापडणीस यांना वेगळ्याच समस्येला सामोरे जावे लागले आहे. वाळलेल्या चाऱ्याबरोबर आगीची झळ कांद्यालाही लागली. यामध्ये कापडणीस यांना दुहेरी फटका बसला आहे.

हे सुद्धा वाचा

आर्थिक नुकसान, वर्षभर चाऱ्याचा प्रश्न

आगीच्या घटनेत कापडणीस यांचे तर न भरुन निघणारे नुकसान झालेच आहे. पण आता वर्षभर जनावरांपुढे काय टाकावे हा प्रश्न आहे. कारण साठवणूक केलेला तब्बल 5 ट्रॉली कडबा जळून खाक झाला आहे. तर हिरवा चाराही नाही. त्यामुळे वर्षभर जनावरे सांभाळावीत कशी असा सवाल त्यांच्यासमोर आहे. सध्या 1हजार 300 शेकडा कडबा असून तो विकतचा घेणे मुश्किल झाले आहे. शेतीमालाचे दर कमी झाले असतनाच त्यांच्यासमोर असे संकट उभारले गेले आहे.