Monsoon : मान्सून अन् मान्सूनपूर्व पावसामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या सर्वकाही

मान्सूनपूर्व पावसाचे आगमन हे अचानक आणि तेवढेच भयानकही असते. अवघ्या काही वेळात आगमन आणि लागलीच उघडीप हे त्याचे वैशिष्ट आहे. तर मान्सूनचा पावसाचे अगोदर वातावरण तयार होते. शिवाय पावसाला सुरवात झाली तर ती लागलीच उघडीप देत नाही हे विशेष. मान्सूनपूर्व पाऊस दुपारी उशिरा आणि संध्याकाळच्या वेळी पडतो. तर मान्सून पावसाळ्याच्या मोसमात, द्वीपकल्पीय भारतात दिवसाच्या कोणत्याही वेळी पाऊस सुरू होऊ शकतो.

Monsoon : मान्सून अन् मान्सूनपूर्व पावसामध्ये नेमका फरक काय? जाणून घ्या सर्वकाही
प्रातिनिधिक छायाचित्रImage Credit source: TV9
Follow us
| Updated on: May 23, 2022 | 6:10 AM

मुंबई : गेल्या चार दिवसांपासून (Climate Change) वातावरणात बदल झाला असून राज्यातील काही भागात (Rain) पावसाच्या सरी बरसल्या आहेत. मात्र, हा पाऊस नेमका अवकाळी, मान्सूनपूर्व की (Monsoon) मान्सून असे एक ना अनेक प्रश्न उद्भवतात. एवढेच नाही तर यावरुन वादंगही निर्माण होतात. मान्सूनपूर्व पाऊस सुरू होतो आणि उत्तरेकडील भागापेक्षा लवकर द्वीपकल्पीय भारतातून माघार घेतो. तर मान्सून साधारणत: 1 जूनपर्यंत केरळात धडकतो तर हाच पाऊस पुढे ईशान्य भारताच्या काही भागामध्ये पोहचतो. हे सर्व असले तरी मान्सूनचे आगमन झाले हे कसे स्पष्ट होते किंवा मान्सूनपूर्व पावसापेक्षा मान्सूनच्या सरीमध्ये फरक कसा करावा हे देखील एक कोडेच आहे. त्यामुळे या दोघांमधील काही वैशिष्ट्ये जाणून घेणे महत्वाचे ठरणार आहे.

ढगांचे प्रकार

मान्सूनपूर्व हंगामात वातावरण निवळ असते पण अचानक दुपारनंतर चित्रच बदलते. दुपारी उशिरा आणि संध्याकाळच्या वेळी ढग दाटून येताता. अचानाकच ढग दाटून येऊन पावासाला सुरवात होते तो मान्सूनपूर्व तर दुसरीकडे मुख्यत: ढगांच्या पत्र्यासारखे सतत थर. या ढगांची खोली कमी असली तरी थर दाट आणि ओलाव्याने भरलेले असतात तो मान्सूनचा पाऊस म्हणून ओळखला जातो.

पर्जन्यवृष्टीचे स्वरूप

मान्सूनपूर्व पावसाचे आगमन हे अचानक आणि तेवढेच भयानकही असते. अवघ्या काही वेळात आगमन आणि लागलीच उघडीप हे त्याचे वैशिष्ट आहे. तर मान्सूनचा पावसाचे अगोदर वातावरण तयार होते. शिवाय पावसाला सुरवात झाली तर ती लागलीच उघडीप देत नाही हे विशेष. मान्सूनपूर्व पाऊस दुपारी उशिरा आणि संध्याकाळच्या वेळी पडतो. तर मान्सून पावसाळ्याच्या मोसमात, द्वीपकल्पीय भारतात दिवसाच्या कोणत्याही वेळी पाऊस सुरू होऊ शकतो. मान्सूनचा पाऊस शक्यतो रात्रीच्या वेळी बरसतो. शिवाय लागलीच उघडीप न देता तो टिकून राहतो. मान्सूनपूर्व पावसाच्या सरींसह वादळी वाऱ्यांमुळे धुळीची वादळे येतात, परंतु पावसाळ्यात वारे सतत जोरदार असतात.

हे सुद्धा वाचा

तापमानात असा हा बदल

पावसामागे तापमान हा एक महत्वाचा घटक आहे. मान्सूनपूर्व पाऊस हा उष्णता आणि आर्द्रतेच्या दरम्यान बरसत असतो. म्हणजेच वातावरण पूर्ण अल्हादायक असे नाही तर उष्णता आणि दमट वातावरणातही मान्सूनपूर्व पाऊस बरसतो. तर मान्सूनच्या दरम्यान तापमान हे कमी झालेले असते.

मान्सूनने सर्व क्षेत्र व्यापलेले

मान्सूनपूर्व पाऊस हा काही भागातच पण अचानक भयानक असा बरसतो. शिवाय तो टिकूनच राहिल असे नाही. मान्सूनपूर्व पावसाचा फायदा होण्यापेक्षा नुकसानच अधिक होत असते. तसे मान्सूनमुळे होत नाही. पावसाचा अंदाज आणि वातावरण लक्षात आल्याने त्याचा धोका राहत नाही. शिवाय या मान्सूनवरच शेती अवलंबून आहे. परंतु नैऋत्य मॉन्सूनने मोठ्या भागाला व्यापले आहे.हवामान मोठ्या प्रमाणात समान आहे. चेन्नई तामिळनाडूच्या पर्जन्यछायेच्या भागात असल्याने इतर ठिकाणांइतका पाऊस पडत नाही.

Non Stop LIVE Update
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?
बच्चू कडूंनी मैदानाची मागणी केली असती तर.... नवनीत राणा काय म्हणाल्या?.
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध
पाठिंब्यानंतर शिंदेंच्या संभाव्य उमेदवारांना मनसेचा उघड विरोध.
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?
बारामतीमध्ये 2 तुतारी? निवडणूक आयोगाला तुतारी अन् पिपाणीतील फरक कळेना?.
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट
तेव्हा एकनाथ शिंदे ठाकरेंसमोर रडले, आदित्य ठाकरेंचा स्फोटक गौप्यस्फोट.
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम
संदीपान भुमरेंनी काय दिल, हे दारू..; अजित पवारांच्या टीकेवरून मविआ नेम.
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?
अमरावतीत मैदानाच्या परवानगीवरून रण, बच्चू कडू पोलिसांवरच भडकले, पण का?.
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.