ताशाचा आवाज तरारा झाला रं, गणपती माझा नाचत आला!

| Updated on: Sep 10, 2021 | 12:04 PM

सगळीकडे उत्साहाची उधळण, सकाळपासून पावसाने दिलेली उघडीप, गेल्या आठ दिवसांपासून रुसलेल्या सूर्यनारायणाने दिलेले दर्शन, त्याचे हवेहवेसे वाटणारे कोवळे ऊन, हिरवीगार झालेली झाडे या साऱ्या आनंददायी वातावरणात (Ganesh festival) शुक्रवारी (10 सप्टेंबर) नाशिकमध्ये (Nashik)घरोघरी गणरायाचे (Arrival of Ganpati) आगमन झाले.

ताशाचा आवाज तरारा झाला रं, गणपती माझा नाचत आला!
घरोघरी बाप्पांचे आगमन.
Follow us on

नाशिकः सगळीकडे उत्साहाची उधळण, सकाळपासून पावसाने दिलेली उघडीप, गेल्या आठ दिवसांपासून रुसलेल्या सूर्यनारायणाने दिलेले दर्शन, त्याचे हवेहवेसे वाटणारे कोवळे ऊन, हिरवीगार झालेली झाडे या साऱ्या आनंददायी वातावरणात (Ganesh festival) शुक्रवारी (10 सप्टेंबर) नाशिकमध्ये (Nashik) घरोघरी गणरायाचे (Arrival of Ganpati) आगमन झाले. (Arrival of Ganpati in Nashik with great enthusiasm)

गणपती बाप्पा म्हटला की कुणाच्याही अंगात उत्साह संचारतो. दहा दिवस सुरू राहणाऱ्या या उत्सवात आबालवृद्ध भक्तीने न्हाऊन निघतात. व्याख्यानमाला, कीर्तने, प्रवचने अशा सांस्कृतिक कार्यक्रमांचा माहोल यापूर्वी अनेक गणेश मंडळांमध्ये असायचा. अनेक गणेश मंडळांचे देखावे पाहण्यासाठी रोज हजारो जणांची गर्दी व्हायची. या साऱ्याला फाटा देत गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाच्या साथीमुळे अगदी साधेपणाने गणेशोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.
या वर्षी अजून तरी कोरोना रुग्णांची संख्या कमी असल्यामुळे उत्सवाला मोजक्या लोकांच्या उपस्थितीत परवानगी आहे. नाशिकमध्ये शुक्रवारी सकाळपासूनच बाजारपेठेतून घरोघरी वाजत-गाजत गणेश मूर्ती नेल्या जात होत्या. लहान मुलांच्या गळात अडकवलेला ताशा, त्याचा होणारा निनाद, गणपती बाप्पा मोरयाची घोषणा आणि अधूनमधून गुलालांची उधळण यामुळे शहराचा नूर पालटला होता.

गणरंगाची उधळण
पंचवटी, द्वारका, मुंबईनाका, अशोकामार्ग, इंदिरानगर, लेखानगर, अशोकस्तंभ, कॉलेजरोड, नाशिकरोड या भागात सकाळपासून गणपती बाप्पांच्या उत्सवाची लगबग होती. घरोघरी गणेशाच्या मूर्तींचे आगमन सुरू होते. लहान मुलांनी गणपती बाप्पा मोरया असे नाव लिहलेल्या टोप्या घातल्या होत्या. अनेकांनी भगव्या रंगाच्या पट्ट्या डोक्याला बांधल्या होत्या. कुणी आपल्या दुचाकीवर, तर कुणी चारचाकीतून बाप्पांना घरी नेत होते. आता इथून पुढील दहा दिवस हा गणरंग असाच दिवसेंदिवस बहरणार आहे.

असा आहे मुहूर्त
सोलापूरच्या दाते पंचांगानुसार, भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेश चतुर्थी साजरी केली जाते. पार्थिव गणेशाची याच दिवशी प्राणप्रतिष्ठा करतात. त्यासाठी गणरायाच्या आगमनाच्या एक-दोन दिवस किंवा पंधरा दिवस आधीही घरात मूर्ती आणून ठेवता येते. या वर्षी गणेश चतुर्थीला पहाटे ४.५० पासून घरगुती बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेचा मुहूर्त सुरू होतो. दुपारी दीडपर्यंत भाविकांना आपल्या घरात गणरायांची स्थापना करता येईल.

नियम पालन गरजेचे
सध्या कोरोनाचे रुग्ण कमी आहेत. तिसरी लाट येणार नाही, असे भाकित वर्तवले जात आहे. मात्र, तरीही सर्वांनी कोरोनाचे नियम पाळावेत. गर्दी करू नये. सुरक्षित अंतर ठेवावे. सर्वांनी घराबाहेर पडल्यास आवर्जुन मास्क घालावा, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आहे. (Arrival of Ganpati in Nashik with great enthusiasm)

इतर बातम्याः 

विघ्नहर्त्या बाप्पांची या मुहूर्तावर करा प्राणप्रतिष्ठा!

अहो सोने स्वस्त! गेल्या महिन्याच्या तुलनेत 790 रुपयांची घसरण!!

नाशिकमध्ये अनोखी हेल्मेट सक्ती, नियम मोडल्यास दोन तासांच्या समुपदेशनाचा डोस!