अहो सोने स्वस्त! गेल्या महिन्याच्या तुलनेत 790 रुपयांची घसरण!!

ऐन सणासुदीच्या काळात (Ganesh Fest)नाशिकमध्ये (NashikGold) 24 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम मागचे दर गुरुवारी (9 सप्टेंबर) 47600 होते. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सोन्याच्या दरात तब्बल 790 रुपयांची घसरण (Gold cheaper) झाली आहे, अशी माहिती इंडिया बुल अँड ज्वेलर्स असोसिएशनचे महाराष्ट्र डायरेक्टर चेतन राजापूरकर यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना दिली.

अहो सोने स्वस्त! गेल्या महिन्याच्या तुलनेत 790 रुपयांची घसरण!!
सोन्याच्या दरात घसरण.

नाशिकः ऐन सणासुदीच्या काळात (Ganesh Fest) नाशिकमध्ये (NashikGold) 24 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम मागचे दर गुरुवारी (9 सप्टेंबर) 47600 होते. ऑगस्ट महिन्याच्या तुलनेत सोन्याच्या दरात तब्बल 790 रुपयांची घसरण (Gold cheaper) झाली आहे, अशी माहिती इंडिया बुल अँड ज्वेलर्स असोसिएशनचे महाराष्ट्र डायरेक्टर चेतन राजापूरकर यांनी टीव्ही ९ मराठीशी बोलताना दिली.

सध्या सणासुदीचा काळ सुरू झाला आहे. त्यामुळे बाजारातही उत्साह पाहायला मिळतो आहे. नाशिकच्या सराफा बाजारामध्ये गुरुवारी 24 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम मागचे दर 47,600 आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 44,800 आहेत. या दरावर अतिरिक्त जीएसटी असेल. सराफ्यात चांदीच्या दागिन्यांनाही मागणी वाढली आहे. नाशकात गुरुवारी चांदीचे किलोमागचे दर 65,800 असून, यावर अतिरिक्त जीएसटी असेल.

गेल्या महिन्यापेक्षा स्वस्त

नाशकात गेल्या महिन्यात 1 ऑगस्ट रोजी 24 कॅरेट सोन्याचे 10 ग्रॅमचे दर हे 48,390 होते. तर 22 कॅरेट सोन्याचे दर हे 47,390 होते. या तुलनेत सप्टेंबरमध्ये या भावात घसरण झाल्याचे पाहायला मिळते. आता गणेशोत्सवाने सराफा बाजारातही उत्साहाचे वातावरण आले असून, नागरिकांची सराफा दुकानामधील वर्दळ वाढली आहे. महालक्ष्मी, नवरात्रोत्सव आणि विशेषतः दसरा आणि दिवाळीच्या पाडव्याला मोठी सोने खरेदी होण्याची शक्यता आहे. अनेक ग्राहक शुभ मुहूर्त पाहून सोन्याची आगावू मागणी नोंदवतात आणि त्या दिवशी सोन्याची खरेदी करतात.

चांदीच्या गणेश मूर्ती

सध्या सराफा बाजारात चांदीच्या गणेश मूर्ती आकर्षणाचे केंद्रबिंदू आहेत. गणेशोत्सव सुरू असल्याने अनेक भाविक चांदीच्या गणेश मूर्तीची खरेदी करायला प्राधान्य देत आहेत. ही गणेश मूर्ती प्राणप्रतिष्ठा करून कायमस्वरूपी घरात ठेवली जाते. नाशिक चांदीच्या दागिन्यांसाठी प्रसिद्ध आहे. चांदीची वेगवेगळ्या प्रकारचे दागिने ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत. गणेशोत्सवाच्या काळात महालक्ष्मीचा सणही येतो. त्याचीही सराफा बाजारात तयारी करण्यात आली आहे. महालक्ष्मीसाठी खास दागिने आले आहेत. त्यात अगदी नथ, कानातले, मंगळसूत्र यांचा समावेश आहे. या दागिन्यांनाही चांगली मागणी होताना दिसते आहे.

उद्या सराफा बंद

नाशकातील सराफा व्यापार शुक्रवारी बंद राहणार आहे. बाप्पांची प्राणप्रतिष्ठा असल्याने सराफा बाजाराला सुट्टी राहणार आहे, अशी माहिती नाशिक सराफा असोसिएशनचे अध्यक्ष गिरीश नवसे यांनी दिली. त्यामुळे अनेक ग्राहकांनी गुरुवारी सकाळपासूनच खरेदीसाठी सराफा बाजाराकडे पावले वळवली आहेत, असे ते म्हणाले.

गणेशोत्सवामुळे सराफा बाजारात उत्साह आला आहे. सध्या सोने आणि चांदीचे भाव ऑगस्ट महिन्यापेक्षा निश्चितच कमी झाले आहेत. आज 24 कॅरेट सोन्याचे दहा ग्रॅम मागचे दर 47,600 आहेत. तर 22 कॅरेट सोन्याचे दर 44,800 आहेत.
– चेतन राजापूरकर, महाराष्ट्र डायरेक्टर, इंडिया बुल अँड ज्वेलर्स असोसिएशन (Gold at 47600 in Nashik, Gold cheaper by Rs 790 compared to last month)

इतर बातम्याः 

नाशिकच्या उद्योगांचे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले वीजदर अनुदान अखेर सुरू

…तर अंधारात बाप्पांची प्राणप्रतिष्ठा, नाशिकमधली मंडळे आक्रमक, पालिकेला इशारा

Read Full Article

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI