Ashok Kharat: भोंदू अशोक खरातच्या आर्थिक नाड्या आवळल्या, ते मोठे बँक खाते सील, आता आर्थिक कुंडलीच समोर येणार, अपडेट काय?

Ashok Kharat Bank Account: भोंदू अशोक खरात याला अजून एक मोठा दणका बसला आहे. तपास यंत्रणांनी त्याच्या आर्थिक नाड्या आवळल्या आहेत. त्याच्या महत्त्वाच्या संस्थेची बँक खाती सील करण्यात आली आहे. या खात्यातून आता त्याची आर्थिक कुंडली समोर येणार आहे. तर त्याला देणगी देणाऱ्यांची नावंही समोर येणार आहेत.

Ashok Kharat: भोंदू अशोक खरातच्या आर्थिक नाड्या आवळल्या, ते मोठे बँक खाते सील, आता आर्थिक कुंडलीच समोर येणार, अपडेट काय?
अशोक खरातच्या आर्थिक नाड्या आवळल्या
Image Credit source: गुगल
| Updated on: Mar 26, 2026 | 11:54 AM

Shivanika Sanstha Bank Account: भोंदू अशोक खरात याला यंत्रणांनी चांगलाच दणका दिला आहे. ज्या भोंदूगिरीच्या जोरावर त्याने मोठे साम्राज्य तयार केले होते. त्याच्या आर्थिक नाड्या यंत्रणांनी आवळल्या आहेत. खरात यांच्या मालमत्तेचे आकडे हे डोळे विस्फरवणारे आहेत. त्याने अनेक ठिकाणी शेतकर्‍यांच्या जमिनी हडपल्या आहेत. त्याने दडपशाहीने मोक्याच्या जागांवर कब्जा मिळवल्याचे समोर आले आहे. आता त्याच्या मालमत्ता आणि त्यासाठी कुठून निधी, पैसा आल्याची चौकशी होणार आहे. त्याची आर्थिक कुंडलीच आता तपास यंत्रणा काढणार आहे. त्यामुळे अशोक खरातचा पाय अजून खोलात गेल्याचं मानलं जातं.

शिवानिका संस्थेचे बँक खाते सील

भोंदू अशोक खरात यांच्या शिवानिका संस्थेचे बँक खाते सील करण्यात आले आहे. त्यामुळे त्याच्या आर्थिक नाड्या आवळल्या गेल्या आहेत. भामट्या खरातच्या आर्थिक व्यवहारांचा तपास सुरू करण्यात आला आहे. विशेष तपास पथकाकडून त्याच्या मालमत्तेची माहिती मागवण्यात आली आहे. खरात यांच्या कुटुंबियांच्या नावे किती संपत्ती आहेत. किती मालमत्ता, कुठे जमीन, कुठे प्लॉट, फ्लॅट, कार वा इतर साधनं आहेत, याची कुंडलीच आता बाहेर येणार आहे. त्याची जमीन, घर, दुकानांची चौकशी करण्यात येणार आहे. नोंदणी विभागाकडून खरातच्या राज्यभरातील मालमत्तेचा शोध सुरू झाला आहे. त्याने अनेकांना धमकी देत मोठी आर्थिक लूट केल्याचे समोर आले आहे. आता या भोंदू खरातची आर्थिक कुंडली समोर येणार आहे.

आर्थिक कुंडलीतून देणगीदारांची नावं समोर

भोंदू खरातची आर्थिक कुंडली जुळवण्याचे काम आता यंत्रणा करत आहे. त्याचे अनेक आयएएस आणि बड्या सनदी अधिकाऱ्यांशी लागेबंध असल्याचे. तसेच काही राजकारण्यांशी त्याची थेट ओळख असल्याचे समोर आले आहे. त्याने काहीशी भागीदारीत काही उपक्रम आणि व्यवसाय सुरू केल्याचेही समोर येत आहे. त्याच्या या गुन्ह्यात आणि काळ्या धंद्यात कुणाचा हात फसला आहे हे सुद्धा आर्थिक कुंडलीतून बाहेर येईल. महसूल यंत्रणेतील बडे प्रस्थ आणि त्यांच्या कुटुंबियांच्या माध्यमातून खरातने आर्थिक दरबार थाटल्याचे समोर येत आहे. त्याची आर्थिक कुंडली समोर आल्यावर कुणी कुणी त्याला किती देणगी दिली हे पण उघड होईल. तर अनेक जणांचे आर्थिक हितसंबंध समोर येण्याची शक्यता आहे.

Follow Us