Nashik : प्रशासनाच्या आश्वासनानंतर सिटीलींक बसचालकांचे आंदोलन अखेर मागे; नाशिककरांना मोठा दिलासा

| Updated on: Sep 01, 2022 | 10:47 AM

नाशिकमधून मोठी बातमी समोर येत आहे. सिटीलींक बसच्या चालकांनी अचानक काम बंद आंदोलनाचे हत्यार उपसले होते. मात्र आता हा संप मागे घेण्यात आला आहे.

Nashik :  प्रशासनाच्या आश्वासनानंतर सिटीलींक बसचालकांचे आंदोलन अखेर मागे; नाशिककरांना मोठा दिलासा
Follow us on

नाशिक: नाशिकमधून (Nashik News) मोठी बातमी समोर येत आहे. सिटीलींक (Citylink) बसच्या चालकांनी अचानक काम बंद आंदोलनाचे (Strike) हत्यार उपसले होते. गेल्या तीन महिन्यांपासून पगार न मिळाल्याने कर्मचारी चांगलेच आक्रमक झाले. वेळेवर पगार देण्याची मागणी करत चालकांनी कामबंद आंदोलनाला सुरुवात केली होती. मात्र आता हे आंदोलन मागे घेण्यात आले आहे. आंदोलन मागे घेण्यात आल्याने प्रवाशांना मोठा दिलासा मिळालाय.

विविध मागण्यांसाठी आंदोलन

सिटीलींक बसच्या चालकांच्या पगाराचा प्रश्न गंभीर बनला आहे. गेल्या तीन महिन्यांपासून त्यांचे पगारच झाले नाहीयेत. त्यामुळे अखेर सिटीलींक बसचे कर्मचारी आक्रमक झाले असून, वेळेवर पगार देण्याची मागणी त्यांनी केली आहे. वेळेवर पगार होत नसल्याने ऐन सणासुदीच्या  काळात कर्मचाऱ्यांनी संप पुकारला होता. मात्र आता प्रशासनाकडून मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा सिटीलिंक बस रस्त्यावर धावू लागली आहे.

पगार वेळेत देण्याची मागणी

पगार वेळेत होत नसल्याने कर्मचारी आक्रमक झाले . गेल्या तीन महिन्यांपासून सिटीलींक बसच्या कर्मचाऱ्यांचे पगारच झाले नाहीत. अखेर त्यांनी कामबंद आंदोलनाला सुरुवात केली, जोपर्यंत पगार होणार नाहीत तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका या कर्मचाऱ्यांनी घेतली होती. मात्र आता या कर्मचाऱ्यांना पगार देण्याचे आश्वासन संबंधित प्रशासनाच्या वतीने देण्यात आले आहे. त्यामुळे हे आंदोलन मागे घेण्यात आले.

हे सुद्धा वाचा

प्रवाशांचे हाल

सिटीलींक बसची सेवा ठप्प झाल्याने काही काळ प्रवाशांचे हाल झाले. वाहतूक व्यवस्था कोलमडल्याचे पहायला मिळाले होते. याची शहर प्रशासनाकडून तातडीने दखल घेत कर्मचाऱ्यांशी चर्चा करण्यात आली. त्यांना मागण्या मान्य करण्याचे आश्वासन देण्यात आले. या आश्वासनानंतर अखेर हा संप मागे घेण्यात आला आहे.