Nashik Lockdown Update | ‘संपूर्ण लॉकडाऊन करा ही माझी मागणी, अजित पवारांशी बोललो, मुख्यमंत्र्यांनाही भेटणार’, मंत्र्याचे मोठे वक्तव्य

| Updated on: Apr 17, 2021 | 8:27 PM

संपूर्ण लॉकडाऊन करण्यासाठी मी आग्रही असून तशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडे केली आहे, असे भूजबळ म्हणाले आहेत. (nashik corona chhagan bhujbal lockdown uddhav thackeray)

Nashik Lockdown Update | संपूर्ण लॉकडाऊन करा ही माझी मागणी, अजित पवारांशी बोललो, मुख्यमंत्र्यांनाही भेटणार, मंत्र्याचे मोठे वक्तव्य
Follow us on

नाशिक : राज्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. रोज हजारोच्या संख्येने रुग्ण आढळत आहेत. रुग्ण वाढत असल्यामुळे आरोग्य यंत्रणा तोकडी पडू लागली आहे. ऑक्सीजन, रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा निर्माण झाला आहे. नाशिकमध्ये तर ही परिस्थिती जास्तच चिंताजनक आहे. याच पार्श्वभूमीवर नाशिकचे पालकमंत्री छगन भूजबळ (Chhagan Bhujbal) यांनी मोठे वक्तव्य केले आहे. संपूर्ण लॉकडाऊन करण्यासाठी मी आग्रही असून तशी मागणी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्याकडे केली आहे. तसेच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनासुद्धा या संबंधी भेटणार असल्याचे भूजबळ यांनी म्हटलंय. त्यांच्या या वक्तव्यानंतर आता नाशिकमध्ये संपूर्ण लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसे संकेत छगन भुजबळ यांनी दिले आहेत. ते नाशिकमध्ये पत्रकार परिषदेत बोलत होते. (Corona patients increasing in Nashik district Chhagan Bhujbal demands total lockdown in Nashik will meet to CM Uddhav Thackeray)

ऑक्सीजनचा प्रचंड तुटवडा

पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी नाशिकमधील आरोग्य व्यवस्थेबद्दल माहिती दिली आहे. त्यांनी सध्या नाशिकमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा असल्याचे सांगितले आहे. सध्या ऑक्सीजनची 139 मेट्रिक टन एवढी मागणी आहे. मात्र हातात फक्त 87 टन ऑक्सीजन उपलब्ध आहे. जीवनावश्यक गोष्टीसाठी फिरण्याच्या नावाखाली नागरिक गैरफायदा घेत आहेत. ही परिस्थिती वाईट आहे, असे छगन भुजबळ यांनी म्हटलं आहे.

लक्षणं असतील तर रुग्णालयात दाखल व्हा

यावेळी बोलताना त्यांनी कोरोनाची लक्षण जाणवत असल्याच हयगय करु नये असे आवाहन केले आहे. गरज नसताना मोकाट फिरणारे सुपर स्प्रेडर ठरतायत. कोरोनासदृश कोणतीही कोणतीही लक्षणं असली तर ताबडतोब रुग्णालयात दाखल व्हा, असे भूजबळ म्हणाले. तसेच सध्या नाशिमधील बेड्सची क्षमता 2000 ने वाढवलेली आहे. कुंभमेळ्यावरून परत येणाऱ्यांनी ताबडतोब कोरोना चाचणी करुन घ्यावी, असेसुद्धा भुजबळ म्हणाले.

रेमडेसिव्हीर लाईफ सेव्हिंग ड्रग नाही

सध्या राज्यासह नाशिक जिल्ह्यातसुद्धा रेमडेसिव्हीर इंजेक्शनचा तुटवडा जाणवतो आहे. या मुद्द्याला हात घालत त्यांनी रेमडेसिव्हीर हे लाईफ सेव्हिंग ड्रग नसल्याचे सांगितले. “प्रत्येक कोरोना रुग्णाला रेमडेसिव्हीरची गरज नाही. मी स्वतः रेमडेसिव्हीर घेतलेलं नाही. रेमडेसिव्हीर हे लाईफ सेव्हिंग ड्रग नाही. या इंजेक्शनचे काही दुष्परिणामही आहेत,” असे भुजबळ म्हणाले.

टोटल लॉकडाऊनवर मी आग्रही

यावेळी पुढे बोलताना त्यांनी नाशिक जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन करण्याची गरज व्यक्त केली. तसेच लॉकडाऊनच्या मागणीवर मी आग्रही असल्याचेही भुजबळ यांनी सांगितले. “टोटल लॉकडाऊन करा अशी व्यापाऱ्यांनी मागणी केली आहे. अधिकारी आणी लोकप्रतिनिधी यांचीसुद्धा लोकडाऊन करा अशी मागणी आहे. त्यानुसार नाशिकला लॉकडाऊन करा ही माझी मागणी आहे. त्यासाठी मी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी भेटून चर्चा करणार आहे,” असे भुजबळ म्हणाले.

दरम्यन, भुजबळ यांच्या या वक्तव्याने आगामी काही दिवसांत नाशिक जिल्ह्यात संपूर्ण लॉकडाऊन लागू होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. छगन भुजबळ यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्यानंतर लॉकडाऊनसंदर्भात कोणता निर्णय होणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे..

इतर बातम्या :

LIVE | नवी मुंबईत: एपीएमसीमधील कमोडिटी एक्सचेंज बिल्डिंगमध्ये मोठी आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी

Corona Cases and Lockdown News LIVE : नाशिकमध्ये ऑक्सिजनचा प्रचंड तुटवडा, 139 मेट्रिक टनची मागणी, हातात फक्त 87 टन, छगन भुजबळ यांची माहिती

मुंबईत अत्यावश्यक सेवा पुरवणाऱ्या गाड्यांसाठी कलर कोड, नियम मोडणाऱ्यांना कठोर शिक्षा, पोलीस आयुक्तांच्या सूचना

(Corona patients increasing in Nashik district Chhagan Bhujbal demands total lockdown in Nashik will meet to CM Uddhav Thackeray)