LIVE | नालासोपाऱ्यात 40 वर्षीय व्यक्तीवर चाकूने प्राणघातक हल्ला

| Updated on: Apr 18, 2021 | 6:31 AM

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE | नालासोपाऱ्यात 40 वर्षीय व्यक्तीवर चाकूने प्राणघातक हल्ला
Breaking News

महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज, मनोरंजन विश्वातील घडामोडी, मुंबई-पुण्यातील बातम्या, हवामानाचे अपडेटसह सर्व माहिती एकाच ठिकाणी

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 17 Apr 2021 10:27 PM (IST)

    नालासोपाऱ्यात 40 वर्षीय व्यक्तीवर चाकूने प्राणघातक हल्ला

    नालासोपारा : नालासोपाऱ्यात 40 वर्षीय इसमावर चाकूने प्राणघातक हल्ला

    हल्ल्याचे कारण स्पष्ट झाले नाही

    वैयक्तिक वादातून हल्ला झाला असल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज

    नालासोपारा पूर्व शिर्डीनगर परिसरात आज रात्री 8 च्या सुमारास घडली घटना

    तस्लिम अन्सारी असे हल्ला झालेल्या इसमाचे नाव असून तो गंभीर जखमी

    दोन जणांनी केले धारदार चाकूने गळ्यावर, तोंडावर वार

    वार करून आरोपी फरार

    तुलिंज पोलीस घटनास्थळावर दाखल झाले असून जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे

  • 17 Apr 2021 07:43 PM (IST)

    नवी मुंबईत: एपीएमसीमधील कमोडिटी एक्सचेंज बिल्डिंगमध्ये मोठी आग, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी

    नवी मुंबई : एपीएमसीमधील कमोडिटी एक्सचेंज बिल्डिंगमध्ये मोठी आग

    आग बिझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी

    -आग लागण्याचे करण अद्याप अस्पष्ट

    -या इमारतीमध्ये जवळपास 200 ऑफिस आहेत

    आग विझवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु

  • 17 Apr 2021 07:06 PM (IST)

    अकोला जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य झकटे, भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केल

    अकोला : जिल्ह्यात भूकंपाचे सौम्य झटके

    अकोला शहरापासून पश्चिमेस 19 किलोमीटर अंतरावर बाळापूर तालुक्यात भूकंपाचे सौम्य झटके

    भूकंपाची तीव्रता 3.0 रिश्टर स्केलमध्ये

    अकोल्याच्या पश्चिमेस 19 किलोमीटर अंतरावर भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले

    दुपारी 3 वाजून 45 मिनिटांनी भूकंपाचे झटके जाणवल्याची माहिती

  • 17 Apr 2021 05:39 PM (IST)

    पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मतदान अपेडट, आतापर्यंत 57.81 टक्के मतदान

    पंढरपूर विधानसभा पोटनिवडणूक मतदान अपेडट

    सायंकाळी पाच वाजेपर्यंत 57.81 टक्के मतदान

    कोण बाजी मारणार याकडे सर्वांचे लक्ष

  • 17 Apr 2021 03:38 PM (IST)

    आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफ़ाश 

    मुंबई : आयपीएलवर सट्टा लावणाऱ्या टोळीचा मुंबई पोलिसांकडून पर्दाफ़ाश

    काल रात्री एनएम जोशी पोलिसांनी मुंबईतील लोअर परळ भागात असलेल्या पंचतारांकित हॉटेलमध्ये तिघांना केली अटक

    फाईव्ह स्टार हॉटेलच्या 27 व्या मजल्यावर लक्झरी रूम बुक करून क्रिकेट सट्टेबाजी सुरू होती

    पोलिसांनी 8 मोबाईल आणि एक लॅपटॉप जप्त केला आहे

    आरोपींना आज न्यायालयात हजर करण्यात आले असता कोर्टाने त्यांना पोलिस कोठडी सुनावली आहे.

    सूत्रांचे म्हणणे आहे की, हे तेच हॉटेल आहे ज्यात आयपीएलची टीम थांबली होती

    पोलिसांनी सांगितले की, दोघांचा काहीही संबंध नाही

  • 17 Apr 2021 03:35 PM (IST)

    बेलगाव लोकसभा पोटनिवडणूक, दुपारी 3 वाजेपर्यंत फक्त 35 टक्के मतदान

    बेळगाव लोकसभा पोटनिवडणूक

    पोटनिवडणूक अपडेट - दुपारी 3 पर्यंत 35.55 % मतदान बेळगाव ग्रामीण- 52. 74 % मतदान

    बेळगाव दक्षिण - 31.95 % मतदान

    बेळगाव उत्तर- 32 5 % मतदान

  • 17 Apr 2021 02:12 PM (IST)

    डोंबिवलीतील मानपाडा रोडवरील रिस्पॉन्स दुकानाला मोठी आग

    डोंबिवली : मानपाडा रोडवरील रिस्पॉन्स दुकानाला मोठी आग.....

    आज बाजूची दुकाने जळाली...

    घटनास्थळी 2 फायरब्रिगेड दाखल....

    परिसरात धुरच धूर.....

  • 17 Apr 2021 02:11 PM (IST)

    पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी दुपारी 1 पर्यंत 33.12 टक्के मतदान

    पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

    सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात

    दुपारी 1 पर्यंत 33.12 टक्के मतदान

  • 17 Apr 2021 12:58 PM (IST)

    बारामतीत बनावट रेमडीसीव्हरची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश

    बारामती : बनावट रेमडीसीव्हरची विक्री करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश.. बारामती तालुका पोलिसांची मोठी कारवाई.. चौघाजणांना केली अटक.. पॅरासिटॅमोलच्या गोळ्यांचे द्रावण बनवून केली जात होती विक्री..

  • 17 Apr 2021 12:58 PM (IST)

    गोंदियामध्ये ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नाहीत : राजेंद्र शिंगणे

    राजेंद्र शिंगणे, अन्न व औषध प्रशासन मंत्री 

    - गोंदियामध्ये ऑक्सिजन अभावी मृत्यू झालेले नाहीत - मी स्थानिक प्रशासन यांच्याकडून माहिती घेतली - त्या रुग्णालयात ऑक्सिजन शिल्लक होता - नालासोपारा याठिकाणी ही ऑक्सिजन अभावी मृत्यू झाला नाही - आम्ही नियोजण करत असताना अचानक काही ठिकाणी रुग्ण वाढतात त्यामुळे आमचं योग्य नियोजन होत नाही - पंतप्रधान ही इतर देशातून मागणी करत आहेत राज्य सरकार ही प्रयन्त करत आहे - ऑक्सिजन आणि रेमडीसेव्हर यामध्ये राजकारण होतंय का यावर मी काही बोलणार नाही - राजकारण करण्याचे हे दिवस नाही - पुढील 8 दिवस राज्यासाठी फार महत्वाचे असणार आहेत

  • 17 Apr 2021 12:50 PM (IST)

    सर्व सामान्य नागरिकांना इंजेक्शन मिळावं हाच सरकारचा हेतू : विजय वडेट्टीवार

    विजय वडेट्टीवार यांची टीका 

    बावनकुळे हे सर्व आरोप नैराश्यतून करत आहे

    कुठेही इंजेक्शनचा साठा केला जात नाही सर्व सामान्य माणसाला इंजेक्शन चा लाभ मिळावा हा सरकार चा हेतू आहे,

    रेमडीसीमिर इंजेक्शन चा साठा करून त्याचा लोणचं थोडी बनविणार आहेत

    ते हे सर्व आरोप नैराश्यातून करीत आहे

  • 17 Apr 2021 12:09 PM (IST)

    अमरावतीच्या मेळघाटातील धक्कादायक प्रकार, कोरोना पॉझिटिव्ह महिलेची मांत्रिकाकडे धाव, उपचारादरम्यान मृत्यू

    अमरावतीच्या मेळघाटातील धक्कादायक प्रकार

    सेमाडोह येथील महिलेचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर उपचारासाठी नातेवाईकांनी घेतली मांत्रिकाकडे धाव..

    45 वर्षीय महिलेचा भवई येथील मांत्रिकाकडे उपचारदरम्यान मृत्यू..

    जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. दिलीप रणमले यांची माहिती

    स्वातंत्र्याच्या 70 वर्षानंतर मेळघाटात अंधश्रद्धा कायम

  • 17 Apr 2021 10:52 AM (IST)

    परदेशातील लोकांना लस द्यायची आणि देशातील लोकांना मारायचं हा केंद्राचा धंदा : विनायक राऊत

    सिंधुदुर्ग:-

    परदेशातील लोकांना आपलं काही तरी देण घेणं लागत म्हणून त्यांना व्हॅक्सीन द्यायचं आणि आपल्या देशातल्या लोकांना मारायचं हा केंद्र सरकारचा धंदा, खासदार विनायक राऊत यांची केंद्र सरकारवर जोरदार टिका

    रेमडेसीवीरची निर्यात ताबडतोब थांबवण्याची आवश्यकता होती ती ब-याच दिवसानंतर थांबवली

    मुख्यमंत्र्यानी पंतप्रधानांकडे ऑक्सिजनची मागणी केली त्याला पंतप्रधानांनी ऑक्सिजन द्यायची तयारी दाखवली माञ ती कुठून ? तर बंगालमधून.

    म्हणजे बंगाल ते मुंबई हा जर प्रवास बघितला तर कशा पद्धतीने ते ऑक्सिजन देणार आहेत हे तुमच्या सर्वाच्या लक्षात येईल.

    पंतप्रधानांनी सहानभुती पुर्वक माणूसकीच्या दृष्टीने विचार करून हवाई वाहतूकी द्वोरे प्राणवायू महाराष्ट्रात द्यावा.

  • 17 Apr 2021 10:50 AM (IST)

    पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी सकाळी 9 पर्यंत 6.42 टक्के मतदान

    पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीसाठी आज मतदान

    सकाळी सातपासून मतदानाला सुरुवात

    सकाळी 9 पर्यंत 6.42 टक्के मतदान

  • 17 Apr 2021 10:49 AM (IST)

    शुभम..तुझा लढा यशवंत होईल, संजय राऊतांचे ट्वीट

  • 17 Apr 2021 09:17 AM (IST)

    पंढरपूर | राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालकेंनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

    पंढरपूर - राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालकेनी पत्नीसह बजावला मतदानाचा हक्क

    पत्नी डॉ.प्रणिता भालकेनि बजावला मतदानाचा हक्क

    पंढरपुरातील संत पेठ शाळा क्रमांक 9 येथील मतदान केंद्रावर बजावला हक्क

  • 17 Apr 2021 09:15 AM (IST)

    बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरु, मतदारांच्या रांगा

    बेळगाव लोकसभा पोटनिवडणुकीसाठी मतदान सुरू

    मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या आहेत

  • 17 Apr 2021 09:14 AM (IST)

    साताऱ्यातील ओझर्डे गावातील जवानाला सिक्किममध्ये वीरमरण

    सातारा: ओझर्डे गावातील जवानाला सिक्किम मध्ये वीरमरण....

    सोमनाथ अरविंद तांगडे असे जवानाचे नाव...

    कर्तव्य बजावत असताना रात्रीच्या वेळी आलेल्या वादळी वाऱ्यात सापडून झाले होते जखमी....

    सिक्किम येथील काॅलिंग पाॅंग येथील मिलिट्री हाॅस्पीटल मध्ये उपचारा दरम्यान मृत्यू...

    वाई तालुक्यातील ओझर्डे गावावर शोककळा.....

    आज संध्याकाळ पर्यन्त मृतदेह ओझर्डे पोहचण्याची शक्यता....

  • 17 Apr 2021 08:54 AM (IST)

    पुण्यात कोरोनाची गंभीर रुग्णस्थिती लक्षात घेऊन महापालिकेकडून रुग्णवाहिकेची सेवा आता 24 तास उपलब्ध

    पुणे -

    शहरातील कोरोनाची गंभीर रुग्णस्थिती लक्षात घेऊन महापालिकेकडून रुग्णवाहिकेची सेवा आता 24 तास उपलब्ध

    त्यासाठी 56 रुग्णवाहिका उपलब्ध करून दिल्या असून, ही सेवा पूर्णपणे मोफत असणार

    रुग्णवाहिकेसाठी पालिकेच्या मोटार वाहन विभागाकडून नियंत्रण कक्ष सुरु

    तर कोरोनाबाधित मृत व्यक्‍तींसाठी शववाहिका उपलब्ध होण्यासाठी 'पीएमपीएमएल' येथे नियंत्रण कक्ष

    नागरिकांनी रुग्णवाहिका मिळण्यासाठी 9689939381 किंवा शासनाच्या 108 क्रमांकावर संपर्क साधण्याचे पालिका प्रशासनाचे आवाहन

  • 17 Apr 2021 08:52 AM (IST)

    नाशकात 5 मुलींचा वालदेवी धरणात बुडून मृत्यू

    नाशिक - 5 मुलींचा वालदेवी धरणात बुडून मृत्यू

    सकाळपासून शोधकार्याला पुन्हा एकदा सुरुवात

    5 पैकी काल एका मुलीचा मृतदेह मिळाला

    वाढदिवस साजरा करण्यासाठी गेले असता 5 मुली आणि 1 मुलगा पाण्यात बुडाले

  • 17 Apr 2021 08:51 AM (IST)

    पुण्यात अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी पीएमपीएलएमच्या 114 बस रस्त्यावर

    पुणे -

    अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांची वाहतूक करण्यासाठी पीएमपीएलएमच्या 114 बस रस्त्यावर

    57 मार्गांवर या बसेस धावणार आहेत

    पुणे शहर, पिंपरी चिंचवड आणि जिल्ह्यातील अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना या बसमधून प्रवास करता येणार

    सकाळी 6 ते रात्री 8 वाजून 30 मिनिटांपर्यंत या बस सुरू राहणार

    घरेलू कामगार, रुग्णांचे नातेवाईक, बाहेर गावाहून येणारे प्रवासी आणि लसीकरणासाठी जाणाऱ्या नागरिकांनाही बसमधून प्रवास करता येणार

  • 17 Apr 2021 08:49 AM (IST)

    जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात 10 पदांची मेगा भरती

    औरंगाबाद -

    जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागात 10 पदांची मेगा भरती

    ग्रामविकास राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिली माहिती

    10 हजार 127 पदांच्या भरतीसाठी मिळाली मंजुरी

    राज्यातील सर्वच जिल्ह्यांच्या जिल्हा परिषद आरोग्य विभागात होणार भरती

    कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भरती करण्याचा ग्रामविकास विभागाचा निर्णय

  • 17 Apr 2021 08:11 AM (IST)

    कोरोनाची दाहक वाढ कायम, नाशकात कोरोना बाधितांच्या संख्येत 4,435 रुग्णांची वाढ

    नाशिक -

    कोरोनाची दाहक वाढ कायम

    जिल्ह्यात दिवसभरात, कोरोना बाधितांच्या संख्येत 4435 रुग्णांनी झाली वाढ

    दिवसभरात 41 जणांचा मृत्यू

    बळींची आतापर्यंतची उच्चांकी संख्या

    अवघ्या 3 दिवसात बळींच शतक

    बळींची संख्या झाली 2857

    नाशिक शहर हॉटस्पॉट कायम

    दिवसभरात 2409 नवे बाधीत,9 बळी

  • 17 Apr 2021 08:10 AM (IST)

    नाशिक महापालिकेत मेगा भरती, 625 नवीन पदांना राज्य सरकारकडून मान्यता

    नाशिक -

    महापालिकेत मेगा भरती

    625 नवीन पदांना राज्य सरकारकडून मान्यता

    वैद्यकीय अधिक्षक, निवासी वैद्यकीय अधिकारी यासह अग्निशमन,लेखापरीक्षण,अभियांत्रिकीचा समावेश

    तर भरतीमध्ये भूमिपुत्रांना प्राधान्य देण्याची शिवसेना नेते अजय बोरस्ते यांची मागणी

  • 17 Apr 2021 07:35 AM (IST)

    नागपुरात वाढती कोरोना रुग्णांची संख्या बघता 1200 खाटा होणार उपलब्ध

    नागपूर ब्रेकिंग -

    नागपुरात वाढती कोरोना रुग्णांची संख्या बघता 1200 खाटा होणार उपलब्ध

    केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी घेतली घेतली प्रशासन व डाक्टर सोबत बैठक , व्यवस्थेचा आढावा घेत दिले आदेश

    पुढील काही दिवसात 1200 बेड उपलब्ध होणार

    मेयो आणि मेडिकल मध्ये प्रत्येकी 100 बेड , एम्स मध्ये 500 आणि महापालिका रुग्णालयात 300 अतिरिक्त बेड वाढणार

    सोबतच 5 हजार ऑक्सिजन सिलेंडर आणि 2 हजार व्हेंटिलेटर्स ची व्यवस्था केली जाणार जाणार

  • 17 Apr 2021 07:23 AM (IST)

    नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने 17 दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन 1 लाख 45 हजारचा दंड वसूल

    नागपूर -

    नागपूर महानगरपालिकेच्या उपद्रव शोध पथकाने 17 दूकाने/प्रतिष्ठानांवर कारवाई करुन 1 लाख 45 हजारचा दंड वसूल केला

    पथकाने ‍तिरपुडे रुग्णालय, ग्रामीण आर.टी.ओ.चौक, कामठी रोडवर सामान्य कच-यासोबत जैविक कचरा टाकण्यासाठी १५००० रुपयांचा दंड केला.

    तर ६३ प्रतिष्ठाने व मंगल कार्यालयांची तपासणी केली.

    शोध पथकांद्वारे ही कामगिरी पार पाडण्यात आली.

  • 17 Apr 2021 07:19 AM (IST)

    बुलडाण्यात अवैध रेती उत्खनन उठले मजुरांच्या जीवावर, रेतीच्या कड्याखाली युवक दबला

    बुलडाणा -

    अवैध रेती उत्खनन उठले मजुरांच्या जीवावर

    रेतीच्या कड्याखाली युवक दबला

    सोशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल

    नांदुरा तालुक्यातील ईसापूर

    भोटा परिसरातील घटना

    दबलेल्या युवकाला मजुरांनीच सुखरूप बाहेर काढले

  • 17 Apr 2021 07:05 AM (IST)

    पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणूक कोरोनाचे नियम पाळून मतदान प्रक्रियेला सुरुवात

    पंढरपूर -

    पंढरपूर मंगळवेढा विधानसभा पोट निवडणूक कोरोनाचे नियम पाळून मतदान प्रक्रियेला झाली सुरुवात

    सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत चालणार मतदान प्रक्रिया

    संध्याकाळी शेवटच्या एक तासाच कोरोनाबाधित मतदारास करता येणार मतदान

    भाजपाचे उमेदवार समाधान आवताडे आणि महाविकास आघाडीचे उमेदवार भगीरथ भालके यांच्या होतेय चुरस

    19 उमेदवार आजमावतयत आपले नशीब

  • 17 Apr 2021 06:47 AM (IST)

    31 डिसेंबर 2020 खार परिसरात झालेल्या जान्हवी कुकरेजा मर्डर प्रकरणात नवा ट्विस्ट

    31 डिसेंबर 2020 रोजी खार परिसरात झालेल्या जान्हवी कुकरेजा मर्डर प्रकरणात नवा ट्विस्ट

    जान्हवीच्या हत्येप्रकरणी खार पोलिसांकडून अटक करण्यात आलेला आरोपी श्री जोगधनकरच्या आईकडून खार पोलीस ठाण्यात तक्रार दाखल

    आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या श्री ला या प्रकरणात अडकवण्यात आल्याची तक्रार

    अटक करण्यात आली त्यावेळी श्रीच्या अंगावरही जखमा होत्या मात्र त्याकडे पोलिसांनी का दुर्लक्ष केलं असाही सवाल

    श्री ची आई भारती जोगधनकर हिने मुंबई पोलीस आयुक्तांकडेही तक्रार केलीय

  • 17 Apr 2021 06:41 AM (IST)

    मामाच्या मुलीचा नाद सोडला नाही म्हणून तरुणाचा दगडाने ठेचून खून

    सांगली -

    मामाच्या मुलीचा नाद सोडला नाही म्हणून तरुणाचा दगडाने ठेचून खून

    जत तालुक्यातील दरीबडची येथील घटना

    दोन संशयित आरोपी पोलिसांच्या ताब्यात

    या खुनाने जत तालुक्यात एकच खळबळ उडाली

    धनाजी भागप्पा टेंगले वय 19 वर्षे असे मयत तरुणाचे नाव

  • 17 Apr 2021 06:35 AM (IST)

    अकोल्यात लॉकडाऊनमध्ये दारुची तस्करी सुरूच; दीड लाखाचा मुद्देमाल जप्त

    अकोल्यात लॉकडाऊनमध्ये दारुची तस्करी सुरूच

    खदान पोलिसांनी कारवाई करत केला 1 लाख 50 हजारांचा मुद्देमाल जप्त

    देशी-विदेशी दारूची दुकाने, बीयर बार आणि मद्यालये बंद आहेत

    रात्रीच्या सुमारास कारवाई करीत दोन लोकांना ताब्यात घेतलंय

Published On - Apr 17,2021 10:27 PM

Follow us
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात
अजित पवार नालायक माणूस, वयस्कर माणसाची....सख्खा भाऊ दादांच्या विरोधात.
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल
भाजपला पक्षचिन्ह कमळ नाहीतर हातोडा द्या, ठाकरेंचा फडणवीसांवर हल्लाबोल.
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य
चिंता करु नका...महायुतीच्या जागावाटपाबाबत मुख्यमंत्र्यांचं मोठ वक्तव्य.
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात
इंडिया आघाडीची सभा म्हणजे फॅमिली गॅदरिंग अन्... शिंदेंचा घणाघात.
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर
मग घाबरता कशाला? अजितदादांच्या 2019 च्या वक्तव्यावर शिवतारेंचं उत्तर.
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट
लोकसभा लढवणार की नाही? शिवतारेंनी शिंदेंच्या भेटीनंतर केलं स्पष्ट.
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली
एवढी मोठी हस्ती, जीवाला धोका;कडूंनी उडवली राणांच्या वक्तव्याची खिल्ली.
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका
टाईमपास,फुलस्टॉप, केहना क्या चाहते हो; गांधींच्या सभेवर सामंतांची टीका.
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे
शरद पवार गटाकडून कोण लढणार लोकसभा? संभाव्य उमेदवारांची यादी tv9 कडे.
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा
भाजपला स्वतःची पोरं नाही, ते दुसऱ्यांच्या... राऊतांचा भाजपवर निशाणा.