Video | नाशिकच्या रामकुंड परिसरात पर्यटकांची गर्दी, कोरोना नियमांचे उल्लंघन

रामकुंड परिसरात मोठ्याप्रमाणात भाविक आणि पर्यटक गर्दी करत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. गर्दी वाढत असल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा देखील उडत असल्याचे पहायाला मिळत आहे.

Video | नाशिकच्या रामकुंड परिसरात पर्यटकांची गर्दी, कोरोना नियमांचे उल्लंघन
| Edited By: | Updated on: Dec 31, 2021 | 1:34 PM

नाशिक : कोरोनाचा नवा व्हेरिएंट असलेल्या ओमिक्रॉनने राज्यात धुमाकूळ घातला आहे. नाशिकमध्ये देखील ओमिक्रॉनने शिरकाव केल्याचे पहायला मिळत आहे. नाशिकमध्ये ओमिक्रॉनचा पहिला रुग्ण आढळून आला आहे. ओमिक्रॉनच्या प्रसाराचा वेग अधिक असल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. शहर प्रशासनाकडून नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कडक निर्बंध घालण्यात आले आहेत. पार्ट्यांना मज्जाव करण्यात आला आहे. मात्र दुसरीकडे नाशिकच्या रामकुंड परिसरात भाविक आणि पर्यटकांची गर्दी ओसंडून वाहत आहे.

कोरोना नियमांचे उल्लंघन

रामकुंड परिसरात मोठ्याप्रमाणात भाविक आणि पर्यटक गर्दी करत असल्याने कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. एकीकडे शहरात कोरोनाचे रुग्ण मोठ्याप्रमाणात वाढत आहेत. प्रशासनाकडून नागरिकांना कोरोनाच्या नियमांचे पालन करण्याचे आवाहन केले जात आहे. मात्र रामकुंड परिसरात आलेल्या भाविकांकडून आणि पर्यटकांकडून सर्रासपणे कोरोना नियमांचे उल्लंघ होत आहे. गर्दी वाढत असल्याने सोशल डिन्स्टसिंगचा फज्जा उडाला आहे. तसेच इथे येणारे पर्यटक मास्कचा वापर देखील करताना दिसून येत नाहीयेत.

राज्यात कडक निर्बंध 

दरम्यान ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर यापूर्वीच राज्यात कडक निर्बंध लागू करण्यात आले आहेत. राज्याची पुन्हा एकदा लॉकडाऊनच्या दिशेने वाटचाल सुरू असल्याचे पहायाला मिळ आहे. धार्मिक कार्यक्रमांवर देखील बंधने घालण्यात आले असून, लग्नाला फक्त 50 लोकांच्या उपस्थितीची परवानगी देण्यात आली आहे. तसेच राज्यात रात्री नऊ ते सकाळी सहादरम्यान जमावदीचे आदेश लागू करण्यात आले आहेत. या काळात पाच पेक्षा अधिक लोकांना एकत्र येण्यास मज्जाव करण्यात आला आहे.

संबंधित बातम्या

Satish Sawant | ईश्वरचिठ्ठीने सतीश सावंतांचा पराभव, साडेतीन वर्षांच्या चिमुरड्याचा कौल

सिंधुदुर्गाची माती आहे, इथं खरं करणाऱ्यालाच न्याय मिळतो; निलेश राणेंची पहिली प्रतिक्रिया

Election: मार्च महिन्यात राज्यातील 18 महापालिकांची निवडणूक, मुंबई आणि औरंगाबादची प्रक्रिया लांबणीवर?