नाशिकच्या उद्योगांचे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले वीजदर अनुदान अखेर सुरू

| Updated on: Sep 09, 2021 | 2:59 PM

गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले वीजदर अनुदान (Electricity tariff subsidy) अखेर नाशिकच्या उद्योगांना (Nashik industries) सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना काळात (Corona help) कोलमडलेल्या या क्षेत्राला थोडाफार मदतीचा हात मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.

नाशिकच्या उद्योगांचे गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले वीजदर अनुदान अखेर सुरू
संग्रहित.
Follow us on

नाशिकः गेल्या तीन महिन्यांपासून बंद असलेले वीजदर अनुदान (Electricity tariff subsidy) अखेर नाशिकच्या उद्योगांना (Nashik industries) सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कोरोना काळात (Corona help) कोलमडलेल्या या क्षेत्राला थोडाफार मदतीचा हात मिळण्याची शक्यता निर्माण झाली आहे.(Electricity tariff subsidy for Nashik industries, which has been closed for the last three months, has finally started)

2016 मध्ये यापूर्वीच्या राज्य सरकारने हे वीजदर सवलत अनुदान लागू केले होते. मात्र, यात काही मोजक्या उद्योगांचा समावेश असल्याच्या तक्रारी होत्या. याबाबत जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. गेल्या फेब्रुवारीपासून हे अनुदान बंद होते. मात्र, आता ते सुरू झाल्याने उद्योजकांना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. खरे तर या अनुदानाचा जवळपास 65 टक्के फायदा राज्यातल्या 15 स्टील उद्योगांना मिळाला आहे. खरे तर 7500 उत्पादक संस्थांना सरकारकडून 1200 कोटींची सूट दिली जाते.

उत्तर महाराष्ट्राचा नंतर समावेश

तत्कालीन राज्य सरकारने वीजदर अनुदान सुरू केले. त्यावेळेस फक्त मराठवाडा आणि विदर्भातील उद्योगाचा यामध्ये समावेश करण्यात आला होता. मात्र, यावर अनेकांनी आक्षेप घेतला. उत्तर महाराष्ट्रासह नाशिकच्या स्टील उद्योगांचा त्यात समावेश करा. अन्यथा नाशिकमधील स्टील उद्योग बंद पडतील, अशी मागणी करण्यात आली. या तीव्र असंतोषानंतर उशिरा का होईना उत्तर महाराष्ट्र आणि नाशिकच्या उद्योगांचा या योजनेत समावेश करण्यात आला होता.

अनुदान संपल्यामुळे बंद

वीजदर अनुदानाचे 1200 कोटींचे अनुदान डिसेंबरमध्ये संपले. त्यामुळे फेब्रुवारी २०२१ पासून हे अनुदान थांबविले होते. मात्र, ते फेब्रुवारी 2021 पासून सुरू करण्यात आले. आता उद्योजकांनी मे महिन्यापासून हे अनुदान लागू करण्याची मागणी केली आहे.

कोरोनात मदतीचा हात

वीजदर अनुदान सुरू झाल्यामुळे उद्योगांना मदतीचा हात मिळाला आहे. गेल्या दोन वर्षांपासून कोरोनाचे सावट आहे. त्यामुळे अनेक उद्योगांचा काम बंद पडले. अनेकांना युनिट बंद करायची वेळ आली, तर अनेकांनी कामगार कपातीचे धोरण अवलंबिले. या साऱ्या संकटाच्या पार्श्वभूमीवर आर्थिक संकटात सापडलेल्या उद्योगांना हे अनुदान लाभदायक ठरणार आहे. येणाऱ्या काळात सणासुदीचे वातावरण आहे. सध्या गणेशोत्सव सुरू आहे. त्यानंतर नवरात्रोत्सव, दसरा आणि दीपावलीत उद्योग क्षेत्र अजून कात टाकतील, असा विश्वास व्यक्त केला जात आहे. (Electricity tariff subsidy for Nashik industries, which has been closed for the last three months, has finally started)