AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

थेट माजी महापौरांनाच 200 तोळे सोन्याला चुना, घरातील महिलांच्या एका चुकीमूळे धक्कादायक प्रकार

माजी महापौर अशोक मुर्तडक यांची 200 तोळे सोन्याची फसवणूक झाली आहे. त्यांची पत्नी, मुलगी आणि सून या तिघींचे मिळून 200 तोळे सोने होते. एका भामट्याने तिघींनाही फसवल्याचे धक्कादायक प्रकरण समोर आले आहे.

थेट माजी महापौरांनाच 200 तोळे सोन्याला चुना, घरातील महिलांच्या एका चुकीमूळे धक्कादायक प्रकार
Ashok MurtadakImage Credit source: Tv9 Marathi
| Updated on: Jul 19, 2026 | 9:54 AM
Share

नाशिकच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवणारी घटना समोर आली आहे. नाशिकचे माजी महापौर अशोक मुर्तडक यांच्या कुटुंबाची तब्बल २०० तोळे सोन्याची फसवणूक झाली आहे. घरातील जुने सोन्याचे दागिने दुप्पट करून देण्याचे आमिष दाखवून एका सराफ व्यावसायिकाने कोट्यवधी रुपयांचा गंडा घातला आहे. या हायप्रोफाईल फसवणुकीप्रकरणी नाशिकच्या पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, संपूर्ण शहरात याची चर्चा रंगली आहे.

विश्वास संपादन करून केली फसवणूक

मिळालेल्या माहितीनुसार, संशयित सराफ व्यावसायिक योगेश बाळकृष्ण दाभाडे याने गेल्या दोन वर्षांपासून मुर्तडक कुटुंबाशी जवळीक साधली होती. कुटुंबाचा पूर्ण विश्वास संपादन केल्यानंतर त्याने घरातील महिलांना एक आकर्षक योजना सांगितली. जुने सोन्याचे दागिने दिल्यास ते दुप्पट करून परत देतो, असे आमिष दाखवले. या भूलथापेला बळी पडून मुर्तडक यांच्या कुटुंबातील महिलांनी घरातील दागिने त्याच्या स्वाधीन केले.

वाचा: वडिलांनीच केले लैंगिक शोषण, 80च्या दशकातील अभिनेत्रीवर 22 केस, ती अभिनेत्री सध्या काय करते?

२०० तोळे सोन्यावर मारला डल्ला

संशयित योगेश दाभाडे याने अत्यंत नियोजनबद्ध पद्धतीने कुटुंबातील महिलांना आपल्या जाळ्यात ओढले. त्याने अशोक मुर्तडक यांच्या पत्नीकडील १०० तोळे, मुलीकडील ५० तोळे आणि सुनेकडील ५० तोळे असे एकूण २०० तोळे (सुमारे २ किलो) सोन्याचे दागिने दुप्पट करण्याच्या बहाण्याने ताब्यात घेतले. बाजारभावानुसार या सोन्याची किंमत कोट्यवधी रुपयांमध्ये आहे. दागिने ताब्यात घेतल्यानंतर संशयित व्यक्तीने दीड वर्षांपासून केवळ वेळकाढूपणा केला. मूळ दागिने परत करण्याऐवजी विविध कारणे देऊन तो टाळाटाळ करत राहिला. त्यानंतर कुटुंबातील महिलांनी ही घटना अशोक मुर्तडक यांच्या कानावर घातली.

अखेर कुटुंबाला फसवणूक झाल्याचे समजताच अशोक मुर्तडक यांनी पंचवटी पोलीस ठाण्यात धाव घेत अधिकृत तक्रार दाखल केली. पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करून मोठ्या आर्थिक फसवणुकीचा सखोल तपास सुरू केला आहे. मात्र, मुर्तडक कुटुंबियांची झालेली फसवणुक पाहून नाशिकमध्ये खळबळ माजली आहे.

Follow Us
जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
Manoj Jarange Hunger Strike | जरांगेंचा सरकारला अंतिम इशारा, नेमकं काय म्हणाले?
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर...
धराशिवमध्ये राणा जगजितसिंह पाटील यांच्या निवासस्थानासमोर तीव्र आंदोलन, असं काय घडलं?
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत...
मनोज जरांगे पाटील उपोषण सोडणार की नाही? शिष्टमंडळासोबतच्या चर्चेत नेमकं काय घडलं?
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासक...
तोडगा निघणार? मनोज जरांगेंना भेटण्यापूर्वी शिष्टमंडळाची अभ्यासकांसोबत सविस्तर चर्चा
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
भिवंडी पालिकेत महत्त्वाची बैठक, नगरसेविका कँडी क्रश खेळण्यात मग्न
36 Jilhe 50 Batmya | 36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या;
36 जिल्ह्यांतील 50 महत्त्वाच्या बातम्या; मराठा आंदोलनासह राज्यात मोठ्या घडामोडी, जाणून घ्या एका क्लिकवर
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार- सुनेत्रा पवार
दादांच्या जाण्याचं दुःख माझ्यापेक्षा जास्त कुणाला असणार' सुप्रिया सुळेंचे नाव घेत सुनेत्रा पवार म्हणाल्या...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय...
बोरीवलीतील दहीहंडी महोत्सवासाठी जय्यत तयारी; सेलिब्रिटी आणि राजकीय नेत्यांची असणार मांदियाळी
ठाण्यातील संकल्प प्रतिष्ठानच्या २१व्या दहीहंडी उत्सवाची तयारी सरु
आमदार रवींद्र फाटक यांनी केली ठाण्यातील २१व्या संकल्प प्रतिष्ठान दहीहंडी महोत्सवाची घोषणा
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा;
विद्यानंद बापट यांच्या डीजेविरोधी भूमिकेला पालकांचा पाठिंबा; हल्ल्याचा निषेध करत केली मोठी मागणी