Mahayuti : नाशिकमध्ये आज काहीतरी मोठं घडू शकतं, अखेर निर्णयाचा तो दिवस आलाच

| Updated on: Apr 05, 2024 | 9:08 AM

शिवसेनेचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत. नाशिकची जागा आपल्यालाच मिळावी, यासाठी त्यांनी शक्ती प्रदर्शन सुद्धा केलय. नाशिकमध्ये भाजपाची ताकदही जास्त आहे. भाजपाचे आमदार, नगरसेवक मोठ्या संख्येने आहेत. भाजपाची शक्ती वाढली आहे.

Mahayuti : नाशिकमध्ये आज काहीतरी मोठं घडू शकतं, अखेर निर्णयाचा तो दिवस आलाच
महायुती
Follow us on

मागच्या अनेक दिवसांपासून नाशिक लोकसभेच्या जागेवरुन महायुतीमध्ये मोठा पेच निर्माण झाला आहे. नाशिकची जागा महायुतीमध्ये प्रतिष्ठेचा विषय बनली आहे. नाशिकच्या जागेवरुन शिवसेना शिंदे गट दावा मागे घ्यायला तयार नाहीय. भाजपाकडून सुद्धा नाशिक लोकसभेच्या जागेवर दावा सांगितला जातोय. त्याचवेळी राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा मिळणार अशी सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे नाशिकची जागा महायुतीमध्ये कोणाला मिळणार? इथून कोण उमेदवार असणार? या प्रश्नाच आज उत्तर मिळू शकतं. शिवसेनेचे हेमंत गोडसे विद्यमान खासदार आहेत. नाशिकची जागा आपल्यालाच मिळावी, यासाठी त्यांनी शक्ती प्रदर्शन सुद्धा केलय. नाशिकमध्ये त्यांनी प्रचाराला सुरुवात सुद्धा केली आहे. महायुतीमध्ये बैठकांवर बैठका झाल्या, पण नाशिकच्या जागेवर अद्यापपर्यंत निर्णय होऊ शकला नव्हता.

नाशिकमध्ये भाजपाची ताकदही जास्त आहे. भाजपाचे आमदार, नगरसेवक मोठ्या संख्येने आहेत. भाजपाची शक्ती वाढली आहे. त्यामुळे नाशिकच्या जागेवर भाजपाकडूनही दावा सांगितला जात होता. राजकारणात कधी कुठली गोष्ट सोडायची नसते, ही तिन्ही पक्षांना माहित आहे. कारण राजकारणात एकदा एखादी गोष्टा हातातून गेली की, ती पुन्हा कधी मिळेल हे सांगता येत नाही. नाशिकमध्ये हेमंत गोडसे मागच्या दोन टर्मपासून खासदार आहेत. आतापर्यंत ही जागा शिवसेनेकडे होती. पण शिवसेनेत दोन गट झाल्यानंतर ताकद विखुरली गेली.

आज हेमंत गोडसे यांच्या भूमिकेकडे लक्ष

दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार, छगन भुजबळ यांची उमेदवारी आज जाहीर होऊ शकते. पत्रकार परिषद घेऊन आज त्यांची उमेदवारी जाहीर केली जाणार. नाशिकच्या जागेचा तिढा आज अखेर सुटण्याची शक्यता. विश्वसनीय सूत्रांची TV 9 ला माहिती. गेल्या 15 दिवसांपासून नाशिकच्या जागेवरून गोंधळ सुरू आहे. भुजबळांची उमेदवारी जाहीर झाल्यास हेमंत गोडसे यांच्या भूमिकेकडे लक्ष असेल. हेमंत गोडसे काय पाऊल उचलतात? याकडे राजकीय जाणकारांच लक्ष लागल आहे.