निफाडमध्ये तुरटीच्या गणपतीचं विसर्जन, येवल्यात साध्या पद्धतीने बाप्पाला निरोप, मनमाडमध्ये कडक निर्बंधामुळे भक्तांचा हिरमोड

| Updated on: Sep 19, 2021 | 1:25 PM

गणेशोत्सवाला 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आणि बघता बघता आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवसही उगवला. 10 दिवस गणेशाची आराधना केलयानंतर आज गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जात आहे.

निफाडमध्ये तुरटीच्या गणपतीचं विसर्जन, येवल्यात साध्या पद्धतीने बाप्पाला निरोप, मनमाडमध्ये कडक निर्बंधामुळे भक्तांचा हिरमोड
गणपती विसर्जन
Follow us on

नाशिक : गणेशोत्सवाला 10 सप्टेंबर गणेश चतुर्थीपासून सुरुवात झाली आणि बघता बघता आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्याचा दिवसही उगवला. 10 दिवस गणेशाची आराधना केलयानंतर आज गणरायाला भावपूर्ण वातावरणात निरोप दिला जात आहे. नाशिकच्या ग्रामीण भागांत अतिशय साध्या आणि पारंपारिक पद्धतीने गणपती बाप्पाला निरोप देण्यात आला.

फटाक्यांची आतिषबाजी, ढोलताशे वाजवत, गुलाल-फुलांची उधळण करत धुमधडाक्यात गणेशोत्सव साजरा करण्याची आपली परंपरा… मात्र कोरोनामुळे सर्वच सण उत्सवावर निर्बंध आले असून सलग दुसऱ्या वर्षी मनमाड, मालेगाव यासह नाशिकच्या ग्रामीण भागात सकाळ पासून साध्या पद्धतीने श्रीं च्या मूर्ती विसर्जनाला सुरुवात झाली. घरगुती सोबत सार्वजनिक मंडळांनी विघ्नहर्त्याला भावपूर्ण निरोप दिला. मनमाडला मानाचा मानला जाणारा निलमणी गणेश मंडळाने बाप्पाच्या मूर्तीला पुणेरी पद्धतीने पालखीत बसवून गणेश कुंडावर आणून विसर्जन केले. विसर्जनासाठी मालेगाव महापालिका तर्फे कृत्रिम तलाव तयार करण्यात आले असून पालिका, ग्रामपंचायततर्फे ठिकठिकाणी व्यवस्था करण्यात आली होती. दुसरीकडे कडक निर्बंध लावण्यात आल्यामुळे भक्तांचा हिरमोड झाला.

निफाडमध्ये तुरटीच्या गणपतीचं विसर्जन

निफाड तालुक्यातील चांदोरी येथे एक गाव एक गणपती उपक्रम आपत्ती व्यवस्थापन समितीच्या माध्यमातून राबवण्यात आला होता. प्रदूषण होऊ नये म्हणून तुरटीची ही गणपतीची मूर्ती  दिल्ली येथील नोएडा येथून मागवण्यात आली होती. या तुरटीच्या गणेश मूर्तीचे आज सकाळी गोदातीरी टाळ मृदुंगाच्या गजरात विसर्जन करण्यात आले. विसर्जनाच्यावेळी गोदावरीतील पाणी प्रदूषित होणार नाही याचीही मंडळाने दक्षता घेतली होती.

येवल्यात साध्या पद्धतीने बाप्पाचं विसर्जन

येवल्यात अत्यंत साधेपणाने गणपती बाप्पाचे विसर्जन करण्यात येत असून भाटगाव येथील विश्वलता कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात गणपती बाप्पाचं कुत्रीम कुंडामध्ये अत्यंत साध्या पद्धतीने विसर्जन करण्यात आले. यावेळी सर्व विद्यार्थ्यांनी व कॉलेजच्या स्टाफने फेटे परिधान केले होते तसेच आपल्या हातात कोरोनामुक्ती जनजागृतीचे फलक घेऊन गणपती बाप्पाला निरोप दिला. यात ‘लसीकरण करूया, कोरोनाला पळवूया’, ‘सोशल डिस्टनसिंग पाळा, कोरोनाचा धोका टाळा, ‘मास्क वापरा, कोरोना संसर्ग टाळा’ असे कोरोना जनजागृती फलक घेऊन आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यात आला.

हे ही वाचा :

Ganesh Visarjan 2021 Live Update | लालबागचा राजा विसर्जनासाठी मार्गस्थ