Lasalgaon | काय ती मका …काय त्या लष्करी अळ्या….आमचा हातातोंडाशी आलेला घास निघून गेला हो…म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर…

| Updated on: Aug 17, 2022 | 1:23 PM

मक्याच्या 40 ते 45 दिवसाच्या या पिकावर अमेरिकन लष्कर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून पावसाची थांबून थांबून जोरदार हजेरी होत असल्याने मका पिकावर कीटकनाशकांची फवारणी करूनही फायदा न झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.

Lasalgaon | काय ती मका ...काय त्या लष्करी अळ्या....आमचा हातातोंडाशी आलेला घास निघून गेला हो...म्हणण्याची वेळ शेतकऱ्यांवर...
Follow us on

लासलगाव : कांद्याचीनगरी म्हणून ओळख असलेल्या लासलगाव (Lasalgaon) जवळील ब्राह्मणगाव (विंचूर) सह निफाड येथील शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. तालुक्यातील अनेक गावात पावसाळी मक्याचे पीक घेतले असून या मक्याच्या पिकावर पुढील पीक घेण्याच्या दृष्टीने शेतकऱ्यांनी (Farmer) मोठ्या प्रमाणात शेतांमध्ये मक्याची लागवड केली होती. जनावरांच्या चाऱ्यासाठी मक्याची लागवड खास करून केली जाते. यंदा वरून राजाने चांगलीच हजेरी लावल्यामुळे पावसाळी (Rain) मक्याची लागवड शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात केली.

अमेरिकन लष्कर अळीच्या प्रादुर्भावामुळे मक्याचे मोठे नुकसान

मक्याच्या 40 ते 45 दिवसाच्या या पिकावर अमेरिकन लष्कर अळीचा प्रादुर्भाव झाला आहे. गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून पावसाची थांबून थांबून जोरदार हजेरी होत असल्याने मका पिकावर कीटकनाशकांची फवारणी करूनही फायदा न झाल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. त्यामुळे मक्याच्या उत्पादनात घट होणार असल्याने संकेत देखील मिळत आहेत. मक्याच्या पिकावर अमेरिकन लष्कर अळीचा प्रादुर्भाव झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.

हे सुद्धा वाचा

जनावरांच्या चाऱ्याचाही मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा

आळीच्या प्रादुर्भावाने मक्याचे पिक वाया गेल्याने जनावरांच्या चाऱ्याचाही प्रश्न निर्माण होण्याची भीती मका उत्पादक शेतकरी करत आहेत. या मका पिकासाठी मातीबोल बाजारभावाने कांद्याची विक्री करून पीक शेतकऱ्यांनी घेतले होते. आता पुढे करावे काय असा प्रश्न या बळीराजासमोर उभा राहिला आहे. तसेच जनावरांसाठी चारा कुठून आणावा हा मोठा प्रश्न शेतकऱ्यांसमोर उभा आहे.