सणासुदीच्या काळात केला जाणारा ‘हा’ स्पेशल मेन्यू चक्क रेल्वेप्रवासाच्या भोजनात मिळणार…
भारतीय रेल्वेने पदार्थांमध्ये वाढ गेली आहे, त्यामुळे भारतीय रेल्वेत प्रवास करतांना आपल्या आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.

नाशिक : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांना आता भोजनात काही खास पदार्थ मिळणार आहे. भारतीय रेल्वेने नुकतेच जारी केलेल्या मेन्यू कार्डमध्ये महाराष्ट्राच्या खाद्यसंस्कृतीतील पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. यामध्ये विशेष म्हणजे सणासुदीच्या काळात गोडधोड केले जाणारे पदार्थ दिले जाणार आहे. यामुळे रेल्वेने प्रवास करणाऱ्यांसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल. भारतीय रेल्वेच्या आयआरसीटीसीच्या विभागाने भोजनाची खास सेवा उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये महाराष्ट्रातील सणावाराला केली जाणारी पुरणपोळी देखील मिळणार आहे. इतकंच काय महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात पिकवली जाणारी बाजरीच्या पदार्थांचा देखील समावेश आहे. त्यामुळे रेल्वेच्या प्रवासात ज्या रेल्वेत भोजनाची सुविधा उपलब्ध असणार आहे. त्या रेल्वेत ही सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे.
खरंतर प्रवासा दरम्यान अनेकदा मिळेल ते किंवा उपलब्ध होईल ते जेवण, नाष्टा अनेक जण करून घेतात, त्यामध्ये रेल्वेत तर अनेकदा पर्यायच नसतात.
लांब पल्ल्याच्या रेल्वेत भोजनाची सुविधा उपलब्ध असते, त्यामध्ये महाराष्ट्राचे अनेक पदार्थ आहेत, मात्र आता पुरणपोळी आणि भाजरीपासून बनविले जाणारे पदार्थ उपलब्ध असणार आहे.




भारतीय रेल्वेने पदार्थांमध्ये वाढ गेली आहे, त्यामुळे भारतीय रेल्वेत प्रवास करतांना आपल्या आवडीच्या पदार्थांचा आस्वाद घेता येणार आहे.
भारतीय रेल्वेशी संबंधित असलेल्या आयआरसीटीसी कडून ही भोजनाची सेवा पुरवली जाणार आहे. त्यामध्ये काही ठराविक पदार्थांचा समावेश होता. आता त्यात भर टाकली गेली आहे.
खरंतर हा निर्णय घेण्यामागे एक खास कारण आहे. 2023 हे वर्ष बाजरीचे आंतरराष्ट्रीय वर्ष शासनाकडून साजरे केले जाणार आहे. त्यानुसार केंद्र सरकारच्या पौष्टिक खाद्य पदार्थाच्या उपक्रमाचा उत्सव साजरा केला जाणार आहे.
खाद्यपदार्थ, विविध ऋतूंत बनविल्या जाणाऱ्या पाककृती, सणासुदीतील खाद्यपदार्थ, मुलांना आवश्यक असलेले खाद्यपदार्थ, भरड धान्यावर आधारित स्थानिक खाद्यपदार्थ, आरोग्यदायी खाद्यपदार्थ उपलब्ध करून दिले जाणार आहे.