Ashok Kharat: खरातचा पाय अजून खोलात! तक्रारींसाठी महिला सरसावल्या, भोंदूबाबाविरोधात गुन्ह्याचा आकडा वाढणार

Ashok Kharat FIR : अशोक खरात याचा पाय अजून खोलात गेला आहे. त्याच्याविरोधात तक्रार करणाऱ्या महिलांची संख्या आता आणखी वाढली आहे. महिलांना यंत्रणांनी विश्वास दिल्यानं आता खरातविरोधात तक्रारकर्त्या महिलांची संख्या वाढली आहे. त्याच्या अडचणीत मोठी वाढ झाली आहे.

Ashok Kharat: खरातचा पाय अजून खोलात! तक्रारींसाठी महिला सरसावल्या, भोंदूबाबाविरोधात गुन्ह्याचा आकडा वाढणार
अशोक खरात, गुन्हा दाखल
Image Credit source: गुगल
| Edited By: | Updated on: Mar 27, 2026 | 2:23 PM

FIR Filed Against Ashok Kharat: नाशिकचा भामटा अशोक खरात याने धर्माच्या नावाखाली बाजारा मांडला. त्याने 150 हून अधिक महिलांवर अत्याचार केल्याचा आरोप आहे. हा आकडा वाढण्याची भीती आहे. पूजेच्या नावाखाली, तंत्र-मंत्राची भीती घालत त्याने अनेकांकडून बक्कळ रक्कम उकळली. त्याच्या संपत्तीचा आकडा 1500 कोटींहून अधिक असल्याचे तपास यंत्रणांच्या चौकशीत समोर आले आहे. एसआयटी त्याच्या मालमत्तेचा शोध घेत आहेत. 10 वी नापास व्यक्तीने भल्याभल्यांना त्याच्या पायाशी लोटांगण घालायला लावले आहे. आता तो कायदासमोर लांबलाट झाला आहे. त्याच्याविरोधात तक्रारकर्त्यां महिलांची संख्या पुन्हा वाढली आहे. त्याच्याविरोधातील गुन्ह्यांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.

खरातविरोधात महिला सरसावल्या

भोंदू अशोक खरात प्रकरणात तक्रारीसाठी पीडित महिला सरसावल्या आहेत. याप्रकरणी एसआयटीने अगोदर हेल्पलाईन क्रमांक जाहीर केले आहे. तर पीडितेची गोपनियेता राखली जाणार असल्याचा विश्वास देण्यात यंत्रणा यशस्वी ठरल्या आहेत. त्यामुळे खरात विरोधात महिला तक्रारीसाठी पुढे येत आहेत. काही महिलांनी त्याच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे. लैंगिक अत्याचार आणि फसवणूक प्रकरणात आणखी दोन ते तीन पीडित महिला तक्रार देण्यासाठी पुढे आल्या आहेत. खरातवर सध्या एकूण ८ गुन्हे दाखल आहेत. नव्या तक्रारींवर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. तपासाचा विस्तार वाढल्यानं पीडितांची संख्या वाढण्याची शक्यता आहे. लैंगिक शोषणाचा आरोप असलेला खरातचा पाय आणखी खोलात गेला आहे.

खूनाचा गुन्हा दाखल होण्याची शक्यता

नाशिक येथील गवळाने या गावातील शेतकरी विलास जाधव यांनी खरात याच्यावर मोठा गंभीर आरोप केला आहे. आपल्या भावाची हत्या भोंदू अशोक खरात यानेच केल्याचा आरोप त्यांनी केला आहे. त्यावेळी पोलिसांमध्ये तक्रार दाखल केली होती. पण खरातने दबाव आणल्याने काहीच कारवाई झाले नसल्याचे जाधव यांचे म्हणणे आहे. खरातने जमीन सुद्धा हडपल्याचा त्यांनी आरोप केला. 2022 मध्ये ही हत्या झाल्याचा आरोप करण्यात आला आहे. पोलिसांमध्ये त्यावेळी तक्रार देऊनही प्रकरणात कारवाई न झाल्याचे विलास जाधव यांचा आरोप आहे.

तर भोंदू बाबा अशोक खरात यांच्याविरोधात गर्भलिंग निदान प्रतिबंधक कायदा अंतर्गत (पीसीपीएनडीटी ) गुन्हा दाखल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मुलगा हवा की मुलगी यासाठी संतती प्राप्तीसाठी अशोक खरात याने तोटके केल्याचा आरोप त्याच्यावर करण्यात आलेला आहे. तर खरातने पूजा विधीच्या नावाखाली सात महिन्याच्या गर्भवती महिलेवर अत्याचार केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे खरात सुटण्याची शक्यता धूसर झाली आहे.

Follow Us