AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Ashok Kharat: जादूटोण्याची भीती, अघोरी पूजा, भोंदू खरातने इतकी जमवली माया, , मालमत्ता मोजता मोजता यंत्रणांना लागला दम

Ashok Kharat Networth: अघोरी पूजा, जादूटोण्याची भीती, तंत्र-मंत्राद्वारे वशिकरण अशा भुलथापा देऊन भोंदू खरातने इतक्या हजार कोटींची संपत्ती जमवली आहे. तो आकडा वाचून तुम्हालाही धक्का बसेल. यंत्रणांना मालमत्तांची मोजदाद करताना नाकेनऊ आले. त्याच्या संपत्तीचा अजूनही शोध सुरू आहे.

Ashok Kharat: जादूटोण्याची भीती, अघोरी पूजा, भोंदू खरातने इतकी जमवली माया, , मालमत्ता मोजता मोजता यंत्रणांना लागला दम
अशोक खरात संपत्तीImage Credit source: गुगल
| Updated on: Mar 27, 2026 | 8:43 AM
Share

Ashok Kharat Networth: अघोरी पूजा, जादूटोणा करण्याची भीती घालून भोंदू अशोक खरातने अनेकांना गंडा घातला. त्याने अनेकांचे आयुष्य उद्धवस्त केले. अनेक महिलांना वशिकरण आणि नातेवाईकांना ठार करण्याची भीती दाखवून जाळ्यात ओढले. त्यांचा लैंगिक छळ केला. आता खरातची पोलिसांनी वरात काढली आहे. त्याचे संपत्तीचे आकडे अनेकांचे डोळे गरगर फिरवणारे आहेत. त्याची मालमत्ता मोजता मोजता यंत्रणाही थकल्या. त्याच्या संपत्तीचा अजूनही शोध सुरू आहे.

1500 कोटींपेक्षा अधिक मालमत्तेवर SIT ची नजर

भोंदू खरातची आतापर्यंत 1500 कोटींपेक्षा अधिक मालमत्ता समोर आली आहे. यामध्ये आलिशान फार्महाऊस, बंगले, मालमत्ता, घर, व्यावसायिक गाळे, दुकानं आणि इतर मालमत्तांचा समावेश आहे. तर रोख आणि त्याने केलेली गुंतवणुकीचाही शोध सुरू आहे. या 1500 कोटींपेक्षा अधिक मालमत्तेवर SIT ची नजर आहे. एसआयटीनं खरात आणि त्याच्या कुटुंबियांच्या मालमत्तेची माहिती मागितली आहे. खरातच्या मालमतेच्या शोधासाठी एसआयटी आता नोंदणी विभागाची मदत घेत आहे.

ईडी,फॉरेक्स आणि कस्टमचाही ससेमिरा

खरात याने अवैध आणी इतर मार्गांनी अनेकांना गंडा घातल्याचे समोर आले आहे. त्याने काही व्यावसायिकांना मृत्यूची भीती घालून कोट्यवधीच्या कार, फर्निचर आणि परदेश वारी केल्याचे उघड झाले आहे. त्याविषयीच्या तक्रारींचा ओघ सुरूच आहे. एकामागून एक धक्कादायक खुलासे याप्रकरणात समोर येत आहे. देवाच्या नावाखाली त्याने सुरू केलेला हा जादूटोण्याचा धंदा त्याच्या अंगलट आला आहे. त्याच्या भांडाफोड झाल्यानंतर त्याच्या राजकीय चेल्यांनी सु्द्धा अंग झटकल्याचे दिसून येत आहे. तर आता खरात याच्या मागे ईडी, फॉरेक्स आणि कस्टमाचाही ससेमिरा लागण्याची चिन्ह आहेत. खरातच्या व्यवहारांची कागदपत्रे ईडीला देण्यात येणार आहे.  त्याची आर्थिक कुंडली आता बाहेर येण्याची शक्यता आहे. तर त्याचे कुणाशी आर्थिक व्यवहार होते. त्याचे कोण कोण भागीदार होते यांची नावं सुद्धा बाहेर येण्याची शक्यता वर्तवली जात आहे.  त्यामुळे आता कोणतीही दैवी शक्ती खरातला वाचवण्यासाठी पुढे येणार नाही हे सध्या तरी पक्कं आहे.  त्याचे आणि राजकारण्यांच्या आर्थिक व्यवहारांचे बिंग फुटून कोण कोण अडकते याची सध्या चर्चा सुरू आहे.

Follow Us
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट
महाराष्ट्राच्या लेकीची गगन भरारी! मुलांच्या सुरक्षेसाठी बनवलं स्मार्ट आयडी कार्ड, थेट जपान दौऱ्यासाठी निवड
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर...
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? सुप्रिया सुळेंनी दिलं स्पष्ट उत्तर; म्हणाल्या, माझा भाऊ गेल्यानंतर...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर भोजपुरी गाण्यांचा धुमाकूळ; मराठी संघटना...
मुंबईतील रेल्वे स्थानकांवर छठपुजा गाण्यामुळे वाद; रेल्वे व्यवस्थापकांनी काय दिलं उत्तर?
तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन्
Girish Mahajan : तहसील कार्यालयातील घाण पाहून गिरीश महाजन संतापले; हातात झाडू घेतली अन् स्वतःच...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला...
पार्सल रद्द केल्याचा राग अनावर! डिलिव्हरी बॉयची वृद्ध दाम्पत्याला बेदम मारहाण, मित्रांसह पुन्हा हल्ला
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्य
मोठी बातमी! अमूलच्या दुधाच्या दरात वाढ, आजपासून नवे दर लागू; जाणून घ्या किती महागले दूध
मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा
MNS : मुंबईच्या बाणगंगेत छठपूजेवरून वाद; मनसेचा तीव्र विरोध, आंदोलनाचा इशारा!
तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे
Omraje Nikmbalkar : 'तर माझ्यासारखा आंनदी दुसरा कुणी नसेल; उद्धव ठाकरे गटाचं नाव घेत ओमराजे नेमकं काय म्हणाले?
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदार...
बोदवडकरांचा पाणीप्रश्न पेटला! 23 गावांचा पाणीपुरवठा ठप्प, आमदारांचा अधिकाऱ्यांना जाब
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या...
भाऊबीजेला सुषमा अंधारेंची धनंजय मुंडेंना खास शुभेच्छा; म्हणाल्या, 'भाऊ माझा मंत्री होऊ दे!'