बाजारपेठेतील गर्दी कमी करा, अन्यथा कडक निर्बंध, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांसह पालिका आयुक्तांचा इशारा

| Updated on: Jun 03, 2021 | 12:24 PM

नाशिक शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे नाशिकमध्ये ब्रेक द चैनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. Nashik Corona rules

बाजारपेठेतील गर्दी कमी करा, अन्यथा कडक निर्बंध, नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांसह पालिका आयुक्तांचा इशारा
Follow us on

चंदन पुजाधिकारी, टीव्ही 9  मराठी नाशिक: शहरासह जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यामुळे नाशिकमध्ये ब्रेक द चैनचे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. निर्बंध शिथील झाल्यानंतर नाशिकमध्ये बाजारपेठेत गर्दी पाहायला मिळाली. नागरिकांनी गर्दी कमी न केल्यास नाशिक मध्ये पुन्हा कडक निर्बंध लावण्याचा इशारा नाशिकचे जिल्हाधिकारी सूरज मांढरे आणि महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी दिला आहे. पॉझिटिव्हीटी रेट 10 च्या वरती गेल्यास पुन्हा निर्बंध लावण्यात येतील, अस इशारा त्यांनी दिला आहे. (Nashik Collector and Municipal Commissioner warns people to follow covid rules hence strict restrictions will be imposed)

नागरिकांनी गर्दी कमी करावी

नाशिकचे जिल्हाधिकारी सुरज मांढरे आणि महापालिका आयुक्त राधाकृष्ण गमे यांनी नागरिकांना बाजारपेठेतील गर्दी कमी करण्याचं आवाहन केलं आहे. शहरासह जिल्ह्यात पुन्हा कोरोना वाढल्यास कडक निर्बंध लावण्यात येतील, असा इशारा देखील त्यांनी दिला आहे. नाशिकच्या पॉझिटिव्हीटी रेट 10 टक्केंच्यावर गेल्यास कडक निर्बंध लावणार असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

निर्बंध शिथील, कोरोना नियमांची पायमल्ली

राज्य सरकारनं नव्यान जारी केलेल्या नियमांच्या आधारे निर्बंध शिथील करण्यात आले आहेत. निर्बंधशिथील होताच नागरिकांनी शहरात वेगवेगळ्या बाजारपेठांमध्ये गर्दी केल्याचं चित्र पाहायला मिळाले. शहरात गेल्या 2 दिवसापासून कोरोना नियमांची पायमल्ली होताना दिसत आहे. कोरोना प्रतिबंधक निर्बंधांची पायमल्ली होऊ नये म्हणून जिल्हाधिकारी आणि महापालिका आयुक्तांनी इशारा दिला आहे. याला नाशिककर कसा प्रतिसाद देतात यावर पुढील कार्यवाही अवलंबून आहे.

नाशिकमध्ये लस खरेदी लवकरच सुरू होण्याची चिन्ह

मुंबई, ठाणे महापालिकेच्या जागतिक पातळीवरच्या निविदा प्रक्रिया अंतिम टप्प्यात आल्या आहेत. नाशिक मनपा देखील 5 लाख लसींचा खरेदी करणार आहे.5 जून रोजी कोणत्या कंपनीची लस मिळणार आणि किती मिळणार हे स्पष्ट होणार आहे. नाशिकमध्ये 14 लाख लोकांचे लसीकरण आवश्यक आहे. आतापर्यंत 3 लाख लोकांनी लस घेतल्याचं स्पष्ट झालं आहे.

नाशिक कोरोना अपडेट: 2 जून 2021

पूर्ण बरे झालेले रुग्ण- 1044

पॉझिटीव्ह रुग्ण संख्येत झालेली वाढ – 678

नाशिक मनपा- 275
नाशिक ग्रामीण- 377
मालेगाव मनपा- 14
जिल्हा बाह्य- 12

नाशिक जिल्ह्यातील एकूण मृत्यू – 4789

2 जून एकूण मृत्यु -35

नाशिक मनपा- 13
मालेगाव मनपा- 02
नाशिक ग्रामीण- 20
जिल्हा बाह्य- 00

संबंधित बातम्या:

नाशिक पालिका आयुक्तांच्या तंबी, खासगी रुग्णालयाच्या डॉक्टरांकडून कोरोना रुग्णांना दाखल करून घेणं सुरू

रुग्णालयातील 80 टक्के जागा अधिग्रहित, नियम सर्वांना सारखे, डॉक्टर असोसिएशन विरोधात नाशिकचे जिल्हाधिकारी आक्रमक

(Nashik Collector and Municipal Commissioner warns people to follow covid rules hence strict restrictions will be imposed)