रुग्णालयातील 80 टक्के जागा अधिग्रहित, नियम सर्वांना सारखे, डॉक्टर असोसिएशन विरोधात नाशिकचे जिल्हाधिकारी आक्रमक

जिल्हाधिकारी यांनी डॉक्टर असोसिएशनशी संपर्क साधत अशी भूमिका घेणं योग्य नाही, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. Nashik Collector Suraj Mandhare

रुग्णालयातील 80 टक्के जागा अधिग्रहित, नियम सर्वांना सारखे, डॉक्टर असोसिएशन विरोधात नाशिकचे जिल्हाधिकारी आक्रमक
सुरज मांढरे, जिल्हाधिकारी नाशिक
Follow us
| Updated on: Jun 02, 2021 | 1:47 PM

चंदन पुजाधिकारी टीव्ही 9 मराठी, नाशिक: जिल्हाधिकारी सुरज मांढरेंनी शहरातील खासगी रुग्णालयांनी कोरोना रुग्णांच्या उपचाराबाबत घेतलेल्या निर्णयाविषयी आक्रमक भूमिका घेतली आहे. नाशिक शहरातील खासगी डॉक्टर असोसिएशनला संपर्क साधून कोरोना रुग्णांना दाखल करुन न घेण्याची भूमिका योग्य नसल्याचं त्यांनी सांगितलं आहे. जिल्हाधिकारी यांनी डॉक्टर असोसिएशनशी संपर्क साधत अशी भूमिका घेणं योग्य नाही, असं स्पष्टपणे सांगितलं आहे. प्रत्येक हॉस्पिटल मधल्या 80 टक्के जागा अधिग्रहित केल्या आहेत, हे नियम सर्वांसाठी बंधनकारक आहे, अशी माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली आहे. (Nashik Collector Suraj Mandhare told Doctors Association to not take unconstitutional decision in Corona)

अडचणी मांडा पण असंविधानिक भूमिका नको

खासगी रुग्णालयांना काही अडचणी येत असतील तर त्याबाबत कायदेशीर कारवाई करण्यासाठी आयुक्त आणि जिल्हाधिकारी सक्षम आहेत, असं सुरज मांढरे यांनी डॉक्टर असोसिएशनला कळवलं आहे. रुग्णालयांनी त्यांना येणाऱ्या अडचणी मांडाव्यात, पण असंविधानिक भूमिका घेऊ नये, असं जिल्हाधिकाऱ्यांनी म्हटलं आहे. कोरोना रुग्णांवर उपचार करताना पब्लिक कडून येणार प्रेशर हे डॉक्टरांनी मुख्य कारण दिलं होतं.

कोरोना रुग्णांना दाखल न करण्याचा निर्णय

शहरातील खासगी रुग्णालयात 2 जून पासून कोरोना रुग्ण दाखल करुन घेण्यात येणार नाही, असं पत्र खासगी रुग्णालयांनी काढलं होतं. नाशिकमधील कोरोना रुग्णांची संख्या कमी झाल्यानं हा निर्णय घेण्यात आल्याचं सांगण्यात आलेलं. खासगी डॉक्टरांनी पत्र काढून निर्णयाची माहिती दिली आहे.

रुग्ण संख्या कमी झाल्याचं कारणं

नाशिकमधील खासगी रुग्णालयांनी शहरातील कोरोना रुगणसंख्या कमी झाल्याचं सांगितलं आहे. शहरातील कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानं आता सरकारी रुग्णालयात उपचार घेण्याच आवाहन करण्यात आलंय.

नेमकं कारण काय

कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्यानं कोरोना रुग्ण दाखल करुन घ्यायचे नाहीत असा निर्णय खासगी रुग्णालयांनी घेतल्याचं कळवण्यात आलं आहे. मात्र, खासगी रुग्णालयांनी घेतलेल्या निर्णया मागचं खर कोरोना रुग्णांवर उपचार करताना समाजाचा येणारा दबाव हे कारण असल्याची चर्चा आहे.

तोडगा निघणार?

नाशिकच्या जिल्हाधिकाऱ्यांनी खासगी रुग्णालयांच्या डॉक्टर असोसिएशनशी संपर्क साधून अडचणी मांडण्यास सांगितलं आहे. यासोबत कोरोना महामारीत 80 टक्के बेड अधिग्रहित केल्याची माहिती दिली आहे. त्यामुळे डॉक्टर असोसिएशन त्यांच्या भूमिकेवर ठाम राहणार की कोरोना रुग्णांना दाखल करुन घेणार ही पाहावं लागणार आहे.

संबंधित बातम्या:

धक्कादायक! नाशिकच्या खासगी रुग्णालयांचा कोरोना रुग्णांना ॲडमिट न करण्याचा फैसला, नेमकं कारण काय?

VIDEO: देवेंद्र फडणवीस मुक्ताईनगरमध्ये रक्षा खडसेंना भेटले; जळगाव भाजपमधील पडझड थांबणार?

(Nashik Collector Suraj Mandhare told Doctors Association to not take unconstitutional decision in Corona)

Non Stop LIVE Update
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?
'जो राम का नाही, वो किसी काम का नही, बाकी XXX', कुणाची जीभ घसरली?.
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?
बच्चू कडू पोलीस अधिकाऱ्यांवर संतापले, अमरावतीत नेमकं काय घडतंय?.
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका
नारायण राणे जो टोप घालतात त्याचे केसही पिकलेत, संजय राऊतांची खोचक टीका.
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल
समाजवादी पक्षाला सोडचिठ्ठी देणार की नाही? अबू आझमी यांनी स्पष्टच म्हटल.
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?
निरूपम महाराष्ट्रद्रोही तर...शालिनी ठाकरेंचा शिंदेंना टोला काय?.
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?
सभेपूर्वीच राणा-कडूंमध्ये वाद उफळला अन् आमने-सामने, प्रकरण नेमकं काय?.
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?
कुत्र विचारत नाही त्यांना Y+ सुरक्षा, पार्थ पवारांवर कुणाचा निशाणा?.
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ
अजितदादांच राष्ट्रवादीतून बाहेर काढलय? कुणाच्या वक्तव्याने उडाली खळबळ.
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा
परत जायचा रस्ता कुठून जातो, ते मी तुला... सभेत राणेंचा ठाकरेंना इशारा.
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?
भिवंडीत भाजपचं 'कमळ' फुलणार की शरद पवारांची 'तुतारी' वाजणार?.