Nashik mascot Bird Election 2026:  नाशिकचा मानचिन्ह कोण? कावळा अन् गिधाडात निवडणूक; कोणाचा झाला दणदणीत विजय? निकाल पाहा

नाशिक शहरामध्ये चक्क पक्ष्यांमध्येच निवडणूक पार पडली. नाशिकमधील मानचिन्ह पक्षी कोण असावा? यासाठी निवडणूक पार पडली. य़ा निवडणुकीत कावळा आणि गिधाड आमनसे-सामने होते. आता नेमकी या निवडणुकीत कोणी बाजी मारली? वाचा....

Nashik mascot Bird Election 2026:   नाशिकचा मानचिन्ह कोण? कावळा अन् गिधाडात निवडणूक; कोणाचा झाला दणदणीत विजय? निकाल पाहा
| Updated on: Nov 19, 2026 | 6:53 PM

पवन येवले , प्रतिनीधी: तुम्ही आजपर्यंत लोकसभेच्या निवडणुका, विधानसभेच्या निवडणुका, जिल्हा बँकेच्या, ग्रामपंचायतीच्या निवडणूका पाहिल्या असतील. मात्र नाशिकमध्ये एक अशी निवडणूक पार पडली, ज्याची राज्यभर चर्चा होत आहे. नाशिक शहरामध्ये चक्क पक्ष्यांमध्येच निवडणूक पार पडली. नाशिकमधील मानचिन्ह पक्षी कोण असावा? यासाठी निवडणूक पार पडली. य़ा निवडणुकीत कावळा आणि गिधाड आमनसे-सामने होते. आता नेमकी या निवडणुकीत कोणी बाजी मारली? वाचा….

नाशिकमध्ये पार पडली अनोखी निवडणूक! 

Loading...

याबाबत सविस्तर माहिती अशी की, नाशिकमध्ये पक्ष्यांची अनोखी निवडणूक पार पडली. नाशिकचा मानचिन्ह पक्षी कोण असावा? यासाठी ही निवडणूक घेण्यात आली होती. या निवडणुकीमध्ये कावळा अन् गिधाड आमनसे-सामने होते. या अनोख्या निवडणुकीत गिधाडाने कावळ्यावर मात करत निवडणुकीत बाजी मारली आहे. कावळा आणि गिधाडामध्ये झालेल्या या हायहोल्टेज लढतीत तब्बल 958 मतांच्या फरकाने कावळ्याचा पराभव झाला.

गिधाड विरुद्ध कावळा, कोणी मारली बाजी?

या निवडणुकीत 3032 एवढे एकूण मतदान झाले. यापैकी कावळ्याला 1037 मते मिळाली. तब्बल 958 मतांच्या फरकाने गिधाडाचा या निवडणुकीत विजय झाला. यासोबतच नाशिकचा मानचिन्ह पक्षी म्हणून गिधाडाला बहुमान मिळाला. पक्षी संवर्धन आणि पर्यावरण जागृतीच्या दृष्टीने हा महत्त्वपूर्ण उपक्रम राबवण्यात आला होता. या निवडणुकीची सध्या जोरदार चर्चा होत आहे.

दरम्यान, नाशिक महापालिकेमध्ये नगरसेवक दिनकर पाटील यांच्या हस्ते हा निकाल आज जाहीर करण्यात आला. या अनोख्या निवडणुकीसाठी विविध पर्यावरणप्रेमी संस्था, संघटनांचे प्रतिनिधी, वन्यजीव अभ्यासक आणि पक्षी संवर्धनासाठी काम करणारे कार्यकर्ते उपस्थित होते.पक्षांविषयी जनजागृती करणे तसेच पर्यावरण संवर्धनाला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश होता. दरम्यान, यासाठी इतर पक्षांचाही विचार व्हायला हवा होता, अशीही मते पर्यावरणप्रेमींनी मांडली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us