ज्यांना खोक्यांची सवय आहे, त्यांना सारखे खोकेच दिसतात”; शिवसेनेच्या खासदाराचे विरोधकांना विरोधकांच्या भाषेतच उत्तर

| Updated on: Apr 02, 2023 | 2:46 PM

सरकारच्या या निर्णयामुळेच महिलांना बसमध्ये 50 टक्के सवलत देण्यात आले आहे. राज्यात ज्या दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले आहे. त्या दिवसांपासून राज्यात रोज उठले की सध्या एकच भाषण सुरू आहे.

ज्यांना खोक्यांची सवय आहे, त्यांना सारखे खोकेच दिसतात; शिवसेनेच्या खासदाराचे विरोधकांना विरोधकांच्या भाषेतच उत्तर
Follow us on

नाशिक : शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाल्यापासून ज्या गतीने काम सुरू आहे. त्याच पद्धतीने राज्यातील इतर भागातही काम करण्यासाठीच आज एक भव्य-दिव्य शिवसेना कार्यालय नाशिकमध्ये तयार करण्यात आले असल्याची माहिती खासदार श्रीकांत शिंदे यांनी दिली. नाशिकमधील कार्यालयाचे उद्घाटन करताना ते बोलत होते. खासदार श्रीकांत शिंदे यांनी सांगितले की, या कार्यालयात अनेक वेगवेगळ्या प्रकारचे कक्ष आहेत. त्याचा लाखो लोकांना फायदा होणार असल्याचेही मत त्यांनी यावेळी व्यक्त केले. यावेळी त्यांनी शिंदे-फडणवीस सरकारच्या कामाचे गौरव करून राज्यातील जनता त्यांच्या कामावर समाधानी असल्याचेही त्यांनी सांगितले.

खासदार श्रीकांत शिंदे यांनी शिंदे-फडणवीस सरकारचा गौरव करताना म्हणाले की, आपल्याला माहिती आहे की, गेल्या 9 महिन्यात कोणत्या गतीने काम सुरू आहे. शिंदे फडणवीस सरकारने सर्वांसाठी फायदा होणारा अर्थसंकल्प यावेळी सादर केला आहे.

मुख्यमंत्र्यांच्या कामाचा सपाटा

त्याचा फायदा राज्यातील प्रत्येक नागरिकांना होणार असल्याचे मतही त्यांनी यावेळी व्यक्त केले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिवसा आणि रात्रीदेखील प्रचंड काम करत आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कामाचा सपाटा आणि गेल्या अडीच वर्षात संथ गतीने चाललेले काम तुम्ही पाहत होता आणि त्याचा प्रत्यय तुम्हाला आला आहे असा टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

वर्षावरची परिस्थिती बदलली

यावेळी खासदार श्रीकांत शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. गेल्या अडीच वर्षात नागरिकांना तरी सोडा मुख्यमंत्र्यांना मंत्र्यांनासुद्धा भेटायला वेळ मिळत नव्हता अशी टीकाही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. तर आता वर्षावरची परिस्थिती बदलली आहे. आमदारांचे विषय तर सोडाच मात्र आता वर्षावर सध्या सामान्य नागरिकांनादेखील प्रवेश मिळत आहेत आणि मुख्यमंत्रीही नागरिकांना भेटत आहेत असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला आहे.

सरकारने दिलासा देण्याचे काम 

आता देखील कांद्याला भाव मिळत नव्हते त्यावरही सरकारने दिलासा देण्याचे काम शिंदे फडणवीस सरकारने केले आहे. त्यामुळे हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी ठाम पणे उभा आहे असा विश्वासही श्रीकांत शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवला. ज्या प्रमाणे शेतकऱ्यांच्या पाठीशी हे सरकार ठामपणे उभा आहे, त्याप्रमाणेच हे सरकार राज्यातील महिलांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे.

भाषणातील शब्ददेखील एकच

सरकारच्या या निर्णयामुळेच महिलांना बसमध्ये 50 टक्के सवलत देण्यात आले आहे. राज्यात ज्या दिवसांपासून शिंदे-फडणवीस सरकार अस्तित्वात आले आहे. त्या दिवसांपासून राज्यात रोज उठले की सध्या एकच भाषण सुरू आहे. त्या भाषणातील शब्ददेखील एकच आहेत. खोके,गद्दार आणि खंजीर. या शब्दांशिवाय ठाकरे गटाची भाषणं होत नसल्याचे सांगत ठाकरे गटावर त्यांनी जोरदार निशाणा साधला आहे.

नार्को टेस्ट करा

खोके सरकार अशी टीका विरोधकांकडून केली जाते त्यावर मध्यंतरी आमचे आमदार सुहास कांदे बोलले होते की, नार्को टेस्ट करावी. ज्यांना खोक्यांची सवय आहे, त्यांना सारखे खोकेच दिसत आहेत. त्यामुळे एकदा नार्को टेस्ट कराच कुणाकडे किती खोके आहेत ते समजेल असा सणसणीत टोलाही त्यांनी ठाकरे गटाला लगावला आहे.

तिहासात हे कधीच झाले नाही

रात्री झोपल्यावरदेखील खंजीर आणि खोकेच बोलत असतील तर याआधी इतिहासात कधीच झाले नाही इतके आमदार,खासदार आणि पदाधिकारी ठाकरे गटातून सोडून गेले आहेत. त्यामुळे या लोकांनी आत्मपरीक्षण करणे गरजेचे आहे अशी टीका त्यांनी केली आहे.