Nashik | अग्निपथ योजनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, नाशिकमध्ये जोरदार आंदोलन, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी!

| Updated on: Jun 20, 2022 | 4:26 PM

अग्निपथ योजनेला फक्त राज्यातच नाही तर संपूर्ण देशामध्ये जोरदार विरोध होतोय. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये योजनेविरोधात बंद देखील पुकारला आहे. इतकेच नाही तर काही तरूणांनी रेल्वे गाड्या पेटवून दिल्या. सैन्याने अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नाही हे स्पष्ट केले आहे. मात्र देशभरातून अग्निपथ योजनेला अजूनही विरोध सुरूच आहे.

Nashik | अग्निपथ योजनेवरून राष्ट्रवादी काँग्रेस आक्रमक, नाशिकमध्ये जोरदार आंदोलन, केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी!
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) वतीने नाशिकमध्ये आज अग्निपथ योजनेविरोधात जोरदार आंदोलन करण्यात आले. अग्निपथ योजना म्हणजे देशातील तरुणांच्या भविष्याशी खेळ असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकार (Central Government) विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. नाशिकच्या शहीद सर्कल परिसरात अंबादास खैरे यांच्या नेतृत्वात हे आंदोलन करण्यात आलं. यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित (Present) होते. तरूणांच्या भविष्याशी खेळ करू नका, म्हणत यावेळी जोरदार घोषणाबाजी देण्यात आली.

केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी

अग्निपथ योजनेला फक्त राज्यातच नाही तर संपूर्ण देशामध्ये जोरदार विरोध होतोय. बिहार आणि उत्तर प्रदेशमध्ये योजनेविरोधात बंद देखील पुकारला आहे. इतकेच नाही तर काही तरूणांनी रेल्वे गाड्या पेटवून दिल्या. सैन्याने अग्निपथ योजना मागे घेतली जाणार नाही हे स्पष्ट केले आहे. मात्र देशभरातून अग्निपथ योजनेला अजूनही विरोध सुरूच आहे. देशभरात अग्निपथ योजनेविरोधात आंदोलने झाली आहेत. अनेक ठिकाणी मोठी हिंसा झाली आहे. तसेच अनेक राजकीय पक्षही या आंदोलनात उतरले आहेत.

हे सुद्धा वाचा

अग्निपथ योजनेला अजूनही विरोध सुरूच

अग्निवीरांच्या भरतीसाठी 1 जुलै रोजी अधिसूचना जारी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले आहे. त्यानंतर इच्छुक विद्यार्थी अर्ज करू शकतील. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात नोकरभरतीची पहिली फेरी सुरू होईल. यादरम्यान शारीरिक चाचणी आणि वैद्यकीय चाचणी घेण्यात येणार आहे. बिहारपासून सुरू झालेले आंदोलन उत्तर प्रदेश, हरियाणा, दिल्लीसह जवळपास सर्वच अनेक राज्यांमध्ये पोहोचले आहे. सर्वात अगोदर छपरा, जेहानाबाद, मुंगेर आणि नवादासह बिहारच्या अनेक भागांमध्ये युवकांनी निदर्शने केली होती.