Nashik | नाशिकमधील इलेक्ट्रिकल दुकानाला मोठी आग, लाखो रुपयांच्या वस्तू जळून खाक!

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर काही वेळेने आगीवर नियंत्रण मिळवण्यास यश आले. महापालिकेच्या पंचवटी, सातपूर, के के वाघ केंद्र आणि मुख्यालय येथून 4 गाड्या आल्या होत्या. शिवाय या गाड्यांसोबतच अग्निशामक दलाचे 20 कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित होते.

Nashik | नाशिकमधील इलेक्ट्रिकल दुकानाला मोठी आग, लाखो रुपयांच्या वस्तू जळून खाक!
Image Credit source: सांकेतिक फोटो
Follow us
| Updated on: Jun 20, 2022 | 10:08 AM

नाशिक : नाशिकच्या (Nashik) गंजमाळ परिसरातील एका इलेक्ट्रिक दुकानाला मोठी आग लागल्याची घटना घडलीये. रात्रीच्या सुमारास ही आग लागल्याचे सांगितले जात आहे. दुकानाच्या तिसऱ्या मजल्याला आग लागली होती. या आगीमध्ये मोठे नुकसान झाले असून लाखो रुपयांच्या इलेक्ट्रिकल (Electric) वस्तू जळून खाक झाल्या. ही आग विझवताना अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांना मोठी तारेवरची कसरत करावी लागलीये. अग्निशमन विभागाच्या 4 गाड्यांनी आग विझवली. सुदैवाची गोष्ट म्हणजे जीवितहानी झाली नाहीये. मात्र, ही आग (Fire) नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाही.

रविवार असल्याने इलेक्ट्रिकल दुकान होते बंदच

रविवार असल्यामुळे हे इलेक्ट्रिकल दुकान बंदच होते. तिसऱ्या मजल्यावरून धूर निघत असल्याचे काही लोकांच्या लक्षात आले. त्यानंतर पोलिस आणि अग्निशामक दलाला याबद्दलची माहिती देण्यात आली. अग्निशामक दलाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवले.

हे सुद्धा वाचा

अग्निशमन विभागाच्या 4 गाड्यांनी विझवली आग

आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या या घटनास्थळी दाखल झाल्या. त्यानंतर काही वेळेने आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. महापालिकेच्या पंचवटी, सातपूर, के. के वाघ केंद्र आणि मुख्यालय येथून 4 गाड्या आल्या होत्या. शिवाय या गाड्यांसोबतच अग्निशामक दलाचे 20 कर्मचारीही घटनास्थळी उपस्थित होते.

पोलिसांचा तपास सुरू

नाशिक येथील गंजमाळ परिसरातील इलेक्ट्रिक दुकानाला लागलेल्या आगीचा तपास आता पोलिसांकडून सुरू करण्यात आलाय. आग नेमकी कशामुळे लागली हे अद्याप कळू शकले नाहीये. यासंदर्भात संपूर्ण तपास आता नाशिक पोलीस करत आहेत.

Non Stop LIVE Update
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य
दोन महिन्यामध्ये एकनाथ शिंदे दिसणार नाहीत, प्रकाश आंबेडकरांचं वक्तव्य.
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश
बेकायदा फेरीवाल्यांवर थेट कारवाई करा, मुंबई हायकोर्टाचे स्पष्ट आदेश.
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली
मोठी बातमी, धनगर आरक्षणाची याचिका सुप्रीम कोर्टानं फेटाळली.
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?
अजित पवार लोकसभेची एकही जागा जिंकणार नाहीत, पाहा कोणी केलं भाकीत?.
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग
वर्ध्यात पंतप्रधान मोदींचं मराठीतून भाषण अन् सभास्थळी म्हटला अभंग.
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?
अमोल कोल्हे हे महागद्दार, धोकेसम्राट आणि...; कुणी केली जहरी टीका?.
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?
राज ठाकरे पहिल्यांदाच धनुष्यबाणाला मत देणार, राहुल शेवाळे काय म्हणाले?.
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद
नटीला नटी म्हणायचं नाही तर काय...राऊत-पाटलांमधील संवाद कॅमेऱ्यात कैद.
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती
दोनशे रूपये घ्या, पण... ठाकरेंच्या सभेसाठी आलेल्या लोकांकडून विनंती.
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया
ज्या आईने तुम्हाला जन्म... राऊतांच्या त्या टीकेवर राणांची प्रतिक्रिया.