नाशिकः रिमझिम धून, आभाळ भरून, हरवले मन…पुन्हा पाऊस पाऊस!

| Updated on: Sep 24, 2021 | 3:14 PM

तब्बल 24 दिवसांपासून सुरू रोज सुरू असलेल्या पावसाने नाशिक (Nashik) माहोल बदलून टाकला आहे. आज शुक्रवारीही (24 सप्टेंबर) दुपारी दोनच्या सुमारास पुन्हा एकदा रिमझिम (rain) पावसाने हजेरी लावली. अन् शहर पुन्हा एकदा धुंद झाले.

नाशिकः रिमझिम धून, आभाळ भरून, हरवले मन...पुन्हा पाऊस पाऊस!
Follow us on

नाशिकः तब्बल 24 दिवसांपासून सुरू रोज सुरू असलेल्या पावसाने नाशिक (Nashik) माहोल बदलून टाकला आहे. आज शुक्रवारीही (24 सप्टेंबर) दुपारी दोनच्या सुमारास पुन्हा एकदा रिमझिम (rain) पावसाने हजेरी लावली. अन् शहर पुन्हा एकदा धुंद झाले. येत्या दोन दिवसांतही जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे. ( Presence of rain in Nashik, cloudy weather, possibility of rain again)

नाशिक जिल्ह्याकडे यंदा सुरुवातीच्या काळात पावसाने पाठ फिरवली. त्यामुळे धरणे तळाला गेली. शेतकऱ्यांसमोर संकट उभे राहिले. मात्र, सप्टेंबर महिन्यात लावलेल्या जोरदार हजेरीने त्याने सारी कसर भरून काढली. मनमाड, नांदगाव परिसरात दोन दोनदा ढगफुटी सदृश अतिवृष्टी झाली. यंदा नाशिकमध्ये गोदावरी नदीला दोनदा पूर आला. दुसऱ्या पुलावेळी तर रामसेतू पुलाजवळ पाणी पोहचले. या पावसाने जिल्ह्यातील गंगापूर धरण समूह भरला आहे. मुंबईला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी जवळील अप्पर वैतरणा ओसंडले आहे. जिल्ह्यातील इतर छोट्यामोठ्या धरणांची पाणी पातळी वाढली आहे. त्यात गुरुवारी पावसाने थोडीफार विश्रांती घेतली. शुक्रवारी सकाळी लख्ख ऊन पडले. मात्र, दुपारी दोनच्या सुमारास पुन्हा एकदा रिमझिम पावसाने हजेरी लावली. तासाभराने पुन्हा ऊन पडले.

सध्या पाऊस का होतोय?

सध्या पूर्व राजस्थानवर कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. हा कमी दाबाचा पट्टा पश्चिमेकडील जैसलमेर ते पूर्वेकडील डाल्टनगंजपर्यंत सक्रिय असून, पश्चिम बंगालमध्ये गंगेचा मैदान परिसर आणि तामिळनाडू किनाऱ्यावर चक्रीय चक्रावात आहे. या सोबतच दक्षिण कर्नाटक ते कामोरीन असाही कमी दाबाचा पट्टा आहे. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

पाणीदार जिल्हा

नाशिकला पाणीपुरवठा करण्या गंगापूर धरण परिसरात सध्या पावसाची संततधार सुरू आहे. त्यामुळे धरण 99 टक्के भरले आहे. गोदावरी खोऱ्यातील गंगापूर धरण समूहात गंगापूर (मोठे), काश्यपी (मध्यम), गौतमी गौदावरी (मध्यम) आणि आळंदी (मध्यम) ही चार धरणे आहेत. यातील आळंदी धरण शंभर टक्के भरले आहे. गौतमी गौदावरी, काश्यपीही भरत आले आहेत. त्यामुळे यंदा नाशिककरांची पाणी चिंता मिटली आहे. दरम्यान, दुसरीकडे मुंबईला पाणीपुरवठा करणारे इगतपुरी तालुक्यातील सर्वात महत्त्वाचे अप्पर वैतरणा धरण भरले आहे. त्यामुळे तूर्तास मुंबईकरांचा पाणीप्रश्न मिटला आहे. वैतरणा धरण गेल्यावर्षी ऑगस्टमध्ये भरले होते. यावर्षी त्याला भरण्यासाठी एक महिन्याचा उशीर लागला.

धरणांवर फौजफाटा

नाशिक जिल्ह्यातील गंगापूर, दारणासह गंगापूर, दारणा, कश्यपी, मुकणे, भावली, वालदेवी, कडवा, गौतमी-गोदावरी, नांदूरमधमेश्वर, आळंदी, भोजापूर ही प्रमुख धरणे ही भरत आली आहेत. त्यामुळे धरण परिसरात 10 नोव्हेंबरपर्यंत जमावबंदी आदेश लागू करण्यात आला आहे. या परिसरात पाचपेक्षा जास्त व्यक्ती आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी कारवाई करण्याचे आदेश जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी दिली आहेत. ( Presence of rain in Nashik, cloudy weather, possibility of rain again)

इतर बातम्याः

आनंदवार्ताः नाशिकमध्ये नोकरीच्या 227 संधी; 27 सप्टेंबरपासून ऑनलाइन रोजगार मेळाव्याचे आयोजन

नाशिकः मध्यरात्री दीड वाजता कामावर न आल्याने तिघांनी आवळला गळा; मृतदेह फेकला विहिरीत