AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

नाशिकः मध्यरात्री दीड वाजता कामावर न आल्याने तिघांनी आवळला गळा; मृतदेह फेकला विहिरीत

मध्यरात्री दीड वाजता कामास बोलवले. मात्र, कामगाराने त्यावेळी यायला नकार दिला म्हणून त्याचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये (Nashik) उघडकीस आली आहे.

नाशिकः मध्यरात्री दीड वाजता कामावर न आल्याने तिघांनी आवळला गळा; मृतदेह फेकला विहिरीत
सांकेतिक फोटो
| Edited By: | Updated on: Sep 24, 2021 | 12:58 PM
Share

नाशिकः मध्यरात्री दीड वाजता कामास बोलवले. मात्र, कामगाराने त्यावेळी यायला नकार दिला म्हणून त्याचा गळा दाबून खून केल्याची धक्कादायक घटना नाशिकमध्ये (Nashik) उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी (Police) मुख्य संशियत जाकीर पीरसाहब कोकणी (वय 57, रा. कोकणीपुरा, जुने नाशिक) याच्यासह अशोककुमार रामनिवास रॉय (वय 40, रा. वडाळा रोड) आणि राम नारायण सिंग (वय 53, रा. वडाळा रोड) याला बेड्या ठेकल्या आहेत. (In Nashik, a worker was killed for not coming to work at half past midnight)

या धक्कादायक घटनेबाबतची सविस्तर माहिती अशी की, अण्णा भाऊ साठे नगराजवळ वडाळा परिसरातील एका पडक्या विहिरीत 24 जुलै रोजी एक कुजलेला मृतदेह सापडला होता. पोलिसांनी या मृतदेहाची ओळख पटविण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना त्यात यश आले नाही. दोरीने गळा आवळून खून केल्याचा हा प्रकार असल्याचा पोलिसांना संशय होता. त्यांनी याप्रकरणी वेगाने तपासाची चक्रे फिरवली. तेव्हा हा मृतदेह दिनेश गेहरू पाल (वय 30, रा. वडाळा रोड) याचा असल्याचे समजले. पाल हा जनावराच्या गोठ्यात काम करायचा. तो उत्तर प्रदेश येथील सोनभद्राचा असल्याचे समजले. यावरून पोलिसांनी वडाळा परिसरातील सर्व गोठ्यांमधील संशयितांची कसून चौकशी केली. तेव्हा मृत्यूपूर्वी तो वडाळा रोडवरील एका गोठ्यात काम करत असल्याचे समजले.

अन् बिंग फुटले…

वडाळा रोडवरील एका गोठ्यातल्या कामगारांची पोलिसांनी कसून चौकशी केली. तेव्हा उत्तरे देताना त्यांची बोबडी वळली. पोलिसांना येथेच हा प्रकार घडल्याचा संशय आला. पोलिसांनी यातल्या दोन कामगारांना अटक केली आणि त्यांना न्यायालयाने पोलिस कोठडी सुनावली. यावेळी पोलिसी खाक्या दाखवताच अशोककुमार रॉय, नारायण सिंग आणि जाकीर पीरसाब कोकणी यांनी मिळून हा खून केल्याचे उघड झाले.

तिघांनी दाबला गळा

गोठामालक जाकीर पीरसाब कोकणी हा पाल याला मध्यरात्री दीड वाजता कामावर चल म्हणून त्याला उठवण्यासाठी गेला होता. यावेळी झोपेत असलेल्या पाल याने कामावर यायला नकार दिला. हा नकार ऐकूण जाकीर पीरसाब कोकणीला राग आला. या रागाच्या भरात त्याने व अशोककुमार रॉय आणि नारायण सिंग यांनी मिळून पालचा गळा दाबून खून केला.

कोठडीत रवानगी

गोठ्यातील दोन कामगार रॉय आणि सिंग यांना पोलिसांनी पूर्वीच अटक केली आहे. त्यांना न्यायालयाने 26 सप्टेंबरपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले आहेत. आता या खुनाचा सूत्रधार जाकीर पीरसाहब कोकणीलाही पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. ही कारवाई पोलीस निरीक्षक देविदास वांजळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निखिल बोंडे, प्रभाकर पवार, महेश जाधव, सागर परदेशी, मुश्रीफ शेख, जावेद खान, दत्तात्रय गवारे, सौरभ माळी, संजय चव्हाण यांच्या पथकाने केली. (In Nashik, a worker was killed for not coming to work at half past midnight)

इतर बातम्याः

नाशिकच्या एंजलचा भीमपराक्रम; खवळलेल्या समुद्राशी झुंज देत 14 तास 23 मिनिटांत 45.1 किमीची इंग्लिश खाडी पार

महिला छेडछाडीचा तपास करण्यासाठी गेलेल्या पोलिसांनाच नाशिकमध्ये मारहाण

नाशिकः ग्रॅच्युटी, अर्जित रजेची रक्कम मिळेना; मृत कर्मचाऱ्याच्या कर्जबाजारी मुलाचा आत्मदहनाचा प्रयत्न

महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?
सारंगखेड्याच्या घोडेबाजारात 21 लाखांच्या बाबाची क्रेझ, का होतेय चर्चा?.
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं..
2029 ला मोदीच PM, महायुतीला एक वर्ष अन् फडणवीसांना थेट सांगून टाकलं...
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक
महायुतीच्या वर्षपूर्ती निमित्त अनाथ मुलांशी संवाद साधताना फडणवीस भावूक.