सत्यजित तांबे म्हणतात, “नाना पटोले यांचे म्हणणे अर्धसत्य;” नाना पटोले यांची प्रतिक्रिया काय?

| Updated on: Jan 28, 2023 | 10:03 PM

नाना पटोले यांनी जे काही सांगितलं ते अर्धसत्य आहे. राजकीय भूमिका मांडू तेव्हा बोलू. अर्धसत्य आहे, येवढचं सांगतो. सत्य मांडेन तेव्हा सर्वजण चकीत होऊन जालं, असंही सत्यजित तांबे म्हणाले.

सत्यजित तांबे म्हणतात, नाना पटोले यांचे म्हणणे अर्धसत्य; नाना पटोले यांची प्रतिक्रिया काय?
नाना पटोले
Image Credit source: social media
Follow us on

नाशिक : नाशिक पदवीधर मतदार संघात सत्यजित तांबे आणि शुभांगी पाटील यांच्यात लढत रंगणार आहे. नाना पटोले यांनी सत्यजित तांबे यांच्यावर टीका केली. त्यावर बोलताना सत्यजित तांबे म्हणतात, मी काँग्रेस पक्षाचा कार्यकर्ता आहे. गेली २२ वर्षे काँग्रेस पक्षात काम करत आहे. २०३० ला आमच्या परिवाराला काँग्रेस पक्षात १०० वर्षे पूर्ण होणार आहेत. आम्ही काँग्रेस पक्षाकडूनचं उमेदवार मागितली होती. एबी फार्म न आल्यानं तांत्रिक कारणानं माझी उमेदवारी अपक्ष झाली आहे, असं त्यांनी सांगितलं.

नाना पटोले यांनी जे काही सांगितलं ते अर्धसत्य आहे. राजकीय भूमिका मांडू तेव्हा बोलू. अर्धसत्य आहे, येवढचं सांगतो. सत्य मांडेन तेव्हा सर्वजण चकीत होऊन जालं, असंही सत्यजित तांबे म्हणाले.

तांबे यांनी खुलासा करावा

सत्यजित तांबे यांच्यावर बोलताना काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष नाना पटोले म्हणाले, सत्यजित तांबे यांनी लवकर खुलासा करावा. निवडणुकीच्या पहिले केलं तर चांगलं होईल. ते म्हणत असतील तर आम्हाला मान्य आहे. तातडीनं खुलासा करावा, असंही नाना पटोले यांनी म्हंटलं.

शुभांगी पाटील यांचे अश्रृ अनावर

नाशिक पदवीधर मतदारसंघाचा प्रचाराची सांगता झाली. महाविकास आघाडीने पाठिंबा दिलेल्या उमेदवार शुभांगी पाटील यांच्या डोळ्यातून अश्रू अनावर झाले. अहमदनगरमध्ये त्यांच्या प्रचाराची सांगता झाली. त्यांनी संपूर्ण जिल्हा पिंजून काढला.

प्रचारादरम्यानचा आलेला अनुभव सांगताना त्या भावूक झाल्या होत्या. मी पदवीधरांसाठी काम करणार असून, निवडून आल्यानंतर प्रत्येकाला भेटणार आहे. तसेच माहेरची साडी म्हणून मतदारांना मतदान करण्याचा आवाहन शुभांगी पाटील यांनी केलं.

दुसरीकडं सत्यजित तांबे यांना अप्रत्यक्ष पाठिंबा भाजपकडून मिळणार आहे. त्यामुळं कोणता उमेदवार निवडून येणार हे निकालानंतरच कळेल. पण, यामुळं नाशिकचं राजकीय वातावरण मात्र चांगलंच तापलं आहे.