भाजप कार्यालय फोडणाऱ्या शिवसैनिकांच्या शोधात नाशिक पोलीस; राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला

| Updated on: Aug 28, 2021 | 12:48 PM

भाजपचं कार्यालय फोडणाऱ्या शिवसैनिकांचा नाशिक पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांची शोधाशोध सुरू असतानाच शिवसेना नेते संजय राऊत नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या भेटीला आले आहेत. (shivsena leader sanjay raut met nashik Police commissioner Deepak Pandey )

भाजप कार्यालय फोडणाऱ्या शिवसैनिकांच्या शोधात नाशिक पोलीस; राऊत पोलीस आयुक्तांच्या भेटीला
sanjay raut
Follow us on

नाशिक: भाजपचं कार्यालय फोडणाऱ्या शिवसैनिकांचा नाशिक पोलीस शोध घेत आहेत. पोलिसांची शोधाशोध सुरू असतानाच शिवसेना नेते संजय राऊत नाशिक पोलीस आयुक्त दीपक पांडे यांच्या भेटीला आले आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. (shivsena leader sanjay raut met nashik Police commissioner Deepak Pandey )

भाजप कार्यलय फोडणारे शिवसैनिक काल संजय राऊत यांच्या सोबत असल्याने भाजप पदाधिकारी आक्रमक झाले होते. भाजप कार्यलय फोडणारे दीपक दातीर, बाळा दराडे यांच्या अटकेसाठी नाशिक पोलिसांच पथक रवानाही झालं होतं. मात्र, या संपूर्ण पार्श्वभूमीवर राऊत दीपक पांडे यांच्या भेटीला आल्याने चर्चेला उधाण आलं. या भेटीनंतर त्यांनी मीडियाशी संवाद साधला. पांडे चांगले अधिकारी आहेत. मला अशा अधिकाऱ्यांना भेटणे आवडते. ते कायद्याशी तडजोड करत नाहीत असा माझा अनुभव आहे, असं राऊत या भेटीनंतर म्हणाले.

काल मुंबईत, आज नाशकात

भाजपच्या कार्यालयावर हल्ला करणारे काही शिवसैनिक काल मुंबईत आले होते. या शिवसैनिकांनी राऊत यांची भेट घेतली होती. त्यामुळे भाजप कार्यकर्ते आक्रमक झाले होते. त्यानंतर आज राऊत नाशिकमध्ये आले असून त्यांनी शिवसैनिकांना संबोधित केले. पदाधिकाऱ्यांना संबोधित केल्यानंतर राऊत पांडे यांच्या भेटीसाठी गेले आहेत.

नेमकं काय घडलं होतं?

24 ऑगस्ट रोजी शिवसैनिकांनी भाजपच्या कार्यालयाला लक्ष्य केलं होतं. जुन्या नाशिकमध्ये भाजपचं वसंत स्मृती हे अलिशान कार्यालय आहे. शिवसैनिक गाडीत बसून आले आणि त्यांनी भाजपच्या कार्यालयावर प्रचंड दगडफेक केली होती. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली होती. उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राला कोरोनाच्या काळात सावरले. त्यांनी महाराष्ट्र वाचवला. ते आमचे कुटुंब प्रमुख आहे. उद्धव ठाकरेंवर टीका केली तर त्याचे जशास तसे उत्तर दिलं जाईल. ही तर सुरुवात आहे, असा इशारा संतप्त शिवसैनिकांनी राणे यांना दिला होता.

राणे नेमंक काय म्हणाले होते?

राणे यांची जनआशीर्वाद यात्रा सध्या कोकणात आहे. रायगडच्या महाडमध्ये पत्रकारांशी बोलताना राणे यांनी मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केलं होतं. स्वातंत्र्य दिनाच्या कार्यक्रमात उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवी वर्ष असल्याचं विसरले. त्यावेळी त्यांनी हिरक महोत्सव हा शब्द वापरला. मात्र, तिथे उपस्थित असलेले राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी मुख्यमंत्र्यांना अमृत महोत्सव असल्याचं सांगितलं. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली चूक सुधारली. “आज 74 वर्षे पूर्ण करुन 75 व्या वर्षात अमृत महोत्सवी… नाही हिरक महोत्सवी… अमृत महोत्सवी वर्षात आपण पदार्पण करतो आहोत”, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. त्यावरुन राणे यांनी मी तिथे असतो तर कानाखाली लगावली असती, असा शब्दांत नारायण राणे यांनी मुख्यमंत्र्यांवर प्रहार केला होता. (shivsena leader sanjay raut met nashik Police commissioner Deepak Pandey )

 

संबंधित बातम्या:

Narayan Rane : नाशिकमध्ये शिवसैनिकांनी भाजपचं कार्यलय फोडलं, सांगलीत राणेंच्या पोस्टरवर शाईफेक

Narayan Rane | मुख्यमंत्र्यांविषयी आक्षेपार्ह वक्तव्य, नारायण राणेंना अटक करा, नाशिक पोलीस आयुक्तांचे निर्देश

Maharashtra IPS Transfer : राज्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल, कुणाची कुठे बदली?

(shivsena leader sanjay raut met nashik Police commissioner Deepak Pandey )