AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Maharashtra IPS Transfer : राज्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल, कुणाची कुठे बदली?

राज्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आलेत. भारतीय पोलीस सेवेतील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या पदांसह पोलीस उपमहानिरीक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या पदांवर बदल्या करण्यात आल्यात.

Maharashtra IPS Transfer : राज्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल, कुणाची कुठे बदली?
MANTRALAYA
| Edited By: | Updated on: Aug 24, 2021 | 9:17 AM
Share

मुंबई : राज्याच्या पोलीस दलात मोठे फेरबदल करण्यात आलेत. भारतीय पोलीस सेवेतील अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत. यात अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या पदांसह पोलीस उपमहानिरीक्षक आणि विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या पदांवर बदल्या करण्यात आल्यात. बदली किंवा पदोन्नती असं या बदल्याचं स्वरुप आहे.  अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या पदांसाठी 14 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात. पोलीस उपमहानिरीक्षक पदांसाठी 16 आणि विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या पदांवर 7 अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्यात.

विशेष पोलीस महानिरीक्षक दर्जाच्या पदांवर कोणत्या 7 अधिकाऱ्यांच्या बदल्या?

पोलीस उपमहानिरीक्षक पदावर बदली झालेले अधिकारी कोण?

अपर पोलीस महासंचालक दर्जाच्या पदांसाठी बदली झालेले अधिकारी कोण?

राज्यातील आणखी 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या

दरम्यान, याआधी जुलै 2021 मध्ये राज्यातील 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या देखील बदल्या करण्यात आल्या होत्या. प्रशासकीय कामाचा भाग म्हणून नियमित बदल्यांच्या प्रक्रियेला राज्य सरकारने निश्चित कालमर्यादा दिलीय. त्यामुळे या कालावधीत वेगवेगळ्या प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्यांना वेग आल्याचं सांगण्यात आलं होतं. या प्रक्रियेनुसार कालावधी पूर्ण झालेल्या अधिकाऱ्यांना नव्या ठिकाणी नियुक्ती देण्यात आली.

बदली झालेल्या अधिकाऱ्यांची यादी खालीलप्रमाणे :

1. संजय दैने, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, मालेगाव महानगरपालिका.

2. अनिल पाटील, व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांची नियुक्ती सचिव, प्रदेश नियंत्रण प्राधिकरण, मुंबई या पदावर.

3. मलीकनेर, सहमुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई यांची नियुक्ती आहे त्याच पदी.

4. सुरेश जाधव यांची नियुक्ती आयुक्त, कामगार महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर.

5. प्रताप जाधव, उपायुक्त, पुणे महसूल विभाग, पुणे यांची नियुक्ती उप महासंचालक, यशदा, पुणे या पदी.

6. कुमार खैरे यांची नियुक्ती सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ या पदावर.

7. जी एम बोडके सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कल्याण यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, अकोला महानगरपालिका या पदावर.

8. एस जी देशमुख, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे यांचे नियुक्ती अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई या पदावर.

9. एम देवेंद्र सिंह यांची नियुक्ती संचालक, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या पदावर.

10. राहुल कर्डिले, यांची सह महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर.

11. जी एस पापळकर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, हिंगोली या पदावर.

12. रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी, हिंगोली यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला या पदावर.

13. एन आर गटणे, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, पालघर यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड या पदावर.

14. दीपेंद्रसिंह कुशवाह, आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नवी मुंबई यांची नियुक्ती सहसचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर.

हेही वाचा :

IAS Transfer : राज्यातील आणखी 14 आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या, संपूर्ण यादी एका क्लिकवर

IAS Transfer : निधी चौधरींची मुंबईच्या आयटी संचालकपदी नियुक्ती, रायगडचे नवे जिल्हाधिकारी कोण?

पनवेल-नवी मुंबईत 600 हून अधिक पोलिसांची बदली, पाच वर्षांचा काळ पूर्ण केलेल्या कर्मचाऱ्यांची ट्रान्सफर

व्हिडीओ पाहा :

Maharashtra government transfer many IPS officer Know full list

Follow Us
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार
सुनेत्रा पवार यांचा दिल्ली दौरा; NDAच्या महत्त्वाच्या नेत्यांना भेटणार.
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण
झिरवाळ प्रकरणावर अदिती तटकरे यांचे स्पष्टीकरण.
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक...
हायवेवर हिंदी फलक! मनसेचा पारा चढला, तर होणार खळखट्याक....
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल
अवकाळीचा शेतीला फटका, लाखोंचे नुकसान, शेतकरी हवालदिल.
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण
दख्खनचा राजा ज्योतिबा मंदिराच्या कळसावर गुलाल आणि खोबऱ्याची उधळण.
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?
व्हायरल व्हिडीओमुळे मंत्री नरहरी झिरवळ मंत्रिमंडळ बैठकीत अनुपस्थित?.
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी
आता 14 दिवस सुटका नाहीच... भोंदूबाबा अशोक खरातला न्यायालयीन कोठडी.
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी
अखेर भाजपने पत्ते खोलले, राहुरीसाठी या नेत्याला दिली उमेदवारी.
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?
सर्वात आधी निषेध एकनाथ शिंदे यांचा केला पाहिजे... राऊत असं का म्हणाले?.
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण
ताराराणींबाबत वादग्रस्त वक्तव्यावरून संताप; राऊतांचा जैन मुनींवर निशाण.