
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या वादग्रस्त टीकेनंतर नाशिकमधील शिवसेना कार्यकर्ते आक्रमक झालेत.

या ठिकाणी शिवसैनिक लाठ्या-काट्या, दगड घेऊन भाजप कार्यालकडे गेले. यावेळी पोलिसांनी त्यांना रोखलं.

यावेळी शिवसेना कार्यकर्त्यांकडून भाजप कार्यकर्त्यांना शिवीगाळही करण्यात आली.

दोन्ही पक्षाचे कार्यकर्ते आमने सामने आले. मात्र, पोलिसांनी हस्तक्षेप केल्यानं हा संघर्ष टळला.

पोलिसांनी भाजप कार्यालयावर लाठ्या काट्या, दगड घेऊन चाल करून गेलेल्या शिवसैनिकांना ताब्यात घेतलंय.

पोलिसांनी शिवसैनिकांना रस्त्यात अडवत एका ठिकाणी स्थानबद्ध केलं. पोलिसांनी भाजप कार्यलय परिसरातील कार्यकर्त्यांवर लाठीचार्जही केला.

नाशिकमधील शिवसैनिकांनी शहरातील पक्ष कार्यालयासमोर नारायण राणेंचा पुतळाही जाळला.

यावेळी शिवसेना समर्थकांनी राणेंच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली.

या पार्श्वभूमीवर पोलिसांनी सेना कार्यालयाबाहेर तगडा बंदोबस्त ठेवलाय.