Nashik : पोहण्यााच नाद नकोच! नाशिकच्या भावली धरणात बुडून तरुणाचा करुण अंत

| Updated on: Jul 25, 2022 | 2:43 PM

नाशिक (Nashik drowned) जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटनासमोर आली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास तरुण मित्रांसोबत पोहण्यासाठी भावली धरणाच्या बॅक वॉटरमध्ये (Back water) गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने तो पाण्यात बुडाला.

Nashik : पोहण्यााच नाद नकोच! नाशिकच्या भावली धरणात बुडून तरुणाचा करुण अंत
बंधाऱ्यात पोहताना तरुणाचा बुडून मृत्यू
Image Credit source: Google
Follow us on

नाशिक : नाशिक (Nashik) जिल्ह्यातून एक दुर्दैवी घटनासमोर आली आहे. रविवारी दुपारच्या सुमारास एक तरुण आपल्या मित्रांसोबत पोहण्यासाठी भावली धरणाच्या बॅक वॉटरमध्ये (Back water) गेला होता. मात्र पाण्याचा अंदाज न आल्याने हा तरुण बुडाला. (man drowned) सुनील सोनू सांगळे असे या तरुणाचे नाव आहे. घटनेची माहिती मिळताच रविवारी रात्री उशिरापर्यंत आपत्ती व्यवस्थापन टीमकडून  या तरुणाचा पाण्यात शोध घेण्यात आला. मात्र तो कुठेही आढळून आला नाही. रात्रीच्या आधांरात शोधकार्यात अडथळा येत असल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली होती. आज सकाळी पुन्हा आपत्ती व्यवस्थान पथकाकडून पोलिसांच्या मदतीने या तरुणाचा शोध घेण्यास सुरुवात करण्यात आली. अखेर आज सकळी 11 वाजता आपत्ती व्यवस्थापन विभागाला या तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. दगडांच्या कपारीमध्ये या तरुणाचा मृतदेह आढळून आला.

शोधमोहिमेत अडथळा

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सुनील  सांगळे हा आपल्या मित्रासोबत पोहण्यासाठी भावली धरणाच्या बॅकवॉटर परिसरता गेला होता. मात्र दुर्दैवाने हा तरुण पाण्यात बुडाला. घटनेची माहिती मिळताच आपत्ती व्यवस्थापन विभागाने घटनास्थळी धाव घेतली. या तरुणाचा रविवारी रात्री उशिरापर्यंत शोध घेण्यात आला. मात्र हा तरुण कुठेही आढळून आला नाही. अंधरामुळे बचाव कार्यात अडथळा येत असल्याने शोधमोहीम थांबवण्यात आली. आज सकाळी पुन्हा या तरुणाचा शोध घेतला असता सकाळी अकराच्या सुमारास या तरुणाचा मृतदेह एका कपारीमध्ये आढळून आला.

हे सुद्धा वाचा

धरण परिसरात तरुणांची स्टंटबाजी

दरम्यान सध्या राज्यभरात मुसळधार पाऊस सुरू असून, नद्यांच्या पाणीपातळीत वाढ झाली आहे. तसेच धरणातून देखील पाणी सोडण्यात येत आहे. त्यामुळे परिस्थिती धोकादायक बनली आहे. अशा स्थितीमध्ये धरण किंवा नदीत पोहोण्यासाठी जाऊ नये असे आवाहन अनेकदा स्थानिक प्रशासनाकडून करण्यात येते. मात्र या आदेशाला पर्यटकांकडून केराची टोपली दाखवण्यात येत असल्याने अशा दुर्घटना घडत असल्याचे समोर आले आहे. नांदूरमधमेश्वर धरणातून सध्या पाण्याचा विसर्ग सुरू आहे. मात्र या धरण परिसरात देखील तरुण स्टंटबाजी करत असल्याचं पहायला मिळत आहे. अनेक जण आपला जीव धोक्यात घालून सेल्फी घेतात, मात्र अशी स्टंटबाजी जीवावर देखील बेतू शकते.