कोरोना त्रिसूत्रीच्या नियमांनुसार पर्यटनस्थळे खुली राहणार, निर्बंधांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा : छगन भुजबळ

| Updated on: Sep 04, 2021 | 6:30 PM

मास्कचा नियमित वापर व सॅनिटायझर या कोरोना त्रिसूत्रीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून पर्यटनस्थळे खुली राहणार आहेत, अशी माहिती पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे.

कोरोना त्रिसूत्रीच्या नियमांनुसार पर्यटनस्थळे खुली राहणार, निर्बंधांचे पालन करून गणेशोत्सव साजरा करा : छगन भुजबळ
Follow us on

नाशिक : गणेशोत्सव साजरा करतांना कोरोना निर्बंधांचे पालन करणे आवश्यक आहे. तसेच सुरक्षित अंतर, मास्कचा नियमित वापर व सॅनिटायझर या कोरोना त्रिसूत्रीच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करून पर्यटनस्थळे खुली राहणार आहेत, अशी माहिती राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात नाशिक जिल्ह्याच्या कोरोना आढावा बैठकीत पालकमंत्री भुजबळ बोलत होते. (Tourist spots in nashik will remain open as per Corona rules : Chhagan Bhujbal)

यावेळी जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, पोलीस आयुक्त दिपक पाण्डेय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन पाटील, अप्पर जिल्हाधिकारी दत्तप्रसाद नडे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. अशोक थोरात, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, जिल्हा नियोजन अधिकारी किरण जोशी, जिल्हा पुरवठा अधिकारी डॉ. अरविंद नरसिकर, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे, महानगरपालिकेचे वैद्यकीय अधिकारी डॉ. बापूसाहेब नागरगोजे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. आवेश पलोड आदी बैठकीस उपस्थित होते.

पालकमंत्री छगन भुजबळ यावेळी म्हणाले की, गणेशोत्सव काळात महानगरपालिका व पोलीस यंत्रणांकडून आवश्यक सर्व परवानगी घेणे गरजेचे आहे. त्याचप्रमाणे गणेशोत्सव सुरळीत पार पडावा याकरीता नागरिकांनी सुध्दा गर्दी न करता कोरोना नियमांचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन पालकमंत्री भुजबळ यांनी यावेळी केले.

जिल्ह्यात प्रस्तावित असणाऱ्या 24 ऑक्सिजन निर्मिती प्रकल्पांपैकी 5 प्रकल्प कार्यान्वित झाले आहेत. उर्वरित प्रकल्प वेळेत पूर्ण करण्यासाठी नियोजन करण्यात यावे. दिलेल्या मुदतीत प्रकल्पांचे काम पूर्ण न झाल्यास संबंधित ठेकेदारावर कडक कारवाई करण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

रेमडेसिव्हीर, टॉसीलीझुमॅबचे मेडिकलमधून थेट वितरण

टॉसीलीझुमॅब आणि रेमडेसिव्हीर या औषधांचे सुरूवातीला जिल्हा प्रशासनाच्या माध्यमातून वितरण करण्यात येत होते. परंतू आता टॉसीलीझुमॅब आणि रेमडेसिव्हीर ही औषधे थेट डॉक्टरांच्या सल्ल्याने तसेच अन्न व औषध प्रशासनाच्या नियंत्रणाखाली थेट मेडिकलमध्ये वितरणासाठी उपलब्ध करून देण्यात आली आहेत. ही औषधे माफक दरात नागरिकांना उपलब्ध करून देण्यात यावी, अशा सूचनाही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या आहेत.

जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी जिल्ह्यातील कोरोना सद्यस्थितीची माहिती देताना सांगितले की, जिल्ह्यातील लसीकरणाचे प्रमाण वाढवण्यासाठी एका दिवसात एक लाख लसीकरण करण्यासाठी नियोजन करण्यात येत आहे. तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेच्या अनुषंगाने जिल्ह्यात प्रशासनामार्फत आवश्यक पूर्व तयारी करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी मांढरे यांनी यावेळी सांगितले.

बैठकीत महानगरपालिका आयुक्त, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी कोरोनाच्या अनुषंगाने केलेल्या कार्यवाहीची माहिती पालकमंत्री यांना सादर केली.

इतर बातम्या

Aurangabad Crime: ‘यासाठी दामलेच जबाबदार’ म्हणत मारहाण झालेल्या महिलेचा आत्महत्येचा प्रयत्न, भाजप-शिवसेना भिडले, पुंडलिकनगर बनले गुंडलोक नगर

उत्तर भारतीयांना ओबीसीत आरक्षणाला भाजपचा विरोध?, बावनकुळेंचं मोठं विधान; राजकीय आखाडा तापणार

VIDEO: हजारो लोकांसमोर आयुष्यात पहिल्यांदाच भाषण दिलं, नंतर काय घडलं?; राज ठाकरेंनी जागवल्या आठवणी

(Tourist spots in nashik will remain open as per Corona rules : Chhagan Bhujbal)