
नाशिक जिल्ह्यातील वणी-सापुतारा रस्त्यावर झालेल्या अपघाताचा सीसीटीव्ही फुटेज समोर आला आहे. रविवारी दुपारच्या सुमारास वणी सापुतारा रस्त्यावरील अंचला पिंपरी फाटा नजीक अपघात झाला होता. एका कारने दुचाकीस्वाराला उडवले होते. हा अपघात इतका भीषण होता की, कारने दुचाकीला धडक दिल्यानंतर दुचाकीस्वार हवेत काही फूट उंच उडाले होते. शंकर ठाकरे हे अपघातात गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर नाशिकच्या एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अपघातात दुचाकी गाडीचा चक्काचूर झाला आहे. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.
नाशिकच्या वणी-सापुतारा रस्त्यावर कारने दुचाकीस्वाराला उडवलं. अपघाताचा थरार कॅमेऱ्यात कैद झाला आहे. या अपघातात दुचाकीस्वार गंभीर जखमी झालाय #Nashik #accident pic.twitter.com/sOWHRVsiIB
— TV9 Marathi (@TV9Marathi) July 30, 2024
राज्यात हिट अँड रनच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ होताना दिसत आहे. मुंबईत काही दिवासंपूर्वी एका शिवसेना नेत्याच्या मुलाने दुचाकीला धडक दिली होती. यानंतर कारने महिलेला फरफटत नेलं होतं. या घटनेत महिलेचा मृत्यू झाला होता. त्याआधी पुण्यात हिट अँड रनची घटना घडली होती. पुण्यात एका बिल्डराच्या अल्पवयीन मुलाने मद्यधुंद अवस्थेत भरधाव गाडी चालवत बाईकला धडक दिली होती. या अपघातात एका तरुण आणि तरुणीचा मृत्यू झाला होता. या दोन्ही घटनांनंतर अशा अनेक घटना सातत्याने घडत आहेत.
विशेष म्हणजे धुळ्यात काल रात्री आठ वाजेच्या सुमारास घडलेल्या घटनेमुळे संपूर्ण राज्य हादरलं आहे. धुळ्यात काल एका भरधार ट्रकचालकने दारुच्या नशेत एका कारला फरफटत नेलं होतं. त्यानंतर तो तेवढ्यावरच थांबला नाही त्याला एकाला चिरडलं होतं. तसेच त्याने आणखी काही वाहनांना धडक दिली होती. या अपघातात हर्षल भदाणे पाटील या युवा पत्रकाराचा मृत्यू झाला. हर्षलच्या मृत्यूमुळे मराठी पत्रकारविश्वात हळहळ व्यक्त केली जात आहे.