सीएनजी दरवाढी विरोधात युवक राष्ट्रवादीचं अनोखं आंदोलन, आंदोलनाची होतेय चर्चा…

| Updated on: Oct 05, 2022 | 2:50 PM

पेट्रोल-डिझेल तुलनेत सीएनजी दराची वाढ पाहता नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत असून त्यातच सीएनजीचे वाढते दर बघून राष्ट्रवादीने निदर्शनं केली आहे.

सीएनजी दरवाढी विरोधात युवक राष्ट्रवादीचं अनोखं आंदोलन, आंदोलनाची होतेय चर्चा...
Image Credit source: TV9 Network
Follow us on

नाशिक : सतत वाढणाऱ्या पेट्रोल-डीझेलच्या (Petrol Diesel) किमतीला पर्याय म्हणून वाहनधारक नैसर्गिक वायू कडे (CNG) वळलेले आहे. त्यातच नैसर्गिक वायूच्या किमतीत म्हणजे सीएनजी आणि पीएनजी ही झपाट्याने वाढत असल्याने त्यांच्या विरोधात राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अंबादास खैरे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले आहे. सीएनजी पंपावरील ग्राहकांना काळी आपट्याची पाने वाटप करत उपहासात्मक आंदोलन करण्यात आले आहे. दसऱ्याच्या दिवशी धन, ज्ञान आणि भक्तीची पूजा केली आहे. त्याचे प्रतीक म्हणून सोने वाटपाची परंपरा आहे. त्यासाठी आपट्याची पाने वाटून आशीर्वाद घेण्याची परंपरा आहे.

पेट्रोल-डिझेल तुलनेत सीएनजी दराची वाढ पाहता नागरिकांमध्ये नाराजी दिसून येत असून त्यातच सीएनजी चे वाढते दर बघून राष्ट्रवादीने निदर्शनं केली आहे.

महागाईमुळे नागरिकांचे सर्वच सणावर पाणी फिरलेले असतांना मोदी सरकारन नवनवीन माध्यमातून जनतेला महागाईच्या खाईमध्ये ढकलत आहे.

हे सुद्धा वाचा

पेट्रोल-डिझेलच्या सतत वाढणाऱ्या किमतीला पर्याय म्हणून सरकारने नैसर्गिक वायूवर चालणाऱ्या वाहनांचा पर्याय दिला आहे. त्यानुसार वाहनधारक त्याकडे वळाले सुद्धा होते.

परंतु सद्यस्थितीत डीझेलच्या किमतीपेक्षा सीएनजीची किमती जास्त असल्याने वाहनधारक आपल्या कपाळावर हात मारून घेत असल्याचे राष्ट्रवादीने दिलेल्या पत्रकात म्हंटले आहे.

याशिवाय महागाई गेल्या काही वर्षांतील सर्वोच्च स्थराला पोहोचली आहे. सर्व वस्तूंचे दर गगनाला भिडलेले असताना यामध्ये भर पडलीयं ती म्हणजे सीएनजी गॅसची.

नाशिक शहरात सीएनएजीच्या दरात प्रति किलोमागे चार रुपयांची मोठी वाढ करण्यात आलीयं. यामुळेच आता सीएनजी ग्राहकांना अधिकचे पैसे मोजावे लागत आहेत.

गेल्या काही दिवसांपासून सीएनजी गॅस दरात मोदी सरकारकडून सततची दर वाढ करण्यात येत आहे. सीएनजी गॅस दर वाढत असल्याने वाहन चालकांना मोठा फटका याचा सहन करावा लागतोयं.

९२ रुपये वरून नाशिकमध्ये आता सीएनजी गॅस ९६ रुपयांवर पोहचला असल्याने वाहनधारक संतप्त झाल्याचे चित्र बघायला मिळते आहे.
यावेळी बाळा निगळ, जय कोतवाल, विशाल डोके, निलेश भंदुरे, सागर बेदरकर, राहुल कमानकर, अमोल नाईक, डॉ.संदीप चव्हाण आदींसह मोठया संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

 

नैसर्गिक वायूच्या दरात दिवसेंदिवस वाढ होत असून राज्याचे मुख्यमंत्री सत्कार स्वीकारण्यात व विविध सणांच्या आनंदोत्सवात व्यस्त आहे. वाढती महागाई, अतिवृष्टीने झालेले पिक नुकसान, शेतकऱ्यांची नुकसान भरपाई व नागरिकांच्या इतर जिवंत प्रश्नांकडे मुख्यमंत्र्यांनी लक्ष द्यावे.- अंबादास खैरे, शहराध्यक्ष, राष्ट्रवादी युवक कॉँग्रेस, नाशिक