डीजेच्या आवाजाने नव्हे मग त्या तरूणाचा मृत्यू कशामुळे ? नाशिक प्रकरणात नवा ट्विस्ट

डीजेच्या आवाजामुळेच त्याने जीव गमावला असा पोलिसांना संशय होता, मात्र आता याप्रकरणात आता एक नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. जो तरूण मृत्यूमुखी पडला, त्याला गेल्या काही वर्षांपासून इतरही त्रास असल्याचे समोर आले आहे.

डीजेच्या आवाजाने नव्हे मग त्या तरूणाचा मृत्यू कशामुळे ? नाशिक प्रकरणात नवा ट्विस्ट
नाशिकमध्ये तरूणाचा मृत्यू
Image Credit source: social media
| Updated on: Apr 15, 2025 | 8:55 AM

डीजेच्या दणदणाटामुळे नाशिकमध्ये एका 23 वर्षांच्या तरूणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आलं होतं. डिजे जवळ उभ्या असलेल्या नाशिकच्या तरूणाने जीव गमावला. डीजेच्या आवाजामुळेच त्याचा मृत्यू झाला असा पोलिसांना संशय होता, मात्र आता याप्रकरणात आता एक नवा ट्विस्ट येण्याची शक्यता आहे. जो तरूण मृत्यूमुखी पडला, त्याला गेल्या काही वर्षांपासून इतरही त्रास असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे त्याचा मृत्यू नेमका कसा झाला हे गूढ कायम आहे.

नेमकं काय घडलं ?

नाशिकच्या पंचवटी परिसरात असलेल्या महात्मा फुले नगर येथे रविवारी रात्री डीजे लावण्यात आला होता. मात्र त्याच डीजेच्याजवळ उभ्या असलेल्या नितीन रणशिंगे याला अचानक त्या दणदणाटाचा त्रास जाणवू लागला. डीजेच्या आवाजाने नितीन रणशिंगे या 23 वर्षीय युवकाला त्रास होऊ लागला आणि त्याच्या नाकातून आणि तोंडातून रक्त येऊ लागले. ते पाहून त्याच्या नातेवाईकांनी व मित्रांनी त्याला तात्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. मात्र तोपर्यंत बराच उशीर झाला होता. उपचारांदरम्यानच नितीन रणशिंगे यांने अखेरचा श्वास घेतला.

डीजेच्या आवाजाने नितीन रणशिंगे याचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली होती. पण त्याच्या मृत्यूनंतर पंचवटी पोलिसांनी अधिक तपास केला असता एक वेगळीच माहिती समोर आली आहे. नितीन हा गेल्या चार वर्षांपासून गंभीर आजाराने ग्रस्त होता, असे पोलीस तपासात समोर आल आहे.

दरम्यान तज्ञ डॉक्टरांच्या मते, एखाद्या रुग्णास हृदयाचा त्रास असल्यास अती, मोठ्या आवाजाच्या ध्वनीने त्या व्यक्तीला हृदयविकाराचा झटका येऊ शकतो .

पण अवघ्या 23 वर्षांच्या नितीनच्या मृत्यूच्या घटनेनंतर संपूर्ण नाशिक मध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे. मोठ्या आवाजामुळे, डीजेच्या दणदणाटामुळे अशा घटना होण्याची शक्यता नाकारता येत नसून येणाऱ्या दिवसात तरी सार्वजनिक मंडळांनी याची काळजी घ्यावी असं आवाहन करण्यात येत आहे.