AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

उद्यापासून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे तारांकित हॉटेलमध्ये शेतकऱ्यांसह विविध प्रश्नांवर मंथन, असा आहे कार्यक्रम

लोकसभा निवडणूक अवघ्या सव्वा वर्षावर येऊन ठेपली आहे, सत्ता गेल्यानंतर पक्षफुटण्याची भीती यासाठी हे मंथन शिबिर महत्वाचे आहे.

उद्यापासून राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे तारांकित हॉटेलमध्ये शेतकऱ्यांसह विविध प्रश्नांवर मंथन, असा आहे कार्यक्रम
Image Credit source: TV9 Network
Kiran Balasaheb Tajne
Kiran Balasaheb Tajne | Updated on: Nov 02, 2022 | 6:43 PM
Share

नाशिक : राज्यातील सत्तांतर झाल्यानंतर पहिल्यांदाच महाराष्ट्रातील राजकीय पक्षांपैकी राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्ष मंथन करणार आहे. शिर्डी येथील तारांकित हॉटेलात राष्ट्रवादी कॉँग्रेस पक्षाचे प्रमुख शरद पवार यांच्या उपस्थित मंथन शिबिर पार पडणार आहे. उद्यापासून म्हणजेच 3 नोव्हेंबर ते 5 नोव्हेंबर या कालावधीत हे शिबिर होणार आहे. किमान ४० महत्त्वाचे नेते मार्गदर्शन करणार आहे. या शिबिरात जवळपास 1800 हून अधिक पदाधिकारी सहभागी होणार आहे. या शिबिरात शेतकऱ्यांच्या दृष्टीने ओला दुष्काळ, कर्ज, परराज्यामध्ये पळवले जाणारे प्रकल्प, अशा विविध विषयांवर चर्चा केली जाणार आहे. शिबिराला येणाऱ्या जवळपास 400 नेत्यांसाठी तारांकित हॉटेलात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. आणि कार्यकर्त्यांना भक्त निवासात राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

महाविकास आघाडी सत्तेवरुन पाऊउतार झाल्यानंतर राष्ट्रवादी कॉँग्रेस पहिल्यांदाच असे मंथन शिबिर घेत आहे.

राष्ट्रवादी कॉँग्रेसने या शिबिरातून ग्रामीण भागातील प्रश्नावर लक्ष केंद्रित केले असून यावर शिबिरात अनेक तज्ज्ञ मार्गदर्शन करणार आहे.

लोकसभा निवडणूक अवघ्या सव्वा वर्षावर येऊन ठेपली आहे, सत्ता गेल्यानंतर पक्षफुटण्याची भीती यासाठी हे मंथन शिबिर महत्वाचे आहे.

पक्षबांधणी आणि आंदोलने ठरवण्यासाठी शिर्डीतील सन अँड सँड हॉटेलात हे अधिवेशन होणार आहे.

या शिबिरात जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, विधानसभा निरीक्षक, माजी मंत्री, विद्यमान आणि माजी खासदार, आमदारांचा समावेश आहे.

यामध्ये प्रदेश अधिवेशन असल्याचे कारण देत शिर्डीतील राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांना याबाबत कुठलीही कल्पना दिली जात नसल्याची माहिती समोर आली आहे.

एकूणच शिर्डी येथे होणाऱ्या मंथन शिबिराबाबत वरिष्ठ पातळीवरुनच सर्व निर्णय होत असल्याने दबक्या आवाजात मोठी चर्चा आहे.

Follow Us
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या...
तुम्ही वेळ घ्या, पंतप्रधान तुम्हालादेखील भेटतील; शिंदे गटातील बड्या नेत्याचा उद्धव ठाकरेंना खोचक टोला
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान
बापरे! चप्पल, बूट अन् चिखलाचा मारा; ममता बॅनर्जींच्या दौऱ्यादरम्यान धक्कादायक घटना, व्हिडीओच आला समोर
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्तेंचा जरांगेंवर संताप
जरांगेंना मिरची लागली, ते हवेवर...गुणरत्न सदावर्ते  मनोज जरांगेंवर भडकले; सडकून टीका!
मोठी बातमी! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची...
मोठी खळबळ! पुण्यातील नामांकित पबवर कारवाई; तब्बल 62 जणांची... नेमकी भानगड काय?
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर'
रक्तदान महादान! 1200 शिवसैनिकांचा समावेश; दिल्लीत शिवसेनेकडून 'सिंदुर' महारक्तदान शिबीराचे आयोजन
पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! पहा Video
Manoj Jarange Patil | पंढरपूरात मनोज जरांगे पाटलांचं जंगी स्वागत! फुलांचा वर्षाव अन्... पहा व्हिडीओ
मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
Raj Thackeray | मनसे अध्यक्ष राज ठाकरेंकडून मुंबई-गोवा महामार्गाची पाहणी
मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील नेत्याचा एकाच विमानाने प्रवास
मोठी बातमी! मुख्यमंत्री फडणवीस आणि शरद पवार गटातील बड्या नेत्याचा एकाच विमानाने प्रवास, फोटो आले समोर
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही घेऊ शकतो- जरांगे
मी समाजासाठी जीवघेणं उपोषणही करु शकतो तर कोणाचा जीवही... भर मंचावरून मनोज जरांगे कडाडले; आता...
Big Breaking| बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर
Big Breaking | बारामती विमान दुर्घटनेबाबत मोठी अपडेट समोर; नेमकं काय घडलं? पहा व्हिडीओ