पंतप्रधानांचे आवाहन मोडून नवी मुंबईचे महापौर चालले अमेरिकेला, २८ लाखांच्या उधळपट्टीवरुन राजकारण तापले
एकीकडे मुंबईच्या महापौर रितू तावडे यांच्या सोशल मीडिया अकाऊंट प्रमोशनसाठी लाखो रुपयांच्या मंजूरीचा प्रस्तावावर वादळ उठले होते.आता नवीमुंबई महापौर सुजाता पाटील यांच्या अमेरिका दौऱ्यावरुन राजकारण तापले आहे.

नवीमुंबई महापालिकेत पदाधिकाऱ्यांच्या सेवेसाठी अवघ्या सहा महिन्यांतच पुन्हा एकदा महागड्या ‘इनोव्हा क्रिस्टा’ खरेदीच्या प्रस्तावावरुन टीका सुरु आहे. त्यातच आता नवीमुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या अमेरिका दौऱ्यासाठी २८ लाखांच्या खर्चाला मंजूरी देण्याच्या प्रस्तावावरुन टीका होत आहे. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी परदेश प्रवास टाळावा असा सल्ला दिला जात भाजपाच्या महापौर अमेरिकेत दौऱ्यावर निघाल्याने पैशांची उधळपट्टी होत असल्याची टीका होत आहे.
मुंबईनंतर नवी मुंबईच्या महापौरांकडून उधळपट्टी सुरु आहे. नवीमुंबईच्या महापौर सुजाता पाटील अमेरिकेच्या अभ्यास दौऱ्यावर निघाल्याने टीका होत आहे. या परदेश दौऱ्यासाठी तब्बल २८ लाखांच्या प्रवास खर्चाला प्रशासनाची मंजुरी दिली आहे. शेतकरी दुष्काळात होरपळत असताना महापौर परदेशवारीवर निघाल्याने विरोधकांनी त्यांच्यावर टीका होत आहे. पंतप्रधानांचा परदेशवारीला विरोध असताना भाजपाच्या महापौरच या आदेशाला काळीमा फासत असल्याने विरोधकांनी मोठी टीका केली आहे.
नवीमुंबईच्या महापौर सुजाता पाटील अमेरिकेत अभ्यास दौऱ्यासाठी चालल्या आहेत. त्यासाठी येणाऱ्या २८ लाखाचा खर्चाचा प्रस्ताव पालिकेत आला आहे. मध्य पूर्वेतील संघर्षामुळे परदेश प्रवास टाळावेत अशी विनंती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे. या आदेशाला नवी मुंबईत भाजप महापौरांकडूनच हरताळ फासला जात आहे. आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पंतप्रधानांच्या आदेशाचे पालन राज्यात राबवणार का? याकडे लक्ष लागले आहे.