सावधान, नवी मुंबईत सकाळी वॉकला जाताय?

| Updated on: Dec 22, 2020 | 5:53 PM

खारघर, तळोजा आणि पनवेलमधील हवेत घातक कण मोठ्या प्रमाणात असल्याची धक्कादायक माहिती या सर्वेक्षणातून समोर आली आहे. (air pollution increased Panvel)

सावधान, नवी मुंबईत सकाळी वॉकला जाताय?
Follow us on

नवी मुंबई : आरोग्य चांगले राहावे म्हणून अनेक नागरिक मॉर्निंग वॉकला जातात. मात्र, वातावरण फाऊंडेशनने केलेल्या खास सर्वेक्षणात गंभीर बाब समोर आली आहे. खारघर, तळोजा आणि पनवेलमधील हवेत घातक कण मोठ्या प्रमाणात असल्याची (air pollution) धक्कादायक माहिती या सर्वेक्षणातून समोर आली आहे. तळोजा औद्योगिक क्षेत्रातील रासायनिक कारखान्यांद्वारे होत असलेल्या प्रदूषणामुळे या भागात प्रदूषण वाढले असल्याचा दावा सर्वेक्षण करणाऱ्या संस्थेने केला आहे. (air pollution increased in Kharghar, Taloja and Panvel)

वातावरण फाउंडेशनच्या वतीने खारघर, तळोजा आणि पनवेलमधील हवेची गुणवत्ता तपासण्यात आली. यावेळी या क्षेत्रातील हवेत पार्टीक्युलेट पोल्यूटंट कण प्रमाणापेक्षा अधिक असल्याचे समोर आले आहे. हवेमध्ये या कणांचे प्रमाण सामान्यत: 60 मायक्रोग्रॅम प्रति क्यूबिक असते. परंतु खारघर, तळोजा आणि पनवेल या परिसरात या प्रदूषित कणांचे प्रमाण दुप्पट झाले आहे.

या घातक कणांचे प्रमाण वातावरणात वाढले तर त्यांचा फुफ्फुसांवर अत्यंत घातक परिणाम होतो. ज्यामुळे नागरिकांना श्वसनाचे आजार उद्भवतात. खारघर तळोजा आणि पनवेल परिसरात 24 तासांपैकी 17 तास हवा प्रदूषित असल्याचे या सर्वेक्षणात आढळले आहे. सकाळी प्रदूषणाचे प्रमाण नेहमीपेक्षा जास्त असल्याचे वातावरण फाउंडेशनच्या वतीने सांगण्यात आले आहे.

दरम्यान, प्रदूषण करणाऱ्या केमिकल कारखान्यांवर प्रदूषण नियंत्रण मंडळ दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत, पनवेल महानगरपालिकेने आता या कारखान्यांवर कारवाई करावी अशी मागणी रवींद्र भगत यांनी केली आहे. तसेच, लवकरात लवकर कारवाई केली नाही तर आंदोलन करण्याचा इशारा भगत यांनी दिला आहे.

संबंधित बातम्या :

Sussanne Khan | हृतिक रोशनची घटस्फोटित पत्नी सुझान खानविरोधात गुन्हा

Suresh Raina arrested : क्रिकेटपटू सुरेश रैना आणि सुझान खान यांची अटकेनंतर सुटका

Special Report : मेट्रो कारशेडसाठी कांजूरमार्गची जागा न मिळाल्यास ठाकरे सरकारचा प्लॅन बी तयार

(air pollution increased in Kharghar, Taloja and Panvel)