Navi Mumbai Crime | मुंबई, नवी मुंबईसह राज्याबाहेर करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या बंटी बबलीला अटक

| Updated on: Dec 10, 2021 | 7:45 PM

आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते. परंतु, सतत वास्तव्याचे ठिकाण बदलले जात असल्याने ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते. अखेर पूजा हिला चंदीगडमधून अटक करण्यात आली होती.

Navi Mumbai Crime | मुंबई, नवी मुंबईसह राज्याबाहेर करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या बंटी बबलीला अटक
मुंबई, नवी मुंबईसह राज्याबाहेर करोडो रुपयांचा गंडा घालणाऱ्या बंटी बबलीला अटक
Follow us on

नवी मुंबई : शहरात विविध ठिकाणी कार्यालय थाटून संगणक, लॅपटॉप व इतर साहित्य पुरवठा करणाऱ्या कंपन्यांना मोठ्या खरेदीचे आमिष दाखवून खरेदी केलेल्या मालाचे पैसे न देता फसवणूक करणाऱ्या पती-पत्नीला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. नेरुळ, वाशीसह घाटकोपर या ठिकाणी जवळपास 90 लाखाचा माल खरेदी करून दिलेला चेक बाऊन्स करत कार्यालयाचे भाडे वैगरे थकवून या सराईतांनी पळ काढला होता. मात्र, मोठ्या शिताफीने या दाम्पत्याला वाशी पोलिसांनी अटक केली आहे. त्यांच्याकडून दोन गुन्हे उघड झाले असून त्यामधील सात लाखांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.

दिल्लीतल्या एका कंपनीला गंडा घालण्याच्या तयारीत असताना अटक

दिल्लीच्या इतर एका कंपनीला तो गंडा घालण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी त्याला अटक केली आहे. मात्र, गुन्हेगाराने गुन्ह्यात सहभागी असलेल्या पत्नीलाच अंधारात ठेवून दुसरे लग्न केल्याचे समोर आले आहे. वाशी येथील वोक्सट्रगल इन्फो या संगणक व त्याचे साहित्य पुरवणाऱ्या कंपनीची फसवणूक झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानुसार वाशी पोलीस अपाई नावाच्या कंपनीच्या डायरेक्टरचा शोध घेत होते. या कंपनीने वोक्सट्रगल इन्फो कंपनीकडून संगणक व इतर आवश्यक साहित्य असे 50 लाखांहून अधिक किमतीची खरेदी केली होती.

तातडीने हा माल हवा असल्याचे सांगून त्यांनी कंपनीला विश्वासात घेतले होते. मात्र, त्यानंतर बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ केली जात होती. यामुळे काही दिवसांनी कंपनीच्या पत्त्यावर जाऊन पाहणी केली असता त्याठिकाणी कंपनीचे कार्यालय नसल्याचे आढळून आले. यावरून फसवणूक केल्याप्रकरणी पूजा मैत्रेय, मयंक मैत्रेय व अमिताभ मैत्रेय यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता.

आरोपींच्या अटकेसाठी पथक तयार करण्यात आले होते

आरोपींच्या अटकेसाठी वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक तयार करण्यात आले होते. परंतु, सतत वास्तव्याचे ठिकाण बदलले जात असल्याने ते पोलिसांच्या हाती लागत नव्हते. अखेर पूजा हिला चंदीगडमधून अटक करण्यात आली होती. तिला जामीन मिळू नये, यासाठी तक्रारदार यांचे वकील अभिषेक बांद्रे, नेहल देसले व आदित्य अंधोरीकर यांनी प्रयत्न केले होते. त्यानंतर मयंक यालाही शिताफीने अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे.

आरोपी वयोवृद्ध वडिलांच्या खोट्या सह्या करायचा

दरम्यान, या पती-पत्नीने मयंक याचे वयोवृद्ध वडील अमिताभ यांच्या खोट्या सह्या करून त्यांनाही गुन्ह्यात भागीदार केले होते. त्यामुळे पोलिसांनी अद्याप त्यांना अटक केलेली नाही. या दोघांनी ठाणे येथील एका कंपनीला देखील अशाच प्रकारे सुमारे 40 लाखांचा गंडा घातलेला आहे, तर नुकतेच ते दिल्ली येथील एका कंपनीला गंडवण्याच्या तयारीत होते. मात्र त्यापूर्वी त्यांना अटक करण्यात आली आहे. मयंक मैत्रेय हा सराईत असून गुन्हा केल्यानंतर तो मोबाईल व राहण्याचे ठिकाण सतत बदलत असे. तर त्याची पत्नी पूजा हिला अटक केल्यानंतर त्याने दोन महिन्यांपूर्वी डेहराडून येथे स्वतःची खरी ओळख लपवून एका मुलीसोबत दुसरे लग्न केल्याचेही समोर आले आहे. (Bunty Babli arrested for embezzling crores of rupees from Mumbai, Navi Mumbai and outside the state)

इतर बातम्या

भरदिवसा सोने खरेदीदाराला लुटणारे टोळी जेरबंद; पनवेल गुन्हे शाखेची कौतुकास्पद कामगिरी

Pune Crime |पुणे ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई ; पिस्तुलाचा धाक दाखवून लुटणाऱ्या 6 जणांना अटक