नवी मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा रुग्ण?

| Updated on: Jun 21, 2021 | 3:53 PM

Coronavirus in Navi Mumbai | डेल्टा प्लस व्हेरियंट आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे.

नवी मुंबईत कोरोनाच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचा रुग्ण?
कोरोना डेल्टा प्लस व्हेरियंट
Follow us on

नवी मुंबई: नवी मुंबईतील कोरोना परिस्थिती आटोक्यात आली असतानाच आता एक चिंतादायक बाब समोर आली आहे. शहरात घातक समजल्या जाणाऱ्या कोरोनाचा डेल्टा प्लस हा व्हेरियंट आढळून आला आहे. याबाबत अद्यापपर्यंत अधिकृतरित्या खातरजमा झालेली नाही. संबंधित रुग्णाचे नमुने हे प्रयोगशाळेत पाठवण्यात आल्याची माहिती पालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी दिली. (Coronavirus delta plus variant suspect found in Navi Mumbai)

मात्र, डेल्टा प्लस व्हेरियंट आणि कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीवर नवी मुंबईत प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. डेल्टा प्लस व्हेरियंटबाबत आम्ही राज्य सरकारशी संपर्क केलेला आहे. त्यांच्याकडून याबाबतीत लवकरच कळवले जाईल, असेही अभिजित बांगर यांनी सांगितले.

कोरोना विषाणूचा ‘डेल्टा प्लस व्हेरियंट’ प्रकार नेमका काय?

नवीन डेल्टा प्लस व्हेरियंट (B.1.617.2.1 किंवा AY.1) डेल्टा मधील उत्परिवर्तनामुळे किंवा B.1.617.2, व्हेरिएंटमुळे तयार झाला आहे. N501Y मधील पूर्वीच्या डेल्टा उत्परिवर्तीच्या बाजूने, डेल्टा प्लसमध्ये K417Nचे उत्परिवर्तन आहे. संशोधकांना वाटते की, या दोन उत्परिवर्तनांमुळे हा विषाणू अधिक संक्रमित होऊ शकतो. तसेच, कॅसिरिविमॅब आणि इमदेविमॅब सारख्या मानवनिर्मित अँटीबॉडी यापासून मुक्त होण्यास मदत करतात. जे सध्या भारतात कोरोना उपचारासाठी आणीबाणीच्या काळात वापरासाठी कार्यरत मोनोक्लोनल अँटीबॉडी कॉकटेलची लक्षणे आहेत.

डेल्टा प्लस विषाणुपासून बचाव कसा करायचा?

व्हायरस काहीही असो, तो नेहमी त्याची अनुवांशिक रचना बदलत राहतो. विषाणू जेव्हा त्याची रचना बदलते, तेव्हा त्याला शास्त्रज्ञ एक नवीन नाव देतात. कोणताही विषाणू त्याचं रुप बदलत असतो. ज्यावेळी लोक विषाणूचा प्रभाव नष्ट करण्यासाठी लस किंवा औषधं घेतात त्यापासून वाचण्यासाठी विषाणूकडून रुप बदलं जातं. मात्र, आपण कायम मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सुरक्षित अंतर ठेवणे या गोष्टी आपल्या हातात आहेत, असं वार्ष्णेय यांनी सांगितलं.

नव्या व्हेरियंटवर लस प्रभावी आहे का?

आपण आतापर्यंत वापरत असलेली लस वेरियंटवर प्रभावी आहे. बर्‍याच वेळा अशा प्रकारे अनुवांशिक बदलांमुळे व्हायरस नष्ट होतात. सार्स कोरोना व्हायरस (Sars Cov 1) अशाप्रकारे संपला होता. म्हणूनच, जेव्हा जेव्हा व्हायरस बदलतो तेव्हा फक्त धोका असतो, असं म्हणता येत नाही. कधीकधी ते खूप कमकुवत देखील होतात आणि त्याचा प्रभाव कमी होतो. नागरिकांनी कोणत्याही गोष्टीवर विश्वास न ठेवता लस घ्यावी.

हेही वाचा :

Corona Cases In India | देशात नव्या कोरोनाग्रस्तांमध्ये पाच हजारांनी घट, कोरोनाबळीही दीड हजारांखाली

मोठं यश! आता हे सॉफ्टवेअर सांगणार कोणत्या रुग्णाला व्हेंटीलेटर आणि आयसीयूची गरज

Coronavirus delta plus variant suspect found in Navi Mumbai