“मुख्यमंत्री आता ठाण्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत”; ‘या’ नेत्यानं शिंदे गटाविषयीचा विश्वास बोलून दाखवला…

| Updated on: Jan 26, 2023 | 9:55 PM

मंत्री उदय सामंत यांनी ज्या प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे.

मुख्यमंत्री आता ठाण्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत; या नेत्यानं शिंदे गटाविषयीचा विश्वास बोलून दाखवला...
Follow us on

नवी मुंबईः राज्यात पदवीधर मतदार संघाची निवडणूक लागल्याने आणि पुण्याची पोटनिवडणूक जाहीर झाल्याने राज्यातील राजकीय वातावरण सध्या प्रचंड तापले आहे. सत्ताधारी आणि विरोधक यांच्यामध्ये आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडत असून यामध्ये शिंदे गट आणि मविआचे नेते आमने सामने आले आहेत. पोटनिवडणुकीवरुन राजकीय वातावरण तापले असतानाच शिंदे गटाचे नेते उदय सामंत यांनी थेट सुप्रिया सुळे यांनाच थेट आव्हान केले आहे.

राज्यात भाजपनंतर आमचाच पक्ष आघाडीवर आहे. त्यामुळे कोणत्याही पक्षावर टीका करताना विचारा करावा असा इशारा सुप्रिया सुळे यांना देण्यात आला आहे.

पोटनिवडणुकीवरून आरोप प्रत्यारोप केले जात आहे, तर शिंदे गटाने मोर्चे बांधणी केल्याची टीका काही राजकीय नेत्यानी केली होती. त्यावर बोलताना उदय सामंत यांनी म्हटले आहे की, निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आमचा पक्ष कधीही मोर्चेबांधणी करत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे.

मंत्री उदय सामंत यांनी ज्या प्रमाणे राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे यांच्यावर जोरदार टीका केली आहे. तर दुसरीकडे त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरही जोरदार हल्लाबोल केला आहे.

माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मतदार संघ असलेल्या ठाण्याचा दौरा केला आहे. त्यावर टीका करताना त्यांनी मुख्यंमत्री आता ठाण्यापुरते मर्यादित राहिलेले नाहीत, त्यामुळे त्यांच्या मतदार संघात जे सभा घेतात त्यांना शुभेच्छा असं म्हणत त्यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली आहे.

शिंदे गटावर अनेक राजकीय नेत्यांकडून टीका केली जात आहे. तर दुसरीकडे शिंदे गटामध्ये तू तू मैं मैं असल्याचीही काहीजणांकडून टीका केली जाते. त्या नेत्यांच्या टीकेला प्रत्युत्तर देताना एकनाथ शिंदे म्हणजे 50 आमदारांचा आणि खासदारांचा विश्वास एकनाथ शिंदे यासारख्या मुख्यमंत्र्यांवर आहे.

त्यामुळे आमच्यामध्ये फूट पडण्याचा हा बालिशपणा असल्याचे सांगत विरोधकांचा हा डाव कधीही यशस्वी होणार नाही असा पलटवारही त्यांनी यावेळी केला आहे. तर पुण्याच्या पोटनिवडणुकीविषयी बोलतानाही त्यांनी ही पोटनिवडणूक बिनविरोधी व्हावी अशी इच्छाही त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे.