पाकिस्तानचा स्वस्त कांदा बाजारपेठेत, बांगलादेशच्या सीमा बंद, भारतीय कांदा उत्पादक अडचणीत

| Updated on: Jul 02, 2021 | 4:24 PM

Onion in APMC Market | लॉकडाऊनमुळे फेरीवाल्यांना विक्रीची वेळ कमी झाल्याने ग्राहक कमी झाल्याने विक्रीवर परिणाम होऊन माल पडून राहत असल्याचे बोलले जात आहे.

पाकिस्तानचा स्वस्त कांदा बाजारपेठेत, बांगलादेशच्या सीमा बंद, भारतीय कांदा उत्पादक अडचणीत
संग्रहित छायाचित्र.
Follow us on

नवी मुंबई: एपीएमसी कांदा-बटाटा मार्केटमध्ये कांद्याच्या दरात पाच रुपयांची घसरण झाली. पाकिस्तान कांदा दुबईला आयात झाला असून तो कांदा स्वस्त असल्याने बाजारभावात घसरण झाल्याचे सांगण्यात येत आहे. तसेच बांगलादेश सीमा बंद करण्यात आल्याने आपल्याकडून बांग्लादेशात जाणार कांदा (Onion) कमी झाला आहे. तर पाकिस्तानचा कांदा स्वस्त असल्याने त्या कांद्याला दुबईत मागणी वाढली असल्याने दुबईला होणारी कांदा निर्यात कमी झाली. त्यामुळे परिणामी कांद्याच्या व्यापारावर परिणाम झाला असून मालाला अधिक उठाव नसल्याने कमी दरात विक्री करावी लागत असल्याचे व्यापारी सांगत आहेत. (Onion get cheaper by 5 rupees in Navi Mumbai APMC Market)

याशिवाय, लॉकडाऊनमुळे फेरीवाल्यांना विक्रीची वेळ कमी झाल्याने ग्राहक कमी झाल्याने विक्रीवर परिणाम होऊन माल पडून राहत असल्याचे बोलले जात आहे.

जून महिन्यात लासलगाव बाजारपेठेत 180 कोटींची उलाढाल

आशिया खंडात कांद्याची अग्रेसर बाजारपेठ म्हणून नावलौकिक मिळवलेल्या लासलगाव कृषी उत्पन्न बाजार समितीत जून महिन्यात कांद्याची 11 लाख 70 हजार क्विंटल इतकी विक्रमी आवक झाली होती. त्यामुळे बाजारपेठेत अवघ्या 27 दिवसांत तब्बल 180 कोटी रुपयांची उलाढाल झाली होती.

कांदा टप्प्याटप्प्याने गरजेनुसार बाजार समितीमध्ये विका

भारतीय कांद्याला आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत टक्कर देण्यासाठी चांगल्या प्रतवारीचा आणि कमी दरामध्ये पाकिस्तानचा कांदा उपलब्ध झाला आहे. श्रीलंकेत भारतीय कांदा 450 डॉलरमध्ये प्रति टन तर पाकिस्तानचा कांदा 310 डॉलर प्रति टनामध्ये मिळत आहे. मात्र देशांतर्गत मागणीच्या तुलनेत कांद्याचा पुरवठा कमी होत असल्याने बाजारभाव टिकून राहण्यास मदत झाली आहे. शेतकऱ्यांनी घाबरून न जाता आपला कांदा हा टप्प्याटप्प्याने गरजेनुसार बाजार समितीमध्ये विक्री करावा. पाकिस्तानच्या कांद्यामुळे भारतीय कांद्याच्या बाजारभावात सध्यातरी कोणताही परिणाम होणार नसल्याने शेतकऱ्यांनी कांदा विक्रीची घाई करू नये असे या क्षेत्रातील तज्ञ सांगत आहेत.

हे ही वाचा :

मका निर्यातीत पाकिस्तानचा भारताला टक्कर देण्याचा प्रयत्न, कमी किमतीमध्ये मका निर्यात सुरु

मका निर्यातीत पाकिस्तानचा भारताला टक्कर देण्याचा प्रयत्न, कमी किमतीमध्ये मका निर्यात सुरु

भात शेतीमध्ये मत्स्यपालन करुन दुप्पट कमाईची संधी, फिश राईस फार्मिंग नेमकं काय?

(Onion get cheaper by 5 rupees in Navi Mumbai APMC Market)